Jump to content

दालन:मराठवाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


 मराठवाडा

मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी खोर्यात वसलेला एक भाग असून आठ जिल्ह्याचा त्यात समावेश होत्तो.औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे.पैठण चे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकिय उत्कर्षाचा काळ होता.पैठणचे धार्मिक महत्त्व पण मोठे होते.अजिंठा-वेरूळची लेणी मराठवाड्याचा मानबिंदू आहे.

संक्षिप्त सूची

मराठवाडा - औरंगाबाद - जालना - परभणी - नांदेड - लातूर - बीड - उस्मानाबाद - हिंगोली.


 विशेष लेख

होट्टल येथील शिल्पसंपदा

होट्टल येथील चालुक्यकालीन मंदिरे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असलेल्या होट्टल गावातील चालुक्यकालीन मंदिरे व शिल्पस्थापत्य अवशेष आहेत. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असणारे होट्टल हे गाव चालुक्यकालीन शिल्पस्थापत्य अवशेषांचे आगारच आहे. या गावात अनेक मंदिरे चालुक्यांच्या राजवटीत बांधली गेलेली होती. त्यामध्ये सिद्धेश्वर, परमेश्वर, महादेव, सोमेश्वर, रोकबेश्वर, त्रैपुरुषदेव या मंदिरांचा समावेश होतो. यातील काही मंदिरे आजही चांगल्या स्थितीत आहेत तर काही उध्वस्त झालेली तर काही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. एका दृष्टीने ही मंदिरनगरी म्हणून चालुक्य काळात अस्तित्वात असावी. मंदिरस्थापत्याचा अप्रतिम अविष्कार येथे पहायला मिळतो. होट्टल येथील शिल्पसंपदा फक्त मराठवाड्याचीच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची सौभाग्यलेणी ठरावीत अशी आहे.

आणखी वाचा


 मराठवाड्यातील घटना

  • नांदेडहून राजस्थानातील श्रीगंगानगर आता थेट रेल्वेने जोडले गेले आहे त्यामुळे नांदेड पूर्णा अकोला मार्गेही दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध झाली आहे
  • औरंगाबादचा विमानतळ हा आंतराष्ट्रीय विमानतळ झाला आहे
  • मराठवाड्यात शेंद्रा औरंगाबाद जिल्हा आणि कृष्णुर नांदेड जिल्हा या दोन पंचतारांकित औद्योगिक वसाहती आहेत.
  • मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद येथे नभोवाणी केंद्रे आहेत

 तुम्ही काय करू शकता

चित्र:Jayakwadigate.jpg