खाते उतारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खाते उतारा ही बॅंकग्राहकाच्या चालू खात्यातील सर्व व्यवहारांची नोंद होय. साधारणतः खाते उतारा एक महिन्यासाठी दिला जातो.

खाते उताऱ्यात बहुधा खालील गोष्टींचा समावेश असतो.

१) खातेदाराचे नाव सुदाम मुराडे

२) खात्याचा क्रमांक 747

३) खाते उताऱ्याचा कालावधी (कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत)

४) महिन्याच्या सुरुवातीला असणारी खात्यातील जमा रक्कम

५) संपूर्ण महिन्यात जमा आणि नावे झालेले सर्व व्यवहार

६) प्रत्येक व्यवहाराची तारीख

७) जमा किंवा नावे व्यवहाराची रक्कम

८) व्यवहाराचा तपशील

९) प्रत्येक व्यवहारानंतर खात्याच्या शिलकीत झालेला बदल

१०) महिनाअखेरीस खात्यामध्ये शिल्लक असणारी रक्कम.

भारतातील बॅंकांमध्ये ग्राहकाला दरमहा एक खाते उतारा मोफत दिला जातो. पण काही कारणाने एकापेक्षा जास्त प्रती हव्या असतील तर त्याबद्दल सेवा शुल्क द्यावे लागते.सध्या, नेट बँकिंग वापरणारे ग्राहक, संबंधीत बॅंकेच्या संकेतस्थळावरून आपणास हव्या त्या कालावधीचा उतारा अधिभारण करून घेऊ शकतात. यासाठी कोणतेही शुल्क देय नाही.पण, वेगवेगळ्या बॅंकामध्ये वेगवेगळी प्रथा प्रचलित आहे.

मालकीच्या जमिनीच्या बाबतीतील खाते उतारे[संपादन]

सात बाराचा उतारा[संपादन]

हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी महसूल विभागातर्फे दिलेला शासकीय अभिलेख आहे. क्रमांक ७ व क्रमांक १२ ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या कायद्यातली विशेष कलमे आहेत. पहा: सात बाराचा उतारा

८अ चा उताराSubhansing amrsing changal[संपादन]

गाव नमुना नं. ८अ म्हणजे खातेदारांची नोंदवही.