कोपान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोपान प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या वायव्य भागात असलेल्या या प्रांतात उत्तम प्रतीची तंबाखू आणि सिगार निर्माण होतात.

याची राजधानी सांता रोसा दे कोपान येथे आहे. २०१५ च्या अंदाजानुसार या प्रांताची लोकसंख्या ३,८२,७२२ होती.

या प्रांतातील कोपान नावाच्या गावात झालेल्या उत्खननात प्राचीन माया संस्कृतीची मोठी नगरी आढळून आली आहे.