मेष रास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेष या पानावरून पुनर्निर्देशित)
मेष राशीचे चिन्ह

मेष (Aries-अ‍ॅरीज) ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी पहिली रास आहे. मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नितत्त्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे. चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत.

व्यक्तिस्वभाव[संपादन]

मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या, धीट, महत्त्वाकांक्षी, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष, कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात.

कालपुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधित त्रास, जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहऱ्याचा पक्षाघात, नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होऊ शकतात.

लाभदायक व्यवसाय[संपादन]

मेष राशीच्या स्वभावानुसार, ही रास असणाऱ्यांत नेतृत्वगुण असल्यामुळे राजकारणी, सैन्याधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

राशी

संदर्भ[संपादन]

  • अश्वलायन - जुना संदर्भ ग्रंथ
  • होरासिद्धि - जुना संदर्भ ग्रंथ
  • राशी चक्र, लेखक : शरद उपाध्ये