विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







नवीन मुखपृष्ठ निवेदन लिहिण्यासाठी आवाहन

माझ्या मते आता मुखपृष्ठावरील 'मराठी विकिपीडियाची प्रगती अपेक्षेपेक्षा...' हे निवेदन बदलण्यास हरकत नाही. तेथे काय असले पाहिजे ते येथे कळवा. मजकूर ४-७ ओळींचा असावा.

अभय नातू २०:१४, ५ फेब्रुवारी २००७ (UTC)

नवीन मुखपृष्ठ निवेदन my preference

मराठी विकिपीडियाची प्रगती होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण बनविण्यासाठी आपले मत किंवा नवे उपाय विकिपीडिया चावडीवर व्यक्त करा. सद्यस्थितीमध्ये खालील उपाय सुचविण्यात आलेले आहेत.
    • अलीकडील बदल हे एक लोकप्रिय विशेष पान आहे इतरांकडून होत असलेल्या बदलांना तपासा. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
    • प्रत्येक महिन्यासाठी एका विषयाशी संबंधित लेख बनविणे आणि त्यातील मजकूर भरण्यासाठी सदस्यांनी योगदान करणे. येत्या महिन्याचे मासिक सदर मध्ये योगदान करा.

Regards Mahitgar ०७:३२, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

Here is my suggestion about the "Nivedan".
अलीकडील बदल हे एक लोकप्रिय विशेष पान आहे. येथे आपण इतरांकडून होत असलेले बदल पाहू शकता. आपण जर ब्लोगलाइन्स.कौम सारखा "रिच् साइट समरी रीडर" वापरत असाल तर या पानाचा आर एस एस फीडदेखील डावीकडील साधनपेटीत उपलब्ध आहे. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा. तसेच विकिबुक्स, विकिक्वोट, विक्शनरी या सहप्रकल्पात सहभाग नोंदवा.
-Shantanuo ०८:४८, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
Merged the above two suggestions and published. Now, this section has become longer. Suggest.
अभय नातू १६:४८, ७ फेब्रुवारी २००७ (UTC)

मार्च २००७चे मुखपृष्ठ सदर

नमस्कार,

अनेक सदस्यांनी मार्च २००७च्या मुखपृष्ठ सदरासाठी 'दुसरे महायुद्ध' लेखाला पसंती दिली आहे. हा लेख सादर करण्यास काही अडचणी आहेत.

  1. लेख अपूर्ण आहे. सध्याच्या रूपरेषेप्रमाणे अंदाजे ४०% लेख अजून लिहायचा आहे.
  2. लेखात मोडके दुवे आहेत. असंख्य दुव्यांचे लेख लिहिले गेलेले नाहीत. सगळे लेख लिहायचे म्हणले तरी साधारण ३००-४०० लेख लिहावे लागतील.
  3. समसमीक्षा झालेली नाही. अनेक विषयांना हात घालणार्‍या या लेखात अनेक विवादास्पद विधाने व दृष्टिकोन असण्याची शक्यता आहे. समसमीक्षेशिवाय ह्या लेखाला मुखपृष्ठ सदर करणे शहाणपणाचे ठरणार नाही.

तरी मी असा प्रस्ताव करतो की आधी आपण हा लेख व अनुषंगित कामे पूर्ण करू या व नंतर त्यास मुखपृष्ठ सदराचा दर्जा देऊ यात. यासाठी मी सध्या जुलै १ ही तारीख मांडतो.

आपले मत कळवावे.

अभय नातू १६:४७, १ फेब्रुवारी २००७ (UTC)

I voted since it's in queue for longer time ,I suggest पुणे. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:५२, २ फेब्रुवारी २००७ (UTC)

नवीन मुखपृष्ठ निवेदन my preference

मराठी विकिपीडियाची प्रगती होत आहे.ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण बनविण्यासाठी आपले मत किंवा नवे उपाय विकिपीडिया चावडीवर व्यक्त करा. सद्यस्थितीमध्ये खालील उपाय सुचविण्यात आलेले आहेत.
    • अलीकडील बदल हे एक लोकप्रिय विशेष पान आहे इतरांकडून होत असलेले बदलांना तपासा.एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
    • प्रत्येक महिन्यासाठी एका विषयाशी संबंधित लेख बनविणे आणि त्यातील मजकूर भरण्यासाठी सदस्यांनी योगदान करणे. येत्या महिन्याचे मासिक सदर मध्ये योगदान करा.

Regards Mahitgar ०७:३२, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

Here is my suggestion about the "Nivedan".
अलीकडील बदल हे एक लोकप्रिय विशेष पान आहे. येथे आपण इतरांकडून होत असलेले बदल पाहू शकता. आपण जर ब्लोगलाइन्स.कौम सारखा "रिच् साइट समरी रीडर" वापरत असाल तर या पानाचा आर एस एस फीड देखील डावीकडील साधनपेटीत उपलब्ध आहे. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा. तसेच विकिबुक्स, विकिक्वोट, विक्शनरी या सहप्रकल्पात सहभाग नोंदवा.
-Shantanuo ०८:४८, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

डॉ.िकरण परांजपे यांच्या ब्लॉगवर भाषांतर सेवा

नमस्कार

डॉ.िकरण परांजपे यांच्या ब्लॉगवर मर्यादित शब्दांचे मराठीत किंवा संस्कृतात भाषांतर करून मिळते. जिज्ञासूंनी लाभ घ्यावा .

धन्यवाद.

विजय

मुखपृष्ठ

नवीन निवेदन छान आहे परंतु त्याच्या शेजारील कॉलममध्ये कमी माहिती असल्यामुळे विचित्र दिसत आहे. माझे असे मत आहे की ह्या दोन्ही स्तंभात 'Todays featured picture' व 'In the news' हे सदर घालावेत. तसेच लेखांची सूचिपट्टी वर हलवावी आणि संकल्पने बनवलेला search box देखील (वर) include करावा.--→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०५:३६, ९ फेब्रुवारी २००७ (UTC)


The last point about "रिच् साइट समरी रीडर"refers to अलीकडील बदल page. So either merge it with the point number 2 or remove it all together. --Shantanuo १६:४७, ९ फेब्रुवारी २००७ (UTC)

आपली संपादन-संख्या(edit count) किती आहे?

