Jump to content

नंदुरबार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नंदुरबार जिल्हा
आदिवासी जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
नंदुरबार जिल्हा चे स्थान
नंदुरबार जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नाशिक
मुख्यालय नंदुरबार
तालुके नंदुरबार ,नवापुर ,शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी (धडगाव)
क्षेत्रफळ
 - एकूण ५,०३५ चौरस किमी (१,९४४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,०९,१३५ (२०११)
-लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
-साक्षरता दर ४६.६३%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ)
-विधानसभा मतदारसंघ अक्कलकुवानंदुरबारनवापूरशहादा
-खासदार हिना गावित (भाजपा)
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ८५९ मिलीमीटर (३३.८ इंच)
प्रमुख_शहरे नंदुरबार ,शहादा,नवापूर ,तळोदा
संकेतस्थळ


हा लेख नंदुरबार जिल्ह्याविषयी आहे. नंदुरबार शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

नंदुरबार हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी (tribal ) जिल्हा आहे, १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्रगुजरातमध्यप्रदेश राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ ५०३५ चौरस कि.मी. आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१ च्या जनगणनेनुसार). हा भाग आदिवासी बहुल असून निसर्गाच्या वैविध्याने पूर्णपणे परिपूर्ण असा आहे. तसेच अक्ककलकुुवा तालुक्यातील राजवाडी होळी हा प्रमुख सण मानला जातो. प्रामुख्याने काठीच्या आदिवासी संस्कृतीतली होळी ही मोठ्या स्वरूपात होत असून तत्पश्चात भरणाऱ्या बाजारास भोंगऱ्या म्हणतात

चतुःसीमा

[संपादन]

नंदुरबार एक आदिवासी जिल्हा आहे , जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर व खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यांत विभागली गेली आहेत.

जिल्ह्यातील तालुके

[संपादन]

पर्यटन

[संपादन]
यशवंत तलाव
  • नंदुरबार- प्रमुख आदिवासी सुसंस्कृती, जीवनशैली बाल हुतात्मा शिरीषकुमार याचे स्मारक. प्रकाशे -शहादा तालुक्यात तापी-गोमाई संगमावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ( दक्षिण काशी ) शहादा तालुक्यात उनबदेव येथे गरम पाण्याचे झरे. अक्राणी तालुक्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण.येथे यशवंत तलाव ,सिताखाईची दरी, पार्क, निसर्ग व धबधबा आहे. आदिवासी संस्कृती आणि खूप काही अक्कलकुवा येथे होराफली धबधबा.मोलगी येथील काठीची आदिवासी संस्कृती होळी ( life time amezing experiance )सातपुडा डोंगर रांगा, वन्यजीव, आणि निसर्ग सातपुडा प्रदेशमधील आदिवासी सुसंस्कृती आणि मनमोहक खेडी.हिडिंबा जंगल.
  • उमटी तालुका अक्कलकुवा: Umti Borki Waterfall उमटी बोरकी धबधबा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील उमटी गावातील मनमोहक धबधबा पर्यटकांना आकर्षित करणारा देवनंद नदीवरील धबधबा आहेत सातपुडा पर्वत क्षेत्रात हा एक सुंदर व खूप उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटन स्थान आहेत.हे मोलगी शहरापासून 10 की मी तसेच धडगाव पासून 20 कि.मी अंतरावर आहेत.!
  • दाब हे अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासीचे कुलदैवत याहा मोगी माताचे जन्म स्थान व थंड हवेचे पर्यटन स्थळ आहेत. अस्तंभा हे
  • अस्तंभा हे सातपुड्यातील सर्वात उंच शिखर 1325 मीटर उंच व अश्वथामा ऋषी महाराजचे दिवाळीच्या वेळी यात्रा भरते येथे आदिवासी बांधव धान्य ज्वारी भात मका आंबडी रोशा गवताची पूजा केली जाते हे पर्यटन स्थळ म्हणुन प्रसिद्ध आहेत.
  • तोरणमाळ हे सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे यशवंत तलाव व सिताखाईची दरी आहे आणि एक धबधबाही आहे.
  • उनपदेव-सुनपदेव (शहादा तालुका) येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
  • प्रकाशा हे शहादा मधील शंकराचे जागृत देवस्थान आहे, हे तापी नदीच्या काठावर वसलेले आहे.

नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभाविधानसभा मतदार संघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आदिवासी मतदार संघ आहेत.

जमाती  :-

पाडवी -भिल्ल, पावरा, तडवी-भिल्ल, वळवी, वसावे ,टोकरे कोळी, ढोर कोळी , महादेव कोळी , कोकणा-कोकणी, गावित, मावची, धानका, इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आहेत.