Jump to content

तारण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाणिज्य परिभाषेत तारण ठेवणे म्हणजे कर्ज घेण्यासाठी एखादी मालमत्ता कर्जदाराकडे देण्याची तयारी ठेवणे होय. तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा कर्जदाराकडेच असतो. जर कर्जाची परतफेड करता आली नाही तर धनको या तारण ठेवलेल्या मालमत्तेला ताब्यात घेऊन विकू शकतो व आपल्या कर्जाची वसुली करू शकतो.

गहाण आणि तारण यातील फरक[संपादन]

गहाण ठेवणे आणि तारण ठेवणे यात फरक आहे. दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले जाते तेव्हा दागिन्याचा ताबा धनकोकडे जातो. जो पर्यंत कर्ज आहे तो पर्यंत गहाण ठेवलेली मालमत्ता धनकोच्या ताब्यात असते. तारण ठेवण्याला काही जण 'नजर गहाण ठेवणे' असेही म्हणतात

नजर गहाण[संपादन]

तारण ठेवलेली मालमत्ता कर्जदाराच्या ताब्यात असते. या मालमत्तेचा वापर करून जे उत्पन्न कमावले जाते त्या वर कर्जदाराचा अधिकार असतो. नजर गहाण ठेवणे म्हणे मालमत्तेची मालकी हस्तांतरित करणे नव्हे तर कर्ज परतेफेड न झाल्यास धनकोच्या मालकीचा अधिकार मान्य करणे होय.

चल मालमत्ता उदा. वाहन, दुकानातील माल, ऋणकोची यादी नजर गहाण ठेवता येतात.

तारणाची नोंद[संपादन]

एखादे कर्ज देताना धनको आपल्याला देऊ केलेल्या तारण मालमत्तेची नोंद सरकारकडे करु शकतो. शासकीय निबंधकाकडे विहित नोंदणी शुल्क भरून जमीन किंवा घरासारख्या अचल मालमत्तेवरील तारणाची नोंद करता येते.

तारणाच्या नोंदीमुळे कर्ज फिटण्यापूर्वी अशी मालमत्ता विकली गेल्यास आलेल्या रकमेवर पहिला अधिकार धनकोचा असतो. नोंदणी शुल्क भरलेले असल्याने शासकीयदृष्ट्या व्यवहार वैध ठरतो.

वाहन किंवा दुकानातील माल यासारख्या चल मालमत्तेच्या बाबतीत तारणाची माहिती वाहनावर, वाहनाच्या पंजीकरण पुस्तिकेवर अथवा दुकानात नोंदवली जाते अथवा मोठ्या अक्षरात लिहिली जाते.

तारण - ख्रिस्ती धर्मशास्त्रीय अर्थ[संपादन]

तारण हा शब्द ख्रिस्ती धर्मात परमेश्वराने केलेली मानवाच्या पापांची क्षमा या अर्थाने वापरला जातो. मराठी-संस्कृृतमध्ये तारण म्हणजे तरून जाणे, रक्षण किंवा मुक्ती.