लेम्पिरा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेम्पिरा प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या आग्नेय भागात आहे. डोंगराळ भागात असलेला हा प्रांत देशाच्या इतर भागांपासून दळणवळणाच्या दृष्टीने दुरावलेला आहे. सेरोस लास मिनास हे होन्डुरासमधील सर्वोच्च शिखर या प्रांतात आहे.

या प्रांताला येथील लेंका या मूळ संस्कृतीतील नेत्याचे नाव देण्यात आले आहे. १९४३पूर्वी याला ग्रासियास प्रांत असे नाव होते.

२००५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,७७,९१० इतकी होती. या प्रांताची राजधानी ग्रासियास नावाच्या शहरात आहे.