येथे पहा

Wikipedia:धूळपाटी/मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? सर्वांनी हा लेख पूर्णकरण्यास व शुद्धीकरणा

मी Wikipedia:धूळपाटी/मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? या नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नाबाबतच्या लेखास सुरूवात केली आहे. सर्वांनी हा लेख पूर्णकरण्यास व शुद्धीकरणास हातभार लावावा ही नम्र विनंती.

विजय ०७:३३, ११ फेब्रुवारी २००७ (UTC)

संपादन करताना र्‍य र्‍ह आता सुलभतेने उपलब्ध

मराठी/देवनागरी टंकन करताना, विशेषतः विकिपीडियावर र्‍य आणि र्‍ह कसे टंकित करावे हे अनेक जणांना माहिती नसते. ही जोडाक्षरे आता संपादन खिडकीखालील यादीतून टंकित करता येतील. अधिक विवरणासाठी शेजारील चित्र पहा.

तुमच्या संपादन खिडकीत ही अक्षरे दिसत नसतील तर ctrl-F5 (इंटरनेट एक्स्प्लोरर) किंवा तत्सम कळ दाबून तुमची जावास्क्रिप्ट व सी.एस.एस. पुनः चढवा.

अभय नातू ००:५०, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)

Thanks abhay for valuable help.विजय ०७:००, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)

असाच डोक्यावर चंद्र घेतलेला 'अ' मिळेल का?--J १७:०२, १४ फेब्रुवारी २००७ (UTC)

माझ्या मते युनिकोड देवनागरी लिपीत असे अक्षर विकसित केलेले नाही. सापडले तर लगेचच सुधारणा करण्यात येईल. तोपर्यंत कृपया वापरावा.
अभय नातू १७:०९, १४ फेब्रुवारी २००७ (UTC)

Wikipedia:नामविश्व

I have copied article m:Help:Namespace from wikimedia to Wikipedia:नामविश्व.I request help in translating and customising this help page.

Thank you,

क.लो.अ.वि.

विजय ०७:००, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


Wikipedia:नामविश्व येथे भाषांतर करताना मूळ इंग्लिश उतार्‍याचा अन्वयार्थ न लागल्यामुळे भाषांतरणास थोडी अडचण येत आहे.

m:Help:Namespace येथील मूळ उतारा

From MediaWiki 1.5 Recent changes ditto; for each of the two, one can also select all namespaces except a specified one; thus, although one cannot have a single list of all pages, one can select a small namespace and use the invert option, to get almost all pages.

यातील each of the two चा संदर्भ लागला नाही.each of the two चा संदर्भ Special:Allpages शी असेल तर तेथे Recent changes प्रमाणे invert option दिसत नाही. आणि मराठी विकिपीडियाची मिडियाविकि आवृत्तीसुद्धा अद्ययावत आहे.

मी सध्या उतार्‍याचे भाषांतर Wikipedia:नामविश्व येथे खालीलप्रमाणे केले आहे.:

  • विशेष:Allpages वापरून कोणत्याही नामविश्वातील 'सर्व पाने' किंवा 'सगळे लेख' यांची सूची मिळवता येते.
वरीलप्रमाणे MediaWiki 1.5 पासूनच्या विकिआवृत्तीत अलीकडील बदल ;दोघांपैकी प्रत्येकात, एक ठराविक नामविश्व सोडून इतर सर्व नामविश्वे निवडता येतात. जरी सर्व पानांची एकच यादी मिळवता येत नसली तरी, एखादे छोटे नामविश्व निवडून आणि सोबत Invert Selection सुविधा वापर करून जवळपास सर्व पाने मिळवता येतात.
मला हे भाषांतरात योग्य सुधारणा करून हवी आहे. धन्यवाद. विजय १४:५९, १३ फेब्रुवारी २००७ (UTC)

विजय, मला मूळ उतारा असा आढळला.(each of the two हे शब्द सापडले नाहीत.):-- Special:Allpages can be applied to a namespace of choice From MediaWiki 1.5 Recent changes ditto.

Searching can be restricted to any subset of namespaces User contributions can only show all or be restricted to a namespace of choice.

It is possible to customize the visual appearance of pages by namespace (see e.g. [1]); also enabling the subpage feature can be done for selected namespaces. याचे भाषांतर अवघड नाही.---J १८:०९, २५ फेब्रुवारी २००७ (UTC)

माहितीचौकट अभिनेता साचा: Query

नमस्कार,दोन प्रश्न: १) माहितीचौकट अभिनेता साच्यामध्ये 'भाषा' असा एक point दिसतो. तेथे काय माहिती अपेक्षित आहे? त्या अभिनेत्याची मातृभाषा की त्याला अवगत असणार्‍या भाषा की त्याने ज्या ज्या भाषांमध्ये कामे केली आहेत त्या भाषांची नावे?

२) मराठी नाटकांसाठी माहितीचौकट साचा उपलब्ध आहे का?

धन्यवाद! Marathipremi २३:१३, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi

मराठीप्रेमी,
१. भाषा या रकान्यात त्या अभिनेत्या/अभिनेत्रीने ज्या भाषांतील चित्रपटांत कामे केली असतील यांची नोंद करावी.
२. मराठी नाटकांसाठी माहिती चौकट उपलब्ध नाही पण चित्रपट अभिनेत्यांच्या चौकटीवरुन तुम्हालाही ती तयार करता येईल. त्यात अडचण आली तर सांगालच.
अभय नातू २३:१७, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)

धन्यवाद अभय! ok i ll soon make साचा for marathi natake.

Query डिलीट कशी करायची ते मला माहित नाही. पण माझं शंकानिरसन आता झालं आहे त्यामुळे ही Query उडविली तरी चालेल. Marathipremi २३:२३, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi

शक्यतो येथील मजकूर राहू द्यावा म्हणजे इतर कोणाला ही (किंवा अशीच) शंका आली तर त्याचे निरसन आपोआप होईल. जरी हे पान संचित केले गेले तरी शोधयंत्रातून ही माहिती इतर वाचकांना उपलब्ध राहतेच.
मजकूर काढायचाच असला तर पानावरचा तो विभाग संपादित करून मजकूर घालवावा.
अभय नातू २३:३१, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)


नमस्कार,

I changed टीव्ही --> दूरचित्रवाणी in माहितीचौकट अभिनेता साचा. पण आता त्यामधील 'प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम' या रकान्यात value/info भरुन सुद्धा तो रकाना display होत नाहिये. It can be viewed in 'संपादन' mode. (eg. प्रशांत दामले पेज) Is it because I changed टीव्ही --> दूरचित्रवाणी in साचा itself.. may be I am not entitled to do changes in existing साचे?? If we see दिलीप प्रभावळकर पेज, तो रकाना दिसतो but as 'प्रमुख टीव्ही कार्यक्रम'. My purpose is to replace the word टीव्ही with दूरचित्रवाणी in the साचा which will be used frequently.

