Jump to content

कोर्तेस प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोर्तेस हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या वायव्य भागात असलेला हा प्रांत होन्डुरासमधील सर्वाधिक वस्तीचा प्रांत आहे. याची राजधानी सान पेद्रो सुला येथे आहे.

सुला खोऱ्यात असलेला हा प्रांत होन्डुरासमधील केळ्यांच्या प्रचंड बागा आहेत. येथे काम करणाऱ्यांत स्थानिक लोकांशिवाय युरोपीय, इतर मध्य अमेरिकी, पॅलेस्टाइन आणि लेबेनॉन येथील लोकांचा समावेश आहे.