हेनान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हनान या पानावरून पुनर्निर्देशित)
हेनान
河南省
चीनचा प्रांत

हेनानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
हेनानचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी झेंगचौ
क्षेत्रफळ १,६७,००० चौ. किमी (६४,००० चौ. मैल)
लोकसंख्या ९,९३,६५,५१९
घनता ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-HA
संकेतस्थळ http://www.henan.gov.cn/

हेनान (देवनागरी लेखनभेद: हनान; चिनी लिपी: 河南 ; फीनयिन: Hénán) हा चीन देशाच्या मध्य-पूर्व भागातील एक प्रांत आहे. सुमारे ३२०० वर्षांचा इतिहास असलेला हा प्रांत चिनी संस्कृतीचे उगमस्थान मानला जातो. चीनच्या ८ प्राचीन राजधानीच्या शहरांपैकी ४ शहरे ह्याच प्रांतात स्थित आहेत. शाओलिन मंदिर तसेच जगातील सर्वाधिक उंच असलेला पुतळा स्प्रिंग टेंपल बुद्ध याच प्रांतात आहेत.

आजच्या घडीला हेनान प्रांत चीनमधील तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा प्रांत असून २०२० साली येथील लोकसंख्या सुमारे ९.९३ कोटी इतकी होती. झेंगचौ हे हेनानच्या राजधानीचे व सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

राजकीय विभाग[संपादन]

हेनान प्रांत एकूण १७ उप-प्रांतीय शहरांमध्ये विभागला गेला आहे.

Administrative divisions of Henan

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

विकिव्हॉयेज वरील हेनान पर्यटन गाईड (इंग्रजी)