टीना तांबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

टीना तांबे ह्या जयपूर घराणा शैलीचा कथक नृत्यांगना आहेत.[१] तांबे या गुरू उमा डोगरा यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक आहेत. त्या वयाच्या सहाव्या वर्षापासून कथक नृत्य करत आहेत. त्या कथक नृत्याचे शिक्षण देतात. तसेच कथक नृत्यांचे दिग्दर्शनसुद्धा करतात. त्यांनी देशातल्या अनेक प्रमुख नृत्य महोत्सवात आणि अंतरराष्ट्रीय[२] पातळीवर नृत्याविष्कार केले आहे.[३][४][५][६]

व्यक्तिगत जीवन[संपादन]

टिना यांचा जन्म इंदूर (मध्य प्रदेश) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव कुमुदिनी आणि वडिलांचे नाव अशोक देवळे आहे.

टीना तांबे
जन्म टीना देवळे
१८ जुन, १९७७
इंदूर, मध्यप्रदेश
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण नृत्य अलंकार(कथक), अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई एम. ए. (नृत्य), बी.एस .सी. आणि डिप्लोमा इन इंटिरियर डिसाईनिंग, देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर पीएचडी, विक्रम विद्यापीठ, उज्जैन
पेशा कथक नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका आणि नटी
पुरस्कार नालंदा नृत्य निपुण पुरस्कार, सिंगारमणि, पंडित कार्तिकराम कलानिधी पुरस्कार, कुमार सानू संगीत पुरस्कार
संकेतस्थळ
www.tinatambe.com

शिक्षण  [संपादन]

टीनानी कथक नृत्याची प्रारंभिक शिक्षा पुरु दधीचच्या शिष्या रंजना ठाकूर यांच्याशी घेतली आणि सुचित्रा हरमळकर यांचा निदर्शनात एम ए (नृत्य) पदवी मिळवली. नंतर संस्कृती विभाग (भारत सरकार)ची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी कथकची प्रगत शिक्षा गुरू उमा डोगरा यांच्याशी मुंबई येथे घेतली. 'मीरा (कृष्णभक्त) के काव्य में नृत्य तत्त्व - कथक के संदर्भ में' विषया वर त्यांचा संशोधना साठी त्यांना विक्रम विद्यापीठ, उज्जैन कडून डॉक्टरेटची उपाधी देण्यात आली.  टीना यांनी देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर मधून विज्ञान मध्ये पदवी आणि आंतरिक साजसज्जाचा डिप्लोमा देखील  केला आहे.   

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

वर्ष १९९८, १९९९, २००० आणि २००१ च्या दरम्यान त्यांनी देवी अहिल्या विद्यापीठ चं प्रतिनिधित्व करून असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीस (AIU)च्या युथ फेस्टिवल मध्ये एकल नृत्य प्रतियोगितेत राज्य, झोन आणि राष्ट्रीय पातळी वर अनेक पुरस्कार पटकावले.     

टिना तांबे यांना २००३ साली सुरसिंगार संसद तर्फे "सिंगारमणी' आणि २००९ साली नालंदा डान्स अँड रिसर्च सेंटर तर्फे "नृत्य निपुण" पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Dave, Ranjana (2016-05-04). "Showcasing the nuance in dance" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  2. ^ "India's one of accomplished dancers, Dr. Tina Tambe presents a Kathak recital". The Sunday Times Sri Lanka. 2021-12-31 रोजी पाहिले.
  3. ^ "मैंने मीरा के गीतों में नृत्य की असीम संभावनाएं खोजीं". दैनिक भास्कर. 2019.
  4. ^ "Kathak recital by Dr Tina Tambe".
  5. ^ "Dr. Tina Tambe | Bollywood Festival". web.archive.org. 2019-07-26. 2021-08-28 रोजी पाहिले.
  6. ^ Kumar, Bhanu (2019-06-27). "Kalaarpan Festival — focus on Kathak" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.