धन्यवाद. Marathipremi २३:१९, १५ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi


मराठीप्रेमी,
तुम्ही साच्यात जो बदल केलात तो साच्यात न करता त्याच्या माहितीत केलात. साचा तसाच राहिला होता :-)
मी तो बदल केला आहे. त्याच बरोबर तो साचा वापरणारे लेखही बदलले आहेत.
कोणत्याही साच्यात बदल केल्यावर तो साचा वापरणारे सगळे लेख बदलावे म्हणजे ते लेखही व्यवस्थित दिसतात.
अभय नातू ०३:५६, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)

Oh! Lol :D Thanks Abhay!

Marathipremi ०४:०२, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi

जपान संबंधित लेख

आत्ताच जपान संबंधित लेखांवर नजर टाकली. तर त्यातील नावांच्या spelling संबंधित काही:

जपानी भाषेत 'ट' ('T' sound), 'ड' ('D' sound), 'ल' ('L' sound)नाही. त्याऐवजी अनुक्रमे 'त', 'द' आणि 'र' आहे. त्यामुळे Tokyo, Yorimoto, Uda, Takakura, Daigo, Lemon अशासारखे शब्द अनुक्रमे तोक्यो, योरीमोतो, उदा,ताकाकुरा, दाइगो, रेमोन असे उच्चारले जातात. (जसं 'Komatsu' किंवा 'Mitsubishi' हे शब्द 'कोमात्सु' आणि 'मित्सुबिशी' असे बरोबर लिहिले/उच्चारले जातात and not as 'कोमाट्सु' किंवा 'मिट्सुबिशी'.)

तसेच, 'Shogun' चा उच्चार 'शोगन' नसून 'शोगुन' असा आहे.

शुद्धलेखन related वरील changes एडमिनची परवानगी असल्यास करता येतीलच पण जे सदस्य पुढेमागे जपान संबंधित लेखांत भर टाकतील त्यांनी वरील काळजी घेतली तर परत शुद्धलेखन correct करण्याची आवशकता भासणार नाही.

This is just my suggestion abt Japanese spellings.

Marathipremi ०६:४०, १४ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi

नमस्कार,
तुम्हाला जेथे जेथे बदल योग्य वाटतील तेथे करावेत. बदल करताना प्रचलित (पाश्चात्य) उच्चारांचा उल्लेख करावा, उदा. होक्काइदो वरील लेखात नमूद करावे (शक्यतो सुरुवातीला) होक्काइदो (होक्काइडो) हा जपानचा एक प्रांत व बेट आहे.
अभय नातू १६:२१, १४ फेब्रुवारी २००७ (UTC)

Yes, it is a good idea to mention Japanese as well as western pronounciation. I ll follow that. Thanks for the reply. Marathipremi २३:१७, १४ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi

१० लाख हस्तलिखितांचा खजिना ऑनलाइन स्वरूपात खुला

इ-सकाळने http://www.namami.org येथे १० लाख हस्तलिखितांचा खजिना ऑनलाइन स्वरूपात खुला झाल्याची बातमी दिली आहे.दैनिक सकाळ म्हणते "भारताने आज १० लाख हस्तलिखितांचा "कीर्तिसंपदा' हा इलेक्‍ट्रॉनिक डाटाबेस तयार करून विश्‍वविक्रम नोंदविला आहे. या डाटाबेसमध्ये कौटिल्याचे अर्थशास्त्र, गीतगोविंद व बाबरनामा यांसारख्या प्राचीन ग्रंथांचाही समावेश आहे." ...... पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री अंबिका सोनी यांनी, "ही सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखी घटना आहे,' असे या डाटाबेसच्या उद्‌घाटन प्रसंगी येथे सांगितल्याचे दैनिक सकाळ म्हणते, त्यामध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील पाच हस्तलिखितांचा समावेश असल्याचेही दैनिक सकाळ नमुद करते. "नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट' या संस्थेने तयार केलेला हा डाटाबेस http://www.namami.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

[javascript:openWindow( "/esakal/02152007/71F7322A6D.htm") सौजन्य दैनिक इ-सकाळ]

विजय ०७:५८, १५ फेब्रुवारी २००७ (UTC)

मॅन्युस्क्रिप्ट्स मिळाली नाहीत, पण चित्रे फार देखणी आहेत.--J १८:१४, १५ फेब्रुवारी २००७ (UTC)

Wikipedia tutorial in Hindi

http://hindini.com/hindini/?p=138

The above link (Hindi) has a nice tutorial to learn how to edit and update wikipedia.

Clash of information collected from different sources (Query)

नमस्कार,

मराठी अभिनेत्यांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची माहिती मी लवकरच चढविणार आहे. त्यांच्यासंदर्भात माहिती मिळवत असताना त्यांच्या जन्मतारखेविषयी माहितीत तफावत आढळली आहे. १)http://www.marathinayak.com/ मराठीनायक डॉट कॉम या संकेतस्थळानुसार त्यांची जन्मतारीख २६ ऑक्टोबर १९५४ आहे तर २)इंग्रजी विकी http://en.wikipedia.org/wiki/Laxmikant_Berde आणि http://www.imdb.com/name/nm0073426/ या संकेतस्थळांनुसार त्यांची जन्मतारीख ३ नोव्हेंबर १९५४ आहे.

अशावेळेस काय करावे?

दुसरी गोष्ट,

बेर्डे यांच्या existing पेजवर त्यांची इमेज already चढविलेली दिसते आहे. ती copyright free आहे की नाही हे मला ठाऊक नाही. I have not uploaded it. So keeping it as it is, I ll upload other info abt Berde. Is it OK?

