कत्थक नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शास्त्रीय नृत्याचे सात प्रकार आहे. कत्थक, भरतनाट्यम, मोहिनीअटम, कथकली, ओडिसी इ. असे सात प्रकार आहेत. त्यापैकी कत्थक नृत्य हे उत्तरप्रदेशाचे नृत्य आहे. कथनं करोति कथक: म्हणजेच कथा सांगणारा तो कथक अशी त्याची व्याख्या सांगितली आहे.

इतिहास

कथ्थक नृत्याची उत्पत्ती भगवान श्रीकृष्णाच्या काळात झाली असे मानले जाते. गोकुळात गोपगोपी नृत्य करीत त्या नृत्यास रासनृत्य म्हटले जाई. त्या नृत्यात काही बदल करुन कथ्थक नृत्य प्रसिद्ध झाले. मुघलपूर्व काळात हे नृत्य मंदिरात केले जात असे. रंगमंच प्रणाम, राधाकृष्णाची गाणी इ. प्रकार तेव्हा केले जात असत.

मुघल काळात या नृत्यात अनेक बदल झाले. मंदिरात नाचले जाणारे हे नृत्य दरबारात आले.त्यानंतर या नृत्यात अनेक बदल झाले. दरबारात शोभून दिसतील अशा प्रकारांची त्यात भर घातली गेली. रंगमंच प्रणाम ची जागा सलामीने घेतली.आमद हा नविन प्रकार नाचण्यास सुरुवात झाली.आमदा हा फारसी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ आगमन करणे होय. पोशाखातही फार बदल झाले.