Jump to content

रोआतान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इस्ला रोआतान या पानावरून पुनर्निर्देशित)
रोआतानच्या वेस्ट बे भागातील एक पुळण

रोआतान हे होन्डुरास देशातील एक बेट आहे. कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या मुख्य भूमीपासून ६५ किमी उत्तरेस असलेले हे बेट इस्लास देला बाहिया प्रांतातील सगळ्यात मोठे बेट आहे. यास रुआतान किंवा रट्टान या नावांनेही ओळखतात. या बेटावरील कॉक्सेन होल हे गाव या प्रांताची राजधानी आहे.

रोआतान एक प्रचंड मोठे प्रवाळबेट आहे. ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ नंतरचे हे दुसऱ्या क्रमांकाचे आहे.