ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६ | |||||
श्रीलंका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १८ जुलै – ९ सप्टेंबर २०१६ | ||||
संघनायक | ॲंजेलो मॅथ्यूज | स्टीव्ह स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | धनंजय डी सिल्वा (३२५) | स्टीव्ह स्मिथ (२४७) | |||
सर्वाधिक बळी | रंगना हेराथ (२८) | मिचेल स्टार्क (२४) | |||
मालिकावीर | रंगना हेराथ (श्री) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | दिनेश चंदिमल (२३६) | जॉर्ज बेली (२७०) | |||
सर्वाधिक बळी | दिलरुवान परेरा (९) | मिचेल स्टार्क (१२) | |||
मालिकावीर | जॉर्ज बेली (ऑ) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | धनंजय डी सिल्वा (७४) | ग्लेन मॅक्सवेल (२११) | |||
सर्वाधिक बळी | सचित परेरा (३) | ॲडम झम्पा (४) जेम्स फॉकनर (३) मिचेल स्टार्क (३) | |||
मालिकावीर | ग्लेन मॅक्सवेल (ऑ) |
ऑस्ट्रेलियाचा क्रिकट संघ १८ जुलै ते ९ सप्टेंबर दरम्यान ३-कसोटी, ५-एकदिवसीय, २-टी२० आणि एक प्रथमश्रेणी सराव सामना खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आला होता.[१][२][३] कसोटी मालिका वॉर्न-मुरलीधरन ट्रॉफीसाठी खेळवली गेली, ज्यामध्ये श्रीलंकेने ३-० असा विजय मिळवून, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच व्हाईटवॉश दिला.[४][५] ह्या मालिकेच्या निकालामुळे, ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावरून तिसऱ्या स्थानावर फेकला गेला; आणि श्रीलंकेचा संघ सातव्यावरून सहाव्या स्थानावर आला.[६]
ऑगस्ट २०१६ मध्ये, मालिकेच्या शेवटी श्रीलंकेचा फलंदाज तिलकरत्ने दिलशानने एकदिवसीय आणि टी२० ह्या दोन्ही क्रिकेट प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली.[७] ९ सप्टेंबर २०१६ रोजी तो सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला.
६ सप्टेंबर २०१६ रोजी, मालिकेतील पहिल्या टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वात मोठी धावसंख्या (२६२/३) उभारली. एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी तर टी२० मालिका २-० अशी जिंकली.
संघ
[संपादन]कसोटी | एकदिवसीय | टी२० | |||
---|---|---|---|---|---|
श्रीलंका[८] | ऑस्ट्रेलिया[९] | श्रीलंका[१०] | ऑस्ट्रेलिया[११] | श्रीलंका[१२] | ऑस्ट्रेलिया[१३][१४] |
सराव सामना
[संपादन]प्रथम-श्रेणी:श्रीलंकन XI वि ऑस्ट्रेलियन्स
[संपादन]
कसोटी मालिका (वॉर्न-मुरलीधरन चषक)
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
- १ल्या दिवशी पावसामुळे तिसऱ्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
- २ऱ्या दिवशी आलेल्या पावसामुळे चहापानाच्या थोडावेळ आधीपासून आणि तिसऱ्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
- ३ऱ्या दिवशी अपुरा सुर्यप्रकाश आणि पावसामुळे चहापानानंतर खेळ होऊ शकला नाही.
- ४थ्या दिवशी अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे खेळ चहापानानंतर खेळ होऊ शकला नाही.
- ४थ्या व ५व्या दिवशी पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला.
- कसोटी पदार्पण: धनंजय डी सिल्वा आणि लक्षन संदाकन (श्री).
- नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर ११७ ही श्रीलंकेची सर्वात निचांकी धावसंख्या.
- कुशल मेंडिस श्रीलंकेतर्फे ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी शतक करणारा सर्वात लहान खेळाडू.
- नाथन ल्योनचे (ऑ) २०० कसोटी बळी पूर्ण.
- श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध २७ कसोटी सामन्यांमधील केवळ २रा विजय.
- स्टीव्ह स्मिथचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी पराभव.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: जॉन हॉलंड (ऑ) आणि विश्व फर्नांडो (श्री)
- ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावातील १०६ धावसंख्या ही श्रीलंकेविरूद्ध सर्वात निचांकी धावसंख्या.
