घसारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाणिज्यात घसारा ही सततच्या वापरामुळे कुठल्याही मालमत्तेच्या किमतीमध्ये होणाऱ्या घसरण होय.

व्यावसायिक संकल्पना[संपादन]

मालमत्तेवरील घसारा हा व्यवसायासाठी खर्च म्हणून मोजला जातो. कर नियमाप्रमाणे निर्धारित दराप्रमाणे घसारा मोजून तेवढी रक्कम खर्चात मोजण्याची परवानगी असते. घसारा मोजताना व्यवसायाला रोख रक्कम द्यावी लागत नाही पण एखाद्या मालमत्तेच्या वापरामुळे जी झीज झालेली असते तिचे मूल्यमापन काही आधारावर करणे एवढेच अपेक्षित असते. घसाऱ्यामुळे मालमत्तेच्या खात्यावरील शिल्लक रक्कम कमी होत जाते. दुसरीकडे घसाऱ्याएवढी रक्कम फायद्यातून बाजूला काढून घसारा फंड बनवला जातो. हा फंड वापरून नवी मालमत्ता विकत घेता येऊ शकते.

मालमत्तेचे वापरयोग्य वय लक्षात घेऊन घसाऱ्याचा दर ठरवला जातो. उदा. मोटरकार वरील घसारा २० टक्के प्रतिवर्ष दराने मोजला जातो. म्हणजे एका मोटरकारचे आयुष्य ५ वर्षे मानले जाते. उद्योगासाठी घेतलेल्या कारच्या खरेदी किंमतीच्या २० टक्के रक्कम दरवर्षी घसारा म्हणून फायद्यातून कमी करता येईल. या मुळे अंतिम फायद्याची रक्कम कमी होऊन कर कमी भरावा लागेल

मोजण्याच्या पद्धती[संपादन]

१) ठराविक दराने घसारा मोजणे - घसाऱ्याचा ठरवून दिलेला दर वापरून दरवर्षी ठराविक रक्कम घसारा म्हणून कमी करणे.

या पद्धतीत वार्षिक घसारा = मालमत्तेचे मूल्य वजा उर्वरित मूल्य (भंगार मध्ये गेल्यास मिळणारी रक्कम ) भागिले मालमत्तेचे अपेक्षित वापरयोग्य वय

२) घसरत्या दराने मोजलेला घसारा - मालमत्तेचे मूल्य दरवर्षी कमी होत असते त्यामुळे या कमी झालेल्या मूल्यावर पुढील वर्षीचा घसारा मोजणे.