सांता बार्बरा प्रांत, होन्डुरास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

सांता बार्बरा प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या वायव्य भागात आहे. येथून महोगनी या अतिकठीण लाकडाची तसेच सीडर या वृक्षाच्या लाकडाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे. महोगनी आता संरक्षित वनस्पती आहे.

२००५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ३,६८,२९८ इतकी होती. या प्रांताची राजधानी सांता बार्बरा येथे आहे.