जंबुक (तारकासमूह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जंबुक
तारकासमूह
जंबुक मधील ताऱ्यांची नावे
लघुरुप Vul
प्रतीक कोल्हा
विषुवांश २०
क्रांती +२५
चतुर्थांश NQ4
क्षेत्रफळ २६८ चौ. अंश. (५५वा)
मुख्य तारे ५, २०
बायर/फ्लॅमस्टीड
तारे
३३
ग्रह असणारे तारे
३.००m पेक्षा तेजस्वी तारे
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे
सर्वात तेजस्वी तारा α Vul (४.४४m)
सर्वात जवळील तारा रॉस १६५
(३३.५४ ly, १०.२८ pc)
मेसिए वस्तू
शेजारील
तारकासमूह
हंस
स्वरमंडळ
शौरी
शर
धनिष्ठा
महाश्व
+९०° आणि −५५° या अक्षांशामध्ये दिसतो.
सप्टेंबर महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.

जंबुक उत्तर खगोलार्धातील एक अंधुक तारकासमूह आहे. त्याला इंग्रजीमध्ये Vulpecula (व्हुल्पेक्युला) म्हणतात. तो एक लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ "लहान कोल्हा" आहे. सतराव्या शतकात पहिल्यांदा त्याची रचना करण्यात आली होती.

वैशिष्ट्ये[संपादन]

नुसत्या डोळ्यांनी दिसणारे जंबुकमधील तारे

तारे[संपादन]

या तारकासमूहात ४थ्या दृश्यप्रतीपेक्षा तेजस्वी एकही तारा नाही. अल्फा व्हुल्पेक्युले हा ४.४४ दृश्यप्रतीचा लाल राक्षसी तारा जंबुकमधील सर्वात तेजस्वी तारा आहे. तो पृथ्वीपासून २९७ प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.


१९६७ साली केंब्रिजमध्ये जोसेलिन बेल यांनी ॲंटोनी हेविश यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआर बी१९१९+२१ या सर्वात पहिल्या पल्सारचा शोध लावला. क्वेसारपासून येणाऱ्या रेडिओ लहरींचा शोध घेत असताना त्यांना १.३३७३ सेकंद अंतराने वारंवार येणारी स्पंदने आढळली.[१] हे सिग्नल सौर दिवसाऐवजी सायडेरिअल दिवसाच्या कालावधीने पुन्हा येत असल्याने त्यांचे उत्पत्तीस्थान पृथ्वीवर नसल्याचे स्पष्ट झाले. शेवटी हे सिग्नल वेगाने फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्यामुळे निर्माण होत असल्याचे आढळले. पहिल्या पल्सारच्या शोधानंतर पंधरा वर्षांनी पीएसआर बी१९३७+२१ या पहिल्या मिलीसेकंद पल्सारचा शोधदेखील जंबुकमध्येच लागला.[२]

जंबुकमध्ये एचडी १८९७३३बी हा पृथ्वीपासून सर्वात जवळील परग्रहांपैकी एक परग्रह आहे. स्पिट्झर अवकाश दुर्बीण सध्या त्याचे निरीक्षण करत आहे. या ग्रहाच्या वातावरणामध्ये पाण्याची वाफ असल्याचे आढळून आले आहे. या ग्रहाचे तापमान १०००° सेल्सिअसपेक्षा जास्त जात असल्याने तो वास्तव्ययोग्य नाही. असे असले तरी, भविष्यात एखाद्या पृथ्वीसदृश ग्रहावर जीवनासाठी आवश्यक असलेले पाणी सापडण्याची शक्यता वाढली आहे.

दूर अंतराळातील वस्तू[संपादन]

डम्बेल तेजोमेघ

डम्बेल तेजोमेघ (एम२७), एक मोठा तेजस्वी ग्रहीय तेजोमेघ आहे. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिए यांनी १७६४ साली त्याचा शोध लावला होता आणि त्याच्या प्रकारची पहिलीच वस्तू असे त्याचे वर्णन केले होते. एखाद्या चांगल्या द्विनेत्रीने त्याला पाहता येऊ शकते.

जंबुकमधील हेन २-४३७ ग्रहीय तेजोमेघ.[३]

एनजीसी ७०५२ एक एज-ऑन सर्पिलाकार दीर्घिका आहे. ती पृथ्वीपासून २१.४ कोटी प्रकाश-वर्ष अंतरावर आहे. तिच्यामध्ये ३७०० प्रकाश-वर्ष व्यासाची धुळयुक्त तबकडी आहे. तिच्या केंद्रस्थानी ३० कोटी सौर वस्तुमानाचे कृष्णविवर आहे. खगोलशास्त्रज्ञ असा तर्क करतात की केंद्रीय तबकडी एक लहान दीर्घिका एनजीसी ७०५२ मध्ये विलीन झाल्यानंतरचे अवषेश आहेत. दीर्घिकेमधून फवारे निघताना दिसू शकतात आणि ती रेडिओ लहरींमध्ये अतिशय प्रकाशमान दिसते. याचा अर्थ तिचे रेडिओ दीर्घिका असेही वर्गीकरण केले जाते.[४]

संदर्भ[संपादन]

स्रोत[संपादन]

  • Ian Ridpath, Wil Tirion. Stars and Planets Guide. London..  also available from Princeton University Press, Princeton: ISBN 978-0-691-13556-4.

तळटिपा[संपादन]

  1. ^ Hewish, A.; Bell, S. J.; Pilkington, J. D. H.; Scott, P. F.; Collins, R. A. (24 February 1968). "Observation of a Rapidly Pulsating Radio Source". Nature. 217 (5130): 709–713. Bibcode:1968Natur.217..709H. doi:10.1038/217709a0. 2007-07-06 रोजी पाहिले.
  2. ^ Backer, D.; Kulkarni, S. R.; Heiles, C.; Davis, M. M.; Goss, W. M. (16 December 1982). "A millisecond pulsar". Nature. 300 (5893): 315–318. Bibcode:1982Natur.300..615B. doi:10.1038/300615a0.
  3. ^ "The icy blue wings of Hen 2-437". 8 February 2016 रोजी पाहिले.
  4. ^ Wilkins Jamie, Dunn Robert. 300 Astronomical Objects: A Visual Reference to the Universe. Buffalo, New York.

गुणकः Sky map 20h 00m 00s, +25° 00′ 00″Coordinates: Sky map 20h 00m 00s, +25° 00′ 00″