बेलीझ फुटबॉल संघ
Jump to navigation
Jump to search
बेलीझ फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Belice; फिफा संकेत: BLZ) हा मध्य अमेरिकेमधील बेलीझ देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ मंडळाचा सदस्य असलेला बेलीझ सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६१ व्या स्थानावर आहे. आजवर बेलीझ एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही. बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील सर्वात कमकुवत संघ समजला जातो.