नफा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एखाद्या उत्पादनाच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न आणि त्या उत्पादनाच्या निर्मितीसाठी केला गेलेला खर्च यांच्यातील फरकास, तो धन संख्या असल्यास नफा असे म्हणतात.

जर निर्मितीचा खर्च विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल, तर त्या विक्रीतून तोटा होतो.

उदा. जर एका खुर्चीच्या निर्मितीत शंभर रूपये खर्च आला, आणि ती खुर्ची दीडशे रूपयास विकली गेली, तर ह्या खुर्चीच्या व्यवहारात पन्नास (दीडशे वजा शंभर) रूपये फायदा झाला असे म्हणतात.