- कसोटी क्रिकेट मध्ये हॅट्ट्रीक घेणारा रंगना हेराथ हा श्रीलंकेचा पहिला फिरकी गोलंदाज, दुसरा श्रीलंकेचा खेळाडू आणि वयाने सर्वात मोठा खेळाडू.
- मिशेल स्टार्कची ऑस्ट्रेलियाच्या तेजगती गोलंदाजातर्फे श्रीलंकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी.
- एकाच कसोटीमध्ये १० बळी आणि अर्धशतक झळकाविणारा दिलरुवान परेरा हा श्रीलंकेचा पहिलाच खेळाडू.
- दिलरुवान परेरा हा श्रीलंकेतर्फे सर्वात जलद ५० कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला (११ कसोटी).
- १९९९ पासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध श्रीलंकेचा पहिलाच मालिकाविजय.
- ऑस्ट्रेलियाचा आशियामध्ये सलग आठवा पराभव.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
- ऑस्ट्रेलियातर्फे कसोटी क्रिकेट मध्ये ४,००० धावा पूर्ण करणारा स्टीव्ह स्मिथ हा वयाने सर्वात लहान क्रिकेट खेळाडू.
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: अमिला अपोन्सो आणि लक्षण संदकन (श्री)
- मिचेल स्टार्क (ऑ) हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० एकदिवसीय बळी मिळवणारा गोलंदाज ठरला.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- जेम्स फॉकनरची (ऑ) हॅट्ट्रीक.
- श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावांनुसार सर्वात मोठा विजय.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- तिलकरत्ने दिलशानची (श्री) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती.
- दिनेश चंदिमलचे (श्री) श्रीलंकेतील पहिले शतक.
- डंबुला मधील श्रीलंकेविरूद्ध धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: अविष्का फर्नांडो (श्री)
- ॲरन फिंचची ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजातर्फे सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- ऑस्ट्रेलियातर्फे श्रीलंकेमध्ये एकदिवसीय शतक करणारा डेव्हिड वॉर्नर हा पहिलाच फलंदाज.
टी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- टी२० पदार्पण: सचित पतिराना (श्री)
- श्रीलंकेचा २००७ मधील २६०/६ हा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढून ऑस्ट्रेलियाचा टी२० मधील २६३ धावांचा विश्वविक्रम.[१५]
- ग्लेन मॅक्सवेलचे (ऑ) टी२० मधील पहिले शतक.[१५]
- सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा ग्लेन मॅक्सवेल हा पहिलाच फलंदाज.[१५]
- श्रीलंकेचा टी२० मधील सर्वात मोठा पराभव.[१५]
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- हा तिलकरत्ने दिलशानचा (श्री) शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.
- ग्लेन मॅक्सवेलची ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाच्या सर्वात जलद टी२० अर्धशतकाच्या (१८ चेंडू) विक्रमाशी बरोबरी.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील सर्व महत्त्वाच्या मालिका आणि सामने" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "२०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक म्हणून लॅंगर काम पाहणार" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकन एकादशच्या कर्णधारपदी मिलिंद सिरिवर्दना" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "हेराथच्या गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने दिला ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक व्हाईटवॉश" (इंग्रजी भाषेत). १७ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेविरुद्ध ३-० ने झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाने आयसीसी क्रमवारीतील पहिले स्थाने गमावले" (इंग्रजी भाषेत). १७ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेविरुद्ध ३-० ने झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाने पहिले स्थाने गमावले" (इंग्रजी भाषेत). १७ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "एकदिवसीय आणि टी२० मधून दिलशानची निवृत्ती" (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पहिल्या कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेच्या संघातून सिरीवर्दनेला वगळले" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "हेन्रिक्स आणि दुखापतीतून सावरलेल्या स्टार्कला श्रीलंका दौर्यासाठी पाचारण" (इंग्रजी भाषेत). २४ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका एकदिवसीय संघात १८-वर्षीय अविष्का फर्नांडोची निवड" (इंग्रजी भाषेत). १९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "एकदिवसीय संघातून मॅक्सवेलला वगळले" (इंग्रजी भाषेत). ३१ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० साठी कासुन राजिताची निवड" (इंग्रजी भाषेत). ५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "जखमी कल्टर-नाईल श्रीलंका दौर्यावरून बाहेर" (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "लेन आणि फंच श्रीलंका टी२० मधून बाहेर" (इंग्रजी भाषेत). ४ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c d "ऑस्ट्रेलियाचा नवा विक्रम". ६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.