केयोस कोकिनोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केयोस कोकिनोस तथा कोकिनोस केझ हा होन्डुरास देशातील द्वीपसमूह आहे. कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या मुख्य भूमीपासून ३० किमी उत्तरेस असलेली दोन मोठी व १३ लहान बेटे इस्लास देला बाहिया प्रांतात मोडतात.

२००१ च्या जनगणनेनुसार या बेटांमधून १०८ लोक राहतात. या बेटांवर एकही पक्का रस्ता नाही. येथे जाण्यासाठी ला सैबा किंवा इस्ला रोआतानपासून होड्या भाड्याने घ्यावा लागतात. पर्यटन हा येथीन मुख्य व्यवसाय आहे.