फ्लायअडील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोगो

फ्लायअडील ( अरबी: طيران أديل;तायरान अडील) ही जेद्दाह येथील किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थित सौदी अरेबियाची किफायतशीर विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी सौदीची ध्वजवाहक विमानकंपनी सौदीयाच्या मालकीची आहे. फ्लायअडीलचे प्रवासी मुख्यत्वे देशांतर्गत प्रवास करणारी, हज आणि उमरा यात्रेकरू आणि सौदीला भेट देणारे पर्यटक असतात.[१]

इतिहास[संपादन]

सौदीयाने १७ एप्रिल, २०१६ रोजी फ्लायअडीलच्या निर्मितीची घोषणा केली [२] [३] [४] फ्लायअडीलने २३ सप्टेंबर, २०१७ रोजी जेद्दाह ते रियाध असे पहिले उड्डाण केले. [५] त्यानंतर १० जून, २०२२ दम्माम ते कैरो असे आंतरराष्ट्रीय उड्डाण केले गेले [६]

गंतव्यस्थाने[संपादन]

देश शहर विमानतळ नोंदी संदर्भ
अझरबैजान बाकू हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ मोसमी
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सारायेव्हो सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ मोसमी
सायप्रस लार्नाका लार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळ मोसमी
इजिप्त कैरो कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ
शर्म अल-शेख शर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ मोसमी
जॉर्जिया त्बिलिसी त्बिलिसी आंतरराष्ट्रीय विमानतळ
ग्रीस हेराक्लियोन हेराक्लियोन आंतरराष्ट्रीय विमानतळ
ऱ्होड्स ऱ्होड्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
भारत कोलकाता नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ मोसमी
इराक बगदाद बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळ भविष्यात
जॉर्डन अम्मान क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
कुवेत कुवेत शहर कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
माँटेनिग्रो तिव्हात तिव्हात विमानतळ
सौदी अरेबिया आभा आभा विमानतळ
अल बहा अल बहा अंतर्देशीय विमानतळ
बिशा बिशा अंतर्देशीय विमानतळ
दम्माम किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ ठाणे
हाइल हाइल प्रादेशिक विमानतळ
होफुफ अल-अह्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ
जेद्दाह किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ ठाणे
जिझान किंग अब्दुल्ला बिन अब्दुलअझीझ विमानतळ
जौफ अल जौफ विमानतळ
मदीना प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलअझीझ विमानतळ
नाजरान नाजरान अंतर्देशीय विमानतळ
नेओम नेओम बे विमानतळ
कासिम प्रिन्स नैफ बिन अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
कुरय्यात कुरय्यात अंतर्देशीय विमानतळ
रियाध किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ ठाणे
ताबुक ताबुक प्रादेशिक विमानतळ
तैफ तैफ प्रादेशिक विमानतळ
सुदान खार्टूम खार्टूम आंतरराष्ट्रीय विमानतळ (स्थगित)
थायलंड हाट याइ हाट याइ आंतरराष्ट्रीय विमानतळ |मोसमी
Turkey अंताल्या अंताल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ मोसमी
बोद्रुम मिलास-बोद्रुम विमानतळ मोसमी
इझ्मिर इझ्मिर मेंदेरेस विमानतळ मोसमी
इस्तंबूल इस्तंबूल विमानतळ
त्राबझोन त्राबझोन विमानतळ मोसमी
संयुक्त अरब अमीराती दुबई दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमानताफा[संपादन]

ऑगस्ट २०२३ च्या सुमारास फ्लायअडीलकडे खालील प्रकारची विमाने होती:[७][८]

flyadeal फ्लीट
विमान एकूण आदेश प्रवासी नोट्स
एरबस ए३२०-२०० 11 १८६ [९] स्काय अंग्कोर एरलाइन्सकडून २ भाड्याने घेतलेली
एरबस ए३२० निओ १९ १२ १८६ सौदीयाकडून २० विमानांची मागणी हस्तांतरित. [१०]
एकूण ३० १२

दुर्घटना[संपादन]

ड्रोनने खराबी झालेले विमान (HZ-FAB) १४ महिन्यांपूर्वी जेद्दाह विमानतळावर असताना.

१० फेब्रुवारी, २०२१ रोजी सौदी अरेबियातील आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हूथी सैन्याले केलेल्या ड्रोन हल्ल्यात "HZ-FAB" नोंदणीकृत असलेले एरबस ए३२० विमानाची खराबी झाली. [११] यात कोणीही जखमी झाले नाही. विमानाची दुरुस्ती करण्यात आली आणि ते सेवेत परत आले. [१२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Hanware, Khalil (19 April 2016). "Flyadeal's launch puts Saudia at higher altitude". Arab News. Jeddah. 20 April 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Saudia Airlines announces launching flyadeal, a new low-cost carrier" (Press release). Arab Air Carriers Organization. 18 April 2016. 20 April 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Saudia launches low cost Flyadeal airline". Gulf News. Dubai. 18 April 2016. 20 April 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Saudia unveils new budget carrier, flyadeal". ch-aviation. 18 April 2016. 20 April 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "Saudi Arabia's flyadeal commences operations". ch-aviation. 25 September 2017. 1 October 2017 रोजी पाहिले.
  6. ^ ""طيران أديل" يطلقُ أولى رحلاتِه الدولية من الدمام إلى القاهرة" [Flyadeal launch its first international fly from Dammam to Cairo]. www.alriyadh.com (अरबी भाषेत). 10 June 2022. 10 June 2022 रोजी पाहिले.
  7. ^ "Flyadeal fleet details and history". Planespotters.net. 21 June 2022 रोजी पाहिले.
  8. ^ "Airbus Orders and Deliveries" (XLS). Airbus. 31 May 2022. 19 June 2022 रोजी पाहिले.
  9. ^ "what we fly". flyadeal.com. 25 September 2017 रोजी पाहिले.
  10. ^ "Saudi Arabia's flyadeal takes first A320neo". ch-aviation (इंग्रजी भाषेत). 2020-12-22 रोजी पाहिले.
  11. ^ Ranter, Harro. "ASN Aircraft accident Airbus A320-214 (WL) HZ-FAB Abha International Airport (OHB/OEAB)". aviation-safety.net. Aviation Safety Network. 2021-03-03 रोजी पाहिले.
  12. ^ "Yemen's Houthis say they carried out drone attack on Saudi airport". Reuters. 2021-02-10. 2021-03-03 रोजी पाहिले.