भूपालपल्ली
?भूपालपल्ली भूपालपल्ली तेलुगू : భూపాలపల్లి तेलंगणा • भारत | |
— शहर — | |
| |
गुणक: 18°25′53.04″N 79°51′37.8″E / 18.4314000°N 79.860500°E |
|
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
५२.६२ चौ. किमी • २०२ मी |
हवामान • वर्षाव |
• १,०८५.९ मिमी (४२.७५ इंच) |
प्रांत | तेलंगणा |
जिल्हा | जयशंकर भूपालपल्ली जिल्हा |
लोकसंख्या • घनता साक्षरता |
४२,३८७ • ८०६/किमी२ ७६.५६ % |
भाषा | तेलुगू |
संसदीय मतदारसंघ | वरंगल |
विधानसभा मतदारसंघ | भूपालपल्ली |
स्थानिक प्रशासकीय संस्था | नगर पंचायत, भूपालपल्ली |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 506169 • +०८७१५ • TS–25[१] |
भूपालपल्ली (Bhupalpally) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जयशंकर भूपालपल्ली (आचार्य जयशंकर) जिल्हा हा पूर्वीचा वरंगल जिल्हा करीमनगर जिल्ह्याच्या काही भागांच्या जोडणीसह तयार करण्यात आला आहे. ११-१०-२०१६ रोजी स्थापन झालेल्या जिल्ह्याचे नाव तेलंगणाचे विचारवंत, प्रा. के. जयशंकर सर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.[२] हे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे २१२.३ किलोमीटर (१३१.९ मैल), वरंगलपासून ६७.४ किलोमीटर (४१.८८ मैल) आणि रामगुंडमपासून ७७.२ किलोमीटर (४८ मैल) अंतरावर आहे.
लोकसंख्या
[संपादन]२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १०,४३८ कुटुंबांसह ४२,३८७ होती. एकूण लोकसंख्येमध्ये २१,८१० पुरुष आणि २०,५७७ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९४३ स्त्रिया. ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या ३५६८ आहे जी भूपालपल्लेच्या एकूण लोकसंख्येच्या ८.४२% आहे. सरासरी साक्षरता दर ७६.५६% होता.
९२.८६% लोक हिंदू आणि (५.५२%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.५६%), शीख (०.०१%), बौद्ध (०.००%), जैन (०.०२%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.०४%) यांचा समावेश होतो.[३][४]
तेलुगू भूपालपल्लीमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
भुगोल
[संपादन]भूपालपल्ली हे उत्तर अक्षांशाच्या १८°२५′५३.०४″N आणि पूर्व रेखांशाच्या ७९°५१′३७.८″E वर स्थित आहे. भुवनगिरीची सरासरी उंची २०२ मीटर आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०८५.९ मिलिमीटर (४२.७५ इंच) आहे.[५][६]
प्रशासन
[संपादन]भूपालपल्ली नगर पंचायत २०१२ मध्ये स्थापन करण्यात आली. नागरी संस्थेचे कार्यक्षेत्र ५२.६२ किमी २ (२०.३२ चौरस मैल) क्षेत्रफळावर पसरलेले आहे.[७] भूपालपल्ली हे शहर भुवनगिरी विधानसभा मतदारसंघात येते. जो वारंगल लोकसभा मतदारसंघात मोडतो.
वाहतूक
[संपादन]भूपालपल्ली येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. राष्ट्रीय महामार्ग ३५३सी हा भूपालपल्ली शहरातून जातो.
हे देखाल पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
- ^ "Jayashankar Bhupalpally District | Welcome to Jayashankar Bhupalpally District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-02-08 रोजी पाहिले.
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2016-06-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-02-08 रोजी पाहिले.
- ^ "Bhupalpalle Census Town City Population Census 2011-2022 | Andhra Pradesh". www.census2011.co.in. 2022-02-08 रोजी पाहिले.
- ^ "Bhupalpally topographic map, elevation, relief". topographic-map.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-08 रोजी पाहिले.
- ^ ":: Rainfall Integration::". www.tsdps.telangana.gov.in. 2022-02-08 रोजी पाहिले.
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2016-06-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-02-08 रोजी पाहिले.