जमैका राष्ट्रीय फुटबॉल संघ
Appearance
जमैका फुटबॉल संघ (फिफा संकेत: JAM) हा कॅरिबियनमधील जमैका देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला जमैका सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ७५ व्या स्थानावर आहे. जमैकाने १९९८ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली होती. जमैका आजवर १० कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला असून १९९३ साली त्याला तिसरे स्थान मिळाले होते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत