ऋणको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऋणको ही कर्ज घेणारी व्यक्ती होय. ज्याने पैसे दिले त्याच्या म्हणजे धनकोच्या, लेखापुस्तकात ऋणकोचे खाते नावे रक्कम शिल्लक दाखवते. बँकेने एखाद्या व्यक्तीस कर्ज दिले असेल तर कर्जाचे खाते नावे रक्कम दाखवेल. व्यवसायाच्या ताळेबंदात ऋणकोच्या खात्यावरील नावे रक्कम ही मालमत्ता म्हणून दाखवली जाते.