उन्हाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उन्हाळा हा भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी एक आहे. उन्हाळ्यात हवामान गरम आणि कोरडे असते. उन्हाळ्यात शाळा आणि विद्यापीठांना सुट्टी असते.

भारतात उन्हाळा फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटताना दिसते. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुरुवातीला होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे केले जातात, याच वेळी कलिंगड, फणस, इत्यादी फळे पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात आंबा पिकलेला दिसतो. याच काळात वळिवाचा वादळी पाऊस पडतो.

तापमान[संपादन]

या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुपाने पडतात.त्यामुळे तपमानात वाढ होते.महाराष्ट्र राज्यातील विदर्भात तर उन्हाचा कहरच असतो.उन्हामुळे पारा ४७ सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे(४६.७ किंवा ४७.६) राहु शकतो.[ संदर्भ हवा ]जमीन प्रचंड तापते.दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वहात राहतात.भारताच्या इतरही राज्यात साधारणतः हीच परिस्थिती असते.राजस्थानमध्ये ४९ इतके तापमानही राहते.[ संदर्भ हवा ]

तपमान वाढीची कारणे[संपादन]

लोकसंख्यावाढ,त्यामुळे होणारी उपलब्ध पाण्याची विभागणी,प्रचंड प्रमाणात वृक्षतोड,पर्यायी झाडे न लावणे, सिमेंटनी बांधलेली बांधकामे,जमीनीवर पडणारे पावसाचे पाणी जमीनीत न मुरणे कारण जमीनीवर झालेली बांधकामे व रस्ते,पादपथ,औद्योगिकीकरण,पाण्याचा जमीनीतुन प्रचंड उपसा इत्यादी कारणे आहेत.[ संदर्भ हवा ]

ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर