नंदकिशोर कपोते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. नंदकिशोर कपोते हे एक कथ्थक नर्तक आहेत. पिंपरी चिंचवडमधील यमुनानगर (निगडी) येथे त्यांची ‘नंदकिशोर कल्चरल सोसायटी’ नावाची गायन, नृत्य, वाद्यवादन, हिंदुस्तानी शास्त्रीय कंठ संगीत, कर्नाटक कंठ संगीत आदी कला शिकवणारी संस्था आहे. नंदकिशोर कपोते यांनी दिल्लीत पं. बिरजू महाराज यांच्या घरी दहा वर्षे राहून नृत्यशिक्षण घेतले. नंदकिशोर कपोते यांनी कथक नृत्यात पी.एच.डी मिळवली आहे. पं. कपोते हे दूरदर्शनचे ग्रेड प्राप्त कथ्थक नर्तक आहेत. त्यांचे अमेरिका, कॅनडा, कुवेत, जपान, रशिया, हॉलंड आदी देशांमध्ये तसेच मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनवर कथक नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत.

डॉ. पं. नंदकिशोर कपोते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संगीत अकादमीचे मानद सल्लागार आहेत.[१]

नंदकिशोर कपोते हे १९९१पासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या नृत्यनाटिकेचे प्रयोग करत आले आहेत. या नृत्यनाटिकेत सुमारे ७० कलाकार काम करतात. २५ वर्षांत या नृत्यनाटिकेचे अनेक प्रयोग झाले आहेत.

डॉ. नंदकिशोर कपोते यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची कथक नृत्यातील संशोधनासाठी सीनियर फेलोशिप जाहीर झाली आहे (२०१७). संपूर्ण भारतात कथक नृत्यासाठी ही सीनियर फेलोशीप मिळविणारे डॉ. नंदकिशोर कपोते हे पहिले नर्तक आहे. या फेलोशिपच्या माध्यमांतून डॉ. पं. नंदकिशोर कपोते हे प्राचीन ग्रंथ ‘अभिनयदर्पण’ आणि नाट्यशास्त्र यांतील हस्तमुद्रा आणि कथकनृत्य यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर संशोधन करतील.

कथक - इंडियन क्लासिकल डान्स आर्ट या पुस्तकाचे लेखक डॉ. सुनील कोठारी यांनी लिहिले आहे - तरुण पिढीपासून अनेक नर्तक उल्लेखनीय आहेत - त्यामध्ये नंदकिशोर कपोते यांचा समावेश आहे.[२]

पुरस्कार[संपादन]

 • सिंगार मणी पुरस्कार(१९८१)[३]
 • लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड-लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ७६ वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तीस शिकवण्याकरिता सूचीबद्ध केले आहे(१९९१-९४).[४]
 • नेहरू पुरस्कार(२००३)[५]
 • महाराष्ट्र राज्य शासनाचा वतीने सांस्कृतिक पुरस्कार-महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार(२००४).[६]
 • महाराष्ट्र राज्य शासनाचा वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार (२०१०)[७]
 • पुणे नवरात्रिमहोत्सव पुरस्कार (लक्ष्मी कला संस्कृती पुरस्कार)(२०१०)[८]
 • ब्रह्मानंद कला मंडळाचा ब्रह्मनाद कलागौरव पुरस्कार (एप्रिल २०१४)
 • पुणे महानगरपालिकेतर्फे `बालगंधर्व पुरस्कार (जून २०१४)[९]
 • सांस्कृतिक मंत्रालय ,भारत सरकार कडून वरिष्ठ फेलोशिप (२०१५).[१०]
 • सलाम पुणे पुरस्कार (२०१५)[११]
 • सुवर्णगौरवपुरस्कार (२०१६)
 • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै २०१७)[१२]

डीव्हीडी[संपादन]

शिव राम श्याम “, कथक शैलीचे नृत्यदिग्दर्शन डॉ. कपोते यांनी या डीव्हीडीमध्ये केले आहे. ही डीव्हीडी फाउंटेन म्युझिक कंपनीने रीलिझ केली आहे.याव्यतिरिक्त, डॉ कपोते यांनी या व्हीसीडीमध्ये शिवभजनावर कथक शैलीची प्रस्तुती दिली आहे.[१३]

पुस्तके[संपादन]

 • कथक सम्राट-बिरजू महाराज

पुस्तकाची शिफारस पुणे विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने केली आहे. या पुस्तकाचे उद्घाटन पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांनी २००६ साली स्वतः नंदकिशोर कल्चरल सोसायटी,निगडी येथे केले.[१४]

 • भारतीय जनजातीचा विश्वकोश प्रोफाइल

डॉ. कपोते यांनी भारतीय परिचयातील आदिवासी नृत्य या नावाचा पहिला अध्याय लिहिला आहे.[१५]

नृत्य प्रदर्शन[संपादन]

डॉ. कपोते यांच्या नृत्य कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नृत्य प्रदर्शन केले आहेत. त्याच्या काही प्रदर्शन उल्लेख खाली दिले आहे.

