इ.स. १९६७
Appearance
(ई.स. १९६७ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे |
वर्षे: | १९६४ - १९६५ - १९६६ - १९६७ - १९६८ - १९६९ - १९७० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी ७ - अलाबामात मॉंटगोमेरी शहरातील हॉटेलला आग. २५ ठार.
- फेब्रुवारी २७ - डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- एप्रिल २० - स्वित्झर्लंडचे विमान कॅनडाच्या टोरोंटो शहराजवळ कोसळले. १२६ ठार.
- एप्रिल २१ - ग्रीसमध्ये कर्नल जॉर्ज पापादोपोलसने सत्ता बळकावली.
- एप्रिल २४ - रशियाचे अंतराळयान सोयुझ १ कोसळले. अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी.
- मे ३० - नायजेरियाच्या बियाफ्रा राज्याने विभक्त होण्याचे ठरवले. गृहयुद्धास सुरुवात.
- जून ८ - सहा दिवसांचे युद्ध - इस्रायेलच्या लढाउ विमानांनी चकुन अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. लिबर्टी वर हल्ला केला. ३४ ठार, १७१ जखमी.
- जून २७ - लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. सुरू.
- जून २८ - इस्रायेलने जेरुसलेमचा पूर्व भाग बळकावला.
- जुलै ६ - नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले.
- जुलै १० - न्यु झीलॅंडने आपले चलन दशमान पद्धतीत आणले.
- जुलै १२ - नुवार्क, न्यु जर्सी शहरात वांशिक दंगली. २७ ठार.
- जुलै १९ - पीडमॉॅंट एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान सेसना ३१०शी अमेरिकेतील हेंडर्सनव्हिल शहराजवळ धडकले. ८२ ठार.
- ऑगस्ट १ - इस्रायेलने पूर्व जेरुसलेम बळकावले.
- ऑगस्ट ७ - व्हियेतनाम युद्ध - चीनने उत्तर व्हियेतनामला मदत करण्याचे जाहीर केले.
जन्म
[संपादन]- मार्च ११ - ऍण्ड्र्यू जेझर्स, क्रिकेट खेळाडू, इ.स. १९८७ मधील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सहभाग.
- जुलै १४ - हशन तिलकरत्ने, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै १८ - व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता.
- सप्टेंबर ७ - स्टीव जेम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - मायकेल जॉन्सन, अमेरिकन धावपटू.
- सप्टेंबर २८ - मीरा सोर्व्हिनो, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी ३ - जॅक रूबी, ली हार्वे ऑस्वाल्डचा मारेकरी.
- एप्रिल १९ - कॉन्राड अडेनॉउअर, जर्मनीचा चान्सेलर.
- जुलै ७ - विव्हियन ली, इंग्लिश अभिनेत्री.
- ऑगस्ट ४ - पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर ३ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.