मनीषा साठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मनीषा साठे (२६ मे, १९५३ ) या कथक नृत्यांगना आणि गुरू आहेत.

शिक्षण[संपादन]

त्यांनी कथक नृत्याचे शिक्षण लहान वयात पुण्यात पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे घेतले.पुढे त्यांनी पं. गोपीकृष्ण यांच्याकडे मुंबई येथे शिक्षण सुरू ठेवले.

कारकीर्द[संपादन]

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव, लखनौ नृत्य महोत्सव, गुवाहाटी येथील कामाख्या महोत्सव, मुंबईमधील नेहरू सेंटर आणि टाटा थिएटर अशा भारतातील विविध ठिकाणी कथक नृत्य सादर केले आहे. तसेच भारताबाहेर अमेरिका, चीन, बहरैन, स्वित्झर्लंड, स्वीडन, इ. देशात त्यांनी कार्यक्रम केले आहेत. कथक नृत्यात आधुनिक संगीत आणि विश्व संगीताचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी जपानी संगीताबरोबरही कथक सादर केले आहे. जपानी संगीतकार आणि ताईको वादक यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर त्यांनी गेल्या १५ वर्षांत अनेक फ्युजन मैफली सादर केल्या आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात योगदान[संपादन]

त्या पुणे विद्यापीठातील ललित कलाकेंद्र, भारती विद्यापीठ, पुणे, व्हिडिओकॉन अकादमी, अहमदनगर येथे अभ्यागत प्राध्यापिका म्हणून शिकवतात. तसेच पुणे विद्यापीठात पी.एच.डी.साठी मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम करतात. त्यांची कन्या आणि शिष्या शांभवी दांडेकर प्रख्यात कथक नृत्यांगना आहे. त्यांची स्नुषा तेजस्विनी साठे ही सुद्धा त्यांचा वारसा पुढे चालवत आहे.

नृत्यदिग्दर्शन[संपादन]

त्यांनी सरकारनामा आणि वारसा लक्ष्मीचा यांसह अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि अल्फा टी.व्ही. पुरस्कार सोहोळ्यात त्यांना सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.

संस्था[संपादन]

साठे मनीषा नृत्यालय ट्रस्ट या नावाची कथक नृत्याचे शिक्षण देणारी संस्था चालवतात. त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याची शिष्यवृती मिळाली आहे.

पुरस्कार[संपादन]

 • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार २००६
 • गानवर्धनचा विजया भालेराव पुरस्कार
 • सिटाडेल एक्सलन्स ॲवार्ड
 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री.गोळवलकर गुरुजी पुरस्कार
 • अजित सोमण स्मृती पुरस्कार
 • अशोक परांजपे पुरस्कार
 • पं.रोहिणी भाटे पुरस्कार

संदर्भ[संपादन]

[१]

हे सुद्धा पाहा[संपादन]

[२] [३]

[४]

 1. ^ अधिकृत संकेतस्थळ [१]
 2. ^ मनीषा साठे यांची 'ऐसी अक्षरे' मधील मुलाखत [[२]]
 3. ^ मनीषा साठे यांची मुलाखत [[३]]
 4. ^ मनीषा साठे यांनी सादर केलेली चंचल नायिका [[४]]