धूमकेतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धूमकेतू किंवा शेंडेनक्षत्र म्हणजे उल्केसारखाच असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे. धूमकेतू अतिलंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात व फिरताफिरता ते प्लूटोच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार असतात.

धूमकेतू सूर्यापासून अतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग सौर तेजोमेघापासून(Solar nebula) बनलेल्या घन कचऱ्यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अतिथंड धूमकेतूच्या आतील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर त्याच्यापासून उल्का होतात.

हेसुद्धा पाहा[संपादन]