धन्यवाद! Marathipremi २३:३९, २० फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi

In cases where you have conflicting information from two or more seemingly authentic sources, pick the most authentic source in your opinion. If the source has cited original references, even better. In the article on wikipedia, write information provided by the chosen source, then add a note saying this information is in question and cite the other references.
Posting a question on चावडी might clear up things too.
अभय नातू ०२:१६, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)
माझ्या मते बेर्डांयांची जन्मतारीख २६ ऑक्टोबर आहे. मला ही तारीख वृतपत्रांत वाचल्याचे आठवत आहे. मराठीप्रेमी हे मराठी चित्रपट विषयक लेखांत अत्यंत चांगले काम करत आहेत. मराठी चित्रपट/कलाकार विषयक चांगले सदर लिहून ते मासिक सदर (Featured article)च्या दर्जाचे करावसा वाटतो. या विषयाचा एकही मासिक सदर नाही. आपण एखादा विषय निवडून मिळून लेखन करावे का? एकएकटे काम करण्याचा खूप कंटाळा येतो! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:५३, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)

एकएकटे काम करण्याचा खूप कंटाळा येतो!

  • Since it is generaly observed that usualy members are participation and response to nominated मासिक सदर of the next month is overwhelming so please do select nominated articles faster and link to present मासिक सदर at the earliest so atleast some collaborative work will keep going on. so we can avoid एकएकटे काम करण्याचा खूप कंटाळा येतो!

Mahitgar १५:०१, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)

Right. If no one has any objection,can we work upon a article about Marathi entertainment industry for the April?(since पुणे or दुसरे महायुध्द is likely to be next FA). I feel we should have FA of different subjects. Let us decide on the subject and specific name and than work collaboratively. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १६:२६, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)
No one *should* have any objections to someone working diligently!!! Pls go ahead and propose a name and material.
Also, do not think you're working alone. There are 5-10 people always monitoring what's written here. Their lack of comments suggests a tacid approval of your work. You may be the only one working on a topic, but you certainly are not alone!!
Keep up the good work.
अभय नातू १७:३९, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)
Thanks Abhay! The subject should be related to Marathi entertainment industry and enough sources should be available to write the article. Perhaps दादासाहेब फाळके? or any famous Marathi actor/actress? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०६:३९, २२ फेब्रुवारी २००७ (UTC)

>>>then add a note saying this information is in question and cite the other references.

Thanks Abhay! However I am not getting proper words to describe 'this information is in question' in Marathi. What should be written for that? And how will I fit this along with mention of other conflicting reference in small rakana of birthdate in mahitichoukat abhineta sacha?

Thank you.

Marathipremi ०३:१३, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi

However I am not getting proper words to describe 'this information is in question' in Marathi.

If the information is in a paragraph or running text, I suggest - '(पुढील माहिती विवादास्पद आहे. संदर्भ पहा.)' and give reference(s) to all the sources. If it's in a table or other place where conciseness is important, simply write the most trustworty info and cite all references. For information on how to give references, see इंग्लिश विकिपीडियावरील माहितीपर लेख.
अभय नातू ०३:३७, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)

हार्दीक अभिनंदन

नवीन सदस्य कृष्णा लोंढे मराठी विकिपीडियावरील हजारावे सदस्य झाले आहेत. मराठी विकिपीडियाने आज हा टप्पा ओलांडल्या नंतर मला खूप आंनद होत आहे.कृष्णा लोंढे आणि समस्त विकिकरांचे हार्दीक अभिनंदन!!! Mahitgar ०९:०५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)

मराठी विकिपीडियाची प्रगती अशीच होत राहो अशी मनापासूनची इच्छा. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १३:१५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)

पुण्याचे चित्र

मार्च २००७चे मुखपृष्ठ सदर, पुणे या लेखाला मुख्य चित्र(leader picture) नाही. कृपया एखादे प्रताधिकारमुक्त व पुण्याचे दर्शन घडविणारे चित्र येथे द्यावे. यात प्रताधिकारमुक्त नकाशे (गूगल, नासा, इ.), पुण्यातील रोजचे दृष्य (लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी, सिंहगड/पर्वती/चतुःश्रृंगी वरून दिसणारे पुण्याचे विहंगम दृष्य, इ. मिळाल्यास अतिउपयुक्त ठरेल.

अभय नातू २१:५२, २४ फेब्रुवारी २००७ (UTC)

माझ्यामते शनिवारवाड्याचे चित्र योग्य ठरेल व ते लेखांत आहे देखिल. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०८:३३, २५ फेब्रुवारी २००७ (UTC)

About ReyBrujo/Dumps

A visiting user seems to have created two usefull pages which list Articles with more than 10 external links and Sites linked more than 10 times.

Since Marathi WIkipedia is in developing stage most of us are using internet resources and using external links for references is quite natural and usefull to dvelopment of Marathi Wikipedia.Also note that ReyBrujo's lists are just an indication and may not be fully correct.One of his page shows Possible spambot pages Possible pages created by spambots ending with /. are in reality not created by spam bots मराठी kiswahili शब्द्संहिता/ is a perefectly valid page and page Wikipedia:Broken/ is not usefull but from its content does not seem to be a spambot creation.


With following exception having more than 10 links on those pages is quite ok.
We need to keep watch and remove links like "For Homosexual Palestinians, Israel Is Their Best Shot at Safety" which is appearing page इस्रायल and article like Wikipedia:Broken/ is not needed.


Out of this all other links are ok, only I have doubt about link http://72.14.235.104, This link open in to google home page .I dont know which page it is appearing in if technically possible we can replace it with original google nomenclature.

I belive there are some free online free resoureces which help in identifying dead external links, May be our own Marathi bots can help in removing dead external links from time to time.


Kiswahili is indeed a valid page and admins are very much aware of it. It will not be deleted. Wikipedia/broken was not created by a spambot, but had no real purpose. It seemed to have been created by mistake. It has been removed.
I do not think the link on इस्रायल is out of context or not needed. That is my opinion. I'd like to hear from others, especially atendulk, who seems knowledgeable about Israel and has been translating this article for a while.
अभय नातू ०५:५०, २६ फेब्रुवारी २००७ (UTC)
Sorry,I have not read article इस्रायल may be as you said refered link is valid requirement of the article.My purpose was to bring attention to different looking link and I know atendulk is working on it thats why I did not get in to link's details.

Thanks for your prompt reply. Regards विजय ०६:०१, २६ फेब्रुवारी २००७ (UTC)

Jimbo, the jumbo techie to make it all easy

Please do refer interview of Mr. Jimmy Wales, founder of Wikipedia with News Today during his recent visit to chennai.

