शिंच्यांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिंज्यांग
新疆维吾尔自治区
شىنجاڭ ئۇيغۇر ئاپتونوم رايونى
चीनचा प्रांत

शिंज्यांगचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
शिंज्यांगचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी उरुम्छी
क्षेत्रफळ १६,६०,००१ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २,०९,५२,०००
घनता ११.८ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.xinjiang.gov.cn/

शिंच्यांग स्वायत्त प्रदेश (मराठी लेखनभेद: शिंच्यांग, शिंज्यांग ; पारंपरिक चिनी लिपी: 新疆 ; फिन्यिन: Xīnjiāng ; उय्गुर: شىنجاڭ ئۇيغۇر ئاپتونوم رايونى ;) हा चीन देशाचा आकाराने सर्वात मोठा राजकीय विभाग व एक स्वायत्त प्रदेश आहे. चीनच्या पश्चिम व वायव्य कोपर्‍यात वसलेल्या ह्या प्रदेशासोबत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, कझाकस्तानमंगोलिया ह्या देशांच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत.

अनेकदा मध्य आशियामध्ये गणल्या जाणाऱ्या शिंच्यांग प्रदेशातील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. उरुम्छी ही शिंच्यांगाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.