चालू खाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चालू खाते हे बँक आणि इतर वित्तसंस्थांमधील एक प्रकारचे ठेवखाते आहे.

हे खाते सहसा धंद्यासाठी किंवा सारखी उठाठेव लागणाऱ्या व्यवसायांसाठी वापरले जाते.हे खाते व्यावसायिक , उद्योजक , व्यापारी  यांच्याकडून उघडले जाते

भारतातील चालू खात्यांचे काही गुणधर्म[संपादन]

  • या खात्यावर जी रक्कम जमा असते तिच्यावर व्याज दिले जात नाही
  • विविध प्रकारच्या सेवा उदा. धनादेश, ए टी एम, जालिय बँकिंग ( इंटर नेट बँकिंग) सशुल्क दिल्या जातात.
  • या खात्यावर कितीही व्यवहार केले जाऊ शकतात. दर दिवशी किंवा दर महिन्याला ठराविकपेक्षा कमी व्यवहार करण्याचे बंधन नसते.
  • किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास बँक दंड करू शकते.
  • चालू खात्यामध्ये ठेवण्याची किमान रक्कम इतरांपेक्षा अधिक ठेवून इतर काही सवलती मोफत देण्याची पद्धत बँकांनी आजकाल चालू केली आहे.
  • या खात्यासाठी बॅॅंकेकडुन पासबुक दिले जात नाही , खाते तपशील  पाहण्यासाठी  विवरणपत्र  दिले  जाते