विजय १४:५५, २६ फेब्रुवारी २००७ (UTC)

मराठी विकिपीडियात चर्चा:संगणक टंक येथे Font शब्दास टंक शब्द आणि "Computer Font" करिता "संगणक टंक" शब्द समुह वापरावा किंवा नाही या बद्दल परस्पर विरोधी मते नोंदवली गेल्या नंतर मी तत्संबधी काही संज्ञांच्या व्याख्यांची भाषांतरे करण्याचा प्रयत्न केला आहे.आणि चर्चा पुढे चालूच नाही तर रोचकही होत आहे.तेव्हा ज्यांनी आपले आधी मत नोंदवले आहे त्यांनी आपापली मते कृपया पुन्हा नोंदवावीत तसेच ज्यांनी अद्यापि आपले मत नोंदवले नाही त्यांनी सुद्धा मते चर्चा:संगणक टंक येथे नोंदवावीत म्हणजे संगणक टंक या लेखास योग्य सुधारणा करणे सोपे जाईल ही नम्र विनंती

क.लो.अ.वि.

विजय १६:३१, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)

टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष

मंडळी,

हा वर्ग तयार करताना प्रश्न पुढे आला - टेक्सासचे प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष बरोबर की टेक्सासचे प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष?

टेक्सासचे प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष हे व्याकरणदृष्ट्या अशुद्ध दिसते आहे (संकल्प द्रविडांनी मांडलेल्या विवेचनानुसार).

पण सध्या आपण येथे (आणि व्यवहारातसुद्धा) इराकचे राष्ट्राध्यक्ष, विलासची खुर्ची, इ. शब्द सर्रास वापरतो. त्याच वेळी भारताचे पंतप्रधानही म्हणतो.

तर कोणते रूप बरोबर मानावे?

अभय नातू ०५:३१, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)

टेक्सास अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील एक राज्य आहे, प्रजासत्ताक असे विशेषण येथे लाऊ नये. टेक्सासचे राज्यपाल हा वर्ग योग्य वाटतो. माझा भुगोल बर्यापैकी चांगला आहे(!) आणि मला खात्रीने वाटतं की टेक्सास प्रजासत्ताक अस्तित्वात नाही व टेक्सासला राज्यपाल हे प्रशासकीय पद असते राष्ट्राध्यक्ष नव्हे! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०५:५५, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)

येथील प्रजासत्ताक हे टेक्सासचे विशेषण नसून टेक्सासचे प्रजासत्ताक हे विशेषनाम आहे.

मेक्सिकोपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टेक्सासला काही वर्षांसाठी स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्त्व होते. त्यानंतर ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात सामील झाले. या दरम्यान टेक्सासच्या प्रजासत्ताकला स्वतःचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रध्वज, सैन्य, संविधान, इ. होते.

असो, तर मूळ प्रश्नाप्रमाणे टेक्सासचे राज्यपाल कि टेक्सासाचे राज्यपाल? :-P

अभय नातू ०१:४०, १ मार्च २००७ (UTC)

मराठी व्याकरणाच्या नियमांनुसार अतिशय परिचयाच्या विशेष नामाला प्रत्यय लावताना त्या नामाचे सामान्य रूप करावे. अन्यथा नाही. उदाहरणार्थ: सीतेला, सुमित्रेने, कौसल्याचे, शूर्पणखेपासून वगैरे. नामे अकारान्त नसतील तर सामान्य रूप करावे. उदा: पुण्यात(पुणेत नाही). अल्पपरिचय असेल तर दोन्ही प्रकार. उदा:- नागपूरला, नागपुराला. अत्यंत कमी परिचय असेल तर सामान्य रूप करायचे नाही. उदा: सीतेला परंतु गीताला, कुलकर्ण्यांच्या सुमित्राला(सुमित्रेला नाही), हिन्दुस्थानात परंतु लंडनला(लंडनाला नाही). या नियमाप्रमाणे टेक्सासला- टेक्सासाला नाही. प्रजासत्ताक हे विशेष नाम नाही. त्यामुळे सामान्य रूप करायचे. टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे(प्रजासत्ताकचे नाही); प्रजासत्ताकला पण योग्य नाही.--J २०:२०, १० मार्च २००७ (UTC)


J,
तुम्ही लिहिलेत -- प्रजासत्ताक हे विशेष नाम नाही
प्रजासत्ताक हे विशेष नाम नसले तरी टेक्सासचे प्रजासत्ताक हे विशेष नाम आहे. येथे षष्ठी विभक्ति लावलेली नसून संपूर्ण नावच टेक्सासचे प्रजासत्ताक असे आहे(Republic of Texas, Republic of India, State of Maharashtra, etc.). तसे असता कृपया नियम स्पष्ट करावा.
धन्यवाद.
अभय नातू २१:१४, १० मार्च २००७ (UTC)

'टेक्सासचे प्रजासत्ताक 'हे विशेष नाम असेल तर 'प्रजासत्ताकचे' चालेल. 'प्रजासत्ताकाचे' असे लिहिण्याची गरज नाही.--J ०९:०५, ११ मार्च २००७ (UTC) अमेरिकापासून अमेरिकन हे विशेषण तयार होते, तसे टेक्सासपासून काही होते का? टेक्सासी, टेक्सासीय वगैरे. तसे असल्यास टेक्सासी प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष करता येईल. नाहीतर नुसतेच टेक्सास प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष असे म्हणता येईल. टेक्सासच्या प्रजासत्ताकचे म्हणण्याची गरज भासणार नाही. येथे टेक्सास प्रजासत्ताक हा 'शब्द न जोडता केलेला समास' समजला जाईल. उदाहरणार्थ समाज मंदिर, बाजार समिती, पाकिस्तान क्रिकेट संघ हे 'शब्द न जोडता केलेले समास' आहेत. वाचण्याच्या आणि उच्चाराच्या सोईसाठी कधीकधी असे करावे लागते.---J १८:१५, ११ मार्च २००७ (UTC)

टेक्सासचे विशेषण टेक्सन असे होते पण (अमेरिकन) इंग्लिशमध्येही टेक्सासच्या प्रजासत्ताकला टेक्सन प्रजासत्ताक असे न म्हणता रिपब्लिक ऑफ टेक्सास असेच म्हणतात.
अभय नातू
टेक्सासचे राज्यपाल →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०३:४९, १ मार्च २००७ (UTC)

उ.:टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष

J, तुम्ही लिहिलेल्या 'अतिशय परिचयाच्या विशेष नामाला प्रत्यय लावताना त्या नामाचे सामान्य रूप करावे. अन्यथा नाही.' या विधानातील 'अन्यथा नाही' वाचून आश्चर्य वाटले. मराठी व्याकरणाच्या नियमांप्रमाणे सर्व नामे (मग ती सर्वनामे असोत किंवा सामान्यनामे किंवा विशेषनामे!) विभक्तीरूपे घेताना मूळ रूपे बदलतात .. म्हणजेच 'व्यय पावतात'(आणि म्हणूनच सर्व नामे व्याकरणदृष्ट्या 'व्यय' शब्दांच्या वर्गात गणली जातात.). तुम्ही लिहिलेल्या 'सीतेला, सुमित्रेने, कौसल्याचे, शूर्पणखेपासून, पुण्यात' या उदाहरणांत (आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईने म्हणा किंवा मराठी भाषेच्या सुदैवाने :) ) व्याकरणाचा हा मूलभूत नियम पाळला जातो. :) परंतु 'अत्यंत कमी परिचय असेल तर सामान्य रूप करायचे नाही. उदा: सीतेला परंतु गीताला, कुलकर्ण्यांच्या सुमित्राला(सुमित्रेला नाही)' या विधानातील 'लॉजिक' हल्ली सख्ख्या भावा-बहिणींच्या नावांबाबतही लावले जाते. पण तिथे अल्पपरिचयाचा प्रश्नच उद्भवत नाही. मलातरी व्याकरणाचे नियम धाब्यावर बसवण्याचा सध्याचा कल मराठीभाषिकांच्या हिंदी, इंग्लिश वगैरे परभाषांचे अंधानुकरण करण्याच्या प्रवृत्तीतून, आणि स्वभाषेच्या अभ्यासाबाबत अनास्थेतून उद्भवलाय असे वाटते. हिंदी भाषेत नामांची विभक्तीरूपे एकवचनाततरी सहसा 'व्यय पावत' नाहीत.उदा.: 'पुणे में रेव पार्टी का आयोजन'/'सीता का हरण' वगैरे हिंदीत चालते. पण मराठी भाषेचे तसे नाही; सर्व प्रकारांची नामे व्यय पावण्याची मराठीची मूळ प्रवृत्ती आहे. असाच प्रकार इंग्लिशमुळे! 'Award winner' या शब्दांचे मराठीत 'पारितोषिक विजेते' असे सरळसरळ भाषांतर.. :D! मराठीत (आणि हिंदीसह इतर संस्कृतोद्भव भारतीय भाषांत) 'समास' नावाचा एक छान प्रकार असतो; जो इंग्लिश भाषेत नाही. ही जाणीव विसरून व्याकरणनियमांची (=व्याकरणाच्या नियमांची :)) मस्तपैकी (त्या 'पारितोषिक विजेते' शब्दांप्रमाणेच) मोडतोड केली जाताना दिसते. आणि या प्रकाराला 'वाचनाच्या आणि उच्चाराच्या सुलभतेचे' छानसे 'sugar coating' पुढे केले जाते (आपणा भारतीयांची ही एक दांभिकता मला खरोखर बुचकळ्यात पाडते.. आपल्या भाषेतले जिभेला व्यायाम देणारे शब्द आम्हाला नकोत, पण साहेबांच्या भाषेतली toungue twister उच्चारांची शब्दसंपदा मात्र आम्ही घोटवून घोटवून कंठी रुजवणार! LOL). आपल्याकडची प्रसारमाध्यमेदेखील वाक्यरचना, शुद्धलेखन, व्याकरण या गोष्टींचा नकळत कित्येकदा चुथडा करतात.. कारण अर्थातच पत्रकारांपैकी बर्‍याच जणांचा तोकडा, वरवरचा भाषाभ्यास. तुलनेने इंग्लिश भाषा खूप सुदैवी.. आपल्यापेक्षा दर्जाने, प्रमाणाच्या दृष्टीने भाषेच्या अभ्यासाची त्यांची परंपरा वाखाणण्याजोगी वाटते.

असो.. गाडी पुन्हा रुळावर घेतो. :) व्याकरणाच्या नियमांची माझी माहिती मी मांडली. या नियमांना 'अपवाद' करणारे संकेत सांगणारा तुम्ही म्हणताय तसा नियम संदर्भासह मांडलात तर बरे होईल. 'टेक्सास प्रजासत्ताक' हे विशेषनाम धरून त्याची विभक्तीरूपे विस्तारण्यासंदर्भात 'भारतीय संघराज्य' या शब्दांचे समांतर उदाहरण घेऊ. 'Federation of India' या अर्थाने वापरल्या जाणार्‍या या शब्दसमूहाची विभक्तीरूपे त्यातील 'संघराज्य' या अंत्य शब्दाप्रमाणे चालतात; म्हणजे 'भारतीय संघराज्याला'(द्वितीया विभक्ती), 'भारतीय संघराज्याने'(तृतीया), 'भारतीय संघराज्याला'(चतुर्थी), 'भारतीय संघराज्याहून'(पंचमी), 'भारतीय संघराज्याचे/चा/ची'(षष्ठी), 'भारतीय संघराज्यात'(सप्तमी) इत्यादी. या न्यायाने 'टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष' असे शीर्षक होईल असे माझे मत आहे.

मराठी विकिपीडियावरील एकंदरीतच शीर्षकलिखाणात, मजकूरलिखाणात मराठी भाषेच्या व्याकरणनियमांशी बांधिलकी जपली गेली पाहिजे असे माझे मत आहे. कारण, हे नियम कित्येक शतकांच्या भाषिक मंथनातून घडले आहेत, त्यावर अभ्यास, संशोधन करण्यात बर्‍याच वैयाकरणी विद्वानांनी त्यांची प्रज्ञा लावली असेल.. त्यामुळे व्याकरणनियम दुर्लक्षून त्या प्रयत्नांना, परंपरेला मातीमोल ठरवणे अयोग्य आहे.

--संकल्प द्रविड ०५:५२, १२ मार्च २००७ (UTC) ---संकल्पद्रविड यांना---तुमची माहिती मला योग्य वाटत नाही. फक्त अतिपरिचयाच्या विशेषनामांचेच सामान्यरूप होते. रामायणातल्या रामाला परंतु विलास पासवानांच्या रामला. रामपत्नी सीतेला परंतु शेजारी राहण्यार्‍या सीताला. व्याकरणात या बाबतीत स्पष्ट नियम आहेत. अरण्य हे विशेष नाम नाही; म्हणून अरण्याला. 'भारतीय प्रजासत्ताकाचा' यात प्रजासत्ताक हे सामान्य नाम आहे म्हणून सत्ताकाचा लिहिता येते, नव्हे तसेच लिहायला पाहिजे. भारतीय प्रजासत्ताक हे कुठल्याही देशाचे (विशेष)नाम नाही. देशाचे नाव भारत आहे. इथे टेक्सासचे प्रजासत्ताक हे देशाचे (विशेष)नाम आहे. अभयचे घड्याळ, इराणचे अध्यक्ष हे शब्दप्रयोग आपण हिंदीच्या प्रभावाने करीत नाही आहोत. हिंदी भाषा आत्ताआत्ता जन्माला आली आहे. मराठी फार जुनी आहे. (हिंदीतील पहिले कवी नामदेव आहेत. त्यापूर्वी व्रजभाषा, अवधी, भोजपुरी वगैरे भाषा होत्या). जयंताची सायकल जर जयंत अतिपरिचयाचा असेल तर बरोबर आहे, नसेल तर जयंतची सायकल असेच म्हणावयास पाहिजे. लताने गायलेले गीत, लतेने म्हणणारा मार खाईल. आता टेक्साससंबंधी. चीनपासून चिनी, मारवाडपासून मारवाडी, अमेरिकापासून अमेरिकन किंवा अमेरिकी अशी विशेषणे होतात. तसे टेक्सासपासून केले तर ते टेक्सासी होईल. तसे केल्यास 'टेक्सासी प्रजासत्ताक'चे हेच बरोबर रूप होईल. "पूर्वी टेक्सास हा एक प्रजासत्ताक देश होता. या प्रजासत्ताकाची(सामान्य नाम) राजधानी वगैरे वगैरे" हे बरोबर आहे.. 'टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे' म्हटले तर प्रजासत्ताक हे देशाच्या नावाचा भाग होत नाही. पण व्याकरणदृष्ट्या बरोबर. लंडनाच्या म्हणणे जितके बरोबर तितकेच टेक्सासी प्रजासत्ताकाचे. सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे 'शिवण यंत्र'सारखा समास करणे. 'टेक्सास प्रजासत्ताक'चे अध्यक्ष वगैरे.--J २०:०८, १२ मार्च २००७ (UTC)

संकल्प द्रविड यांना--तुमचा मुद्दा तुम्ही छान मांडलात, तरीही मी सहमत नाही. प्रत्येक नामाचे(विशेषनामाचेसुद्धा) सामान्य रूप होते हे पटण्यासारखे नाही. औरंगजेबाने शिवाजीला कैदेत टाकले, शिवाज्याला नाही. पण प्राण्याची शिकार करतात, प्राणीची नाही. परिचय आणि अतिपरिचय या सापेक्ष संज्ञा आहेत. लताची आई/बहीण/जिवलग मैत्रीण तिच्यासंबंधी बोलताना लताचा, लतेचा, लतीचा, लतुकलीचा असे काहीही म्हणू शकतात. आपण अल्पपरिचितांनी 'लताचा' असेच म्हणणे शिष्टसंमत आहे. दुसरे असे की टेक्सासपासून टेक्सन हे विशेषण होते ते ब्रिटिश किंवा अमेरिकन इंग्रजीत. मराठीत टेक्सासी होईल. इंग्रजीत इंडियन परंतु मराठीत भारतीय, अरेबियन परंतु मराठीत अरबी. देशाचे अधिकृत नाव Republic of Texas आहे, त्याचे मराठी रूपांतर आपण आपल्या व्याकरणाप्रमाणे(समास करून किंवा विशेषण वापरून) करावयाचे. --J १०:१०, १३ मार्च २००७ (UTC)

मुखपृष्ठ सदर एप्रिल २००७

एप्रिल २००७च्या मुखपृष्ठ सदर लेखासाठी नामनिर्देशन कौलपानावर करा.

अभय नातू १८:१३, १ मार्च २००७ (UTC)

मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी

नमस्कार. मराठी विकिपीडियाचे सदस्य वाढत आहेत व प्रगती देखिल होत आहे.आज मी जेव्हा सर्वभाषीक विकिपीडियांची सूची पाहिली तेव्हा हिंदी विकिपीशिया आपल्याला जवळजवळ गाठ्त चालली आहे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. आपल्यातील अनेकजण काही लेखांवर काम करुन ते विस्तृत करतात. हे चागले आहे पण विकिवरील लेखांची संख्या देखिल वाढली पाहिजे.त्यामुळे मध्यम मार्ग म्हणजे एका लेखांवर जास्त वेळ खर्च करण्यापेक्षा सर्व लेख एका समाधानकारक length पर्यंतच वाढवावा. त्यामुळे लेखांची संख्या वाढेल व विकिफीडियाची depth वाढेत्ल (सध्या=९). उदा- ब्रिटानिकावरील बेळगांवविषयक लेख केवळ १५-१६ ओळींचा आहे. सांगायचा मुद्दा हा की काही लेख पानभर व बाकी सर्व कोरे असे न करता सर्व लेख विषयानुसार ५-१० ओळीत लिहावेत (मासिक सदर वगळून). माहिती गोळा करुन नेमक्या उपयुक्त १० ओळी घेऊन लेख बनवण्यात संपादकांची खरी परीक्षा असेल. आशा आहे तुम्हाला माझा मुद्दा कळला व नंतर पटला असेल! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १८:२५, २ मार्च २००७ (UTC)

