मणिपुरी नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मणिपुरी ही मणिपूर राज्यातील अभिजात भारतीय नृत्यशैली आहे.

मणिपुरी शैलीतील रासलीला
मणिपुरी नर्तक

मणिपुरी शैलीचा उगम प्रामुख्याने पूजाविधी या स्वरूपात झाला. मणिपुरमध्ये वैष्णव पंथाच्या प्रसारासोबत या नृत्यास उत्तेजन मिळाले. पंधरावे ते अठरावे शतक हा मणिपुरी नृत्याच्या विकासाचा काळ मानला जातो. हे नृत्य शब्दाधारित असते. १९१९ साली रवींद्रनाथ टागोर यांनी सिल्हेट येथील बिष्णुप्रिय़ा मणिपुरी लोकांचे नृत्य पाहिले. या नृत्याने प्रभावित होऊन त्यांनी याचे प्रशिक्षण शांतीनिकेतन येथे सुरू केले. त्यासाठी त्यांनी नीलेश्बर मुखर्जी, गुरु बुद्धिमन्त सिंह (त्रिपुरा) व गुरु सेनारिक सिंह राजकुमार (आसाम) यांना आमंत्रित केले.

मणिपुरी नृत्याची २ रूपे आहेत.

  • रास

राधा कृष्ण गोपी या विषयावरिल नृत्य

  • संकीर्तन

संकीर्तन हे प्रामुख्याने पुरुषांद्वारा खोल (पंग) नावाचे वाद्य घेऊन केले जाते.

बाह्य दुवे[संपादन]

मणिपुरी नृत्य[मृत दुवा]