इ.स. १९९२
Appearance
(ई.स. १९९२ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९८९ - १९९० - १९९१ - १९९२ - १९९३ - १९९४ - १९९५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी १६ - एल साल्व्हाडोर सरकार व क्रांतिकारकांनी मेक्सिको सिटीत चापुल्तेपेकचा तह मान्य केला व १२ वर्षे चाललेले गृहयुद्ध संपवले.
- फेब्रुवारी १ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले.
- फेब्रुवारी ७ - युरोपीय संघाची रचना.
- मार्च २ - उझबेकिस्तान व मोल्डाव्हियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- एप्रिल १८ - अफगाणिस्तानमध्ये जनरल अब्दुल रशीद दोस्तमने अहमद शाह मसूदशी हातमिळवणी करून राष्ट्राध्यक्ष नजिबुल्लाह विरुद्ध उठाव केला.
- एप्रिल २७ - सर्बिया व मॉन्टेनिग्रोने एकत्र येउन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकची स्थापना केली.
- मे ९ - प्लिमथ, नोव्हा स्कॉशिया येथील वेस्ट्रे खाणीत स्फोट. २६ कामगार ठार.
- मे ११ - फिलिपाईन्समध्ये निवडणुका. जनरल फिदेल रामोस विजयी.
- मे १६ - स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल.
- मे १८ - अमेरिकेच्या संविधानातील २७वा बदल अधिकृतरीत्या मान्य.
- जुलै १० - मादक द्रव्यांच्या तस्करी बद्दल पनामाच्या भूतपूर्व अध्यक्ष मनुएल नोरिगाला फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
- जुलै २० - वाक्लाव हावेलने चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- जुलै २० - टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार.
- जुलै ३१ - थाई एरवेझचे एरबस ए.३०० प्रकारचे विमान नेपाळची राजधानी काठमांडूजवळ कोसळले. ११३ ठार.
- डिसेंबर २९ - ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो कोलोर डी मेलोने राजीनामा दिला.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- डिसेंबर २९ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.
- फेब्रुवारी १० - ऍलेक्स हेली, अमेरिकन लेखक.
- फेब्रुवारी २२ - बोड्डेपल्ली राजगोपाल राव, भारतीय राजकारणी आणि श्रीकाकुलमचे खासदार
- मार्च ६ - रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक.
- जून ७ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.
- जून २९ - मोहम्मद बुदियाफ, अल्जिरीयाचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर २४ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
- सप्टेंबर ३० - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.
- ऑक्टोबर ५ - परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी.