इस्लास देला बाहिया
Appearance
इस्लास देला बाहिया तथा बे आयलंड्स हा होन्डुरासच्या अठरापैकी एक प्रांत आहे. तीन मोठे द्वीपसमूह व इतर अनेक छोट्या बेटांचा हा प्रांत देशाच्या उत्तरेस कॅरिबियन समुद्रात आहे. याची राजधानी रोआतान आहे.
इस्लास देला बाहियामधील तीन मोठे द्वीपसमूह स्वान आयलंड्स, इस्लास देला बाहिया (इस्ला रोआतान, ग्वानाहा आणि उतिला तसेच इतर छोटी बेटे) आणि केयोस कोकिनोस असे आहेत.
एकूण २५० किमी२ क्षेत्रफळ असलेल्या या प्रांतात अंदाजे ७१,५०० लोक राहतात.