महाराष्ट्र एक्सप्रेस,
अगदी नेमके बोललांत! अनेक विकिपीडिया, हिंदी, बंगाली, तेलुगू, यांची लेखसंख्या मराठीपेक्षा जास्त असली तरी त्यातील बरेचसे लेख कोरेच आहेत. यांची गणती या पानावरील Stub ratio या रकान्यात आढळेल. थोडक्यात, मराठी विकिवरील ४५% लेख नुसतेच (कोरे) आहेत, तर तेलुगूत ७४%, बंगालीत ३८% आणी हिंदीत ५९%. म्हणजेच मराठी विकिपीडियाची उपयुक्तता तेलुगू व हिंदीपेक्षा कितीतरी अधिक आहे!!! याचे अजून एक मानक म्हणजे येथील Depth हा रकाना. ज्या विकिपीडियाची Depth जास्त तो जास्त समृद्ध आहे असे मान्य केले गेलेले आहे. या मानका प्रमाणे तेलुगू १ (पार टुकार गुणवत्ता), बंगाली १४ (मध्यम) तर हिंदी ५ (ठीक) असे आहेत. मराठीची गुणवत्ता ९ आहे. मराठीपेक्षा जास्त पाने असलेल्या ६४ पैकी ११ विकिपीडियांची गुणवत्ता मराठीपेक्षा कमी आहे.
तर सांगायचे असे की मराठी विकिपीडियावरील लेख कमी असले तरी त्यांची सरासरी गुणवत्ता भारतीय भाषांमध्ये दुसर्‍या क्रमांकाची (बंगाली नंतर) आहे.
असे असले तरी लेखांची संख्या वाढवायला हवीच!! गुणवत्ताही टिकवायला हवी. त्यासाठी आपण सुचवलेला मुद्दा अगदी उत्तम आहे. हे करण्यासाठी मी रोज एक पान या यादीतूऩ निवडतो व मजकूर शोधून त्यात घालतो.
अभय नातू १८:४४, २ मार्च २००७ (UTC)
आपल्या माहितीबद्दल आभार. तेलूगूची depth 1 आहे आणि भर म्हणून अनेक लेख इंग्रजी भाषेतच copy+paste केले गेले आहेत. उदा.महाराष्ट्र व बेळगांव. म्हणजेच भारतीय भाषांत मराठी विकिपीडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण ती सुची लेखांच्या संख्येवर आधारलेली आहे व असे करणे चूक आहे. असो आपण दिलेल्या shortpages च्या दुव्यातील लेखांवर मी देखिल काम करेन. सर्व सदस्यांनी या बाबत विचार करावा ही विनंती. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०९:००, ३ मार्च २००७ (UTC)

बेळगांव

नमस्कार बेळगांव लेख पूर्ण झाला आहे व सम-समीक्षा अपेक्षित आहे. आशा आहे पुढील महिन्याचा मासिक लेख म्हणून बेळगांवाची निवड होईल. या लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे हा लेख इंग्रजी लेखाचे भाषांतर नसून विकिनियमांनुसार स्त्रोत देऊन लिहिलेला लेख आहे. सर्व माहिती विविध संकेतस्थळांतून जमा केली आहे व इंग्रजी विकिचा कमीत कमी वापर केला आहे. इतर संपादकांना विनंती की त्यांनी स्त्रोत या साच्याचा वापर करावा व मराठीतील ओरिजिनल लेखांची निर्मिती करावी. पुढील महिन्यातच सर्वोच्च न्यायालयार बेळगांवाचा निकाल लागणार आहे त्यामुळे पुढील मासिक लेख बेळगांव असल्यास बरे होईल. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ११:२४, ४ मार्च २००७ (UTC)

कोणती माहिती विकिपीडियाच्या ऐवजी विकिपीडियाच्या कोणत्या सहप्रकल्पात असणे श्रेयस्कर असेल.

'मराठी विकिपीडियाचे सहप्रकल्प आणि कोणती माहिती विकिपीडियाच्या ऐवजी विकिपीडियाच्या कोणत्या सहप्रकल्पात असणे श्रेयस्कर असेल' बद्दल नवीन साहाय्य लेख लिहीणे एक मराठी विकिपीडियाची साहाय्य विषयक लेखातील् प्राथमिकता आहे असे मला वाटते. असा लेख लिहून कुणी मदत करू शकल्यास पहावे हि नम्र विनंती.

विजय १२:४५, ४ मार्च २००७ (UTC)

आमाआका?

नवीन माहिती (युरो) स्त्रोत-इंग्रजी विकि (en:European union)

आमाआका चे मागील अंक एकाच पानावर ठेवले आहेत. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०७:२७, ९ मार्च २००७ (UTC)


Blogger now supports Unicode Input

If you have blogger.com account, you can type in devnagari, directly into the blogger post and save it as draft or publish it on your blogspot.

http://help.blogger.com/bin/answer.py?answer=58226

To enable this feature, go to the Settings | Basics page and select "Yes" for the transliteration option. Now you don't need to install Baraha or any other software. Just login to blogger account and start typing.

--Shantanuo १६:१६, ९ मार्च २००७ (UTC)

मराठी मध्ये व्यवस्थित लिहण्याकरता नावाजलेल्या संगणक प्रणाली पैकी संगणक प्रणाली घ्यावी

C-DAC Gist ब Modular श्रीलिपी या नावाजलेल्या संगणक प्रणाली आहेत. या निर्मात्या पैकी एका कडून एक Bi-Lingual (English + Devnagari) EOT व PFR FONT घ्यावा. तसेच on-line लिहण्याकरता Inscript Keyboard Handle घ्यावे. त्या बदल्यात त्याना १०० रुपया पर्यंतच्या on-line software sale ची परवानगी द्यावी. या योगे विकिपीडियावर लिहणे सोपे होईल ब शुद्धलेखनाच्या चुका Spell Checker च्या सहाय्याने तपासता येतील. जनहितवादी १७:५२, ११ मार्च २००७ (UTC)

मराठी (व इतर भाषेतीलही) विकिपीडिया संपूर्णपणे स्वयंसेवकांच्या कष्टाने चालतो. येथे कोणीही कोणालाही पैसे देत/घेत नाही. तरी त्यांना सॉफ्टवेर सेलची परवानगी देण्याचा प्रश्न येत नाही.
विकिपीडियावर जाहिरातींना (आजतगायत) परवानगी नाही. तरी तोही मार्ग उपलब्ध नाही.
अभय नातू ०४:२८, १२ मार्च २००७ (UTC)

विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१

Dear Friends, Personaly I am interested in sending introductory letters by post to various universities and colleges to seek contribution to Marathi Wiktionary and Marathi Wikipedia.

Specialy I feel developing Wiktionary is strategicaly important to us. Simmillarly contributions from legal experts is needed in respect of 'copy right' related help pages. So I was thinking to send letters to HOD's of Marathi Departments of colleges and universities and similleraly to Law colleges in Maharashtra.So may be few of those HODs would support in putting up our letter on their notice board.

I request your assistance in formatting and corrections at

विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१‎ this link.

Thanks and regards

Mahitgar ०५:४१, १२ मार्च २००७ (UTC)