 • नृत्याचा राष्ट्रीय कार्यक्रमः दिल्ली दूरदर्शनच्या ग्रेड 'ए' कलाकार आणि राष्ट्रीय दूरचित्रवाणीच्या ‘नृत्याचा राष्ट्रीय कार्यक्रम’ अनेक वेळा सादर केला.[१६]
 • बॅले प्रोडक्शन्स निर्मित पं. बिरजू महाराज. कथा रघुनाथकी, होरी धूम मचाई, रूपमती-बाज बहादूर, हब्बा खातून आणि कृष्णनयन अश्या असंख्य नृत्ये सादर केली.[१७]
 • अम्माच्या पुण्यात आगमन झाल्याबद्दल माता अमृतानंदमयी यांना आदारांजली म्हणून नृत्य सादर केले.[१८]
 • आयसीसीआर (इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स, दिल्ली) यांनी त्यांच्या कार्यक्रमाचे वर्णन १९९१-९२ मध्ये पुण्यातील बाल गंधर्व रंग मंदिरात नोंदली गेली [१९]. ५२ मिनिटांच्या या कार्यक्रमामध्ये ‘विष्णू वंदना’, ‘द्रौपदी वस्त्र हरण’, ‘भजन’ आणि एक तराना यांचा समावेश आहे. तबला वादक सोबत पद्मश्री प्राप्तकर्ता विजय घाटे आहेत.

संदर्भ[संपादन]

 1. ^ "enjoy the anniversary of the academy of music | संगीत अकादमीचा वर्धापनदिन उत्साहात - Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-06-22 रोजी पाहिले.
 2. ^ "kathak indian classical dance art book pages". https://books.google.co.in. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 3. ^ Banerji, Projesh. (1986). Dance in thumri. New Delhi: Abhinav Publications. ISBN 8170172128. OCLC 16262152.
 4. ^ "Limca book of records:India ather Best". https://books.google.co.in/books. 12 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 5. ^ "Department of Culture fellowship for Pandit Nandakishore Kapote". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-11-12 रोजी पाहिले.
 6. ^ "Naik, Kulkarni bag Ba-Bapu awards Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/206890.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst". https://timesofindia.indiatimes.com/. 12 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ=, |title= (सहाय्य)
 7. ^ "Department of Culture fellowship for Pandit Nandakishore Kapote". https://indianexpress.com. 12 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 8. ^ सराफ जोशी, मानसी. "Pune comes alive for Navratri celebrations". www.ndtv.com. 28 सप्टेंबर 2019 रोजी पाहिले.
 9. ^ "Department of Culture fellowship for Pandit Nandakishore Kapote". https://indianexpress.com/. 12 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 10. ^ "Department of Culture fellowship for Pandit Nandakishore Kapote". https://indianexpress.com. 12 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 11. ^ "Salaam Pune Award for Manoj Joshi's Chanakya". https://marathistars.com. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 12. ^ "'चित्रकर्मी पुरस्कार' देऊन १७ कलावंतांचा सन्मान | eSakal". www.esakal.com. 2019-11-12 रोजी पाहिले.
 13. ^ "Shiv, Ram, Shyam (Filmi Bhajan)". http://www.fountainmusiccompany.com. Archived from the original on 2019-09-23. 12 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 14. ^ "Dr. Nandkishore Kapote: I want to take Kathak to new heights". http://www.narthaki.com. 12 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 15. ^ "An introduction to Tribal dance of India". https://books.google.co.in/books. 12 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 16. ^ https://narthaki.com/info/intervw/intrv190.html. 22 डिसेंबर 2019 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
 17. ^ https://books.google.co.in/books?id=lsuhSiITjU8C&pg=PA94&lpg=PA94&dq=nandkishore+kapote&redir_esc=y&hl=en#v=onepage&q=nandkishore%20kapote&f=false. Missing or empty |title= (सहाय्य)
 18. ^ https://www.amritapuri.org/on/pune. 22 डिसेंबर 2019 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
 19. ^ http://ncaa.gov.in/repository/search/displaySearchRecordPreview/ICCR-2446-VHS. 22 डिसेंबर 2019 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)