केल्व्हिन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
तापमान मोजण्याचे एक एकक. केल्विन हे रसायनशास्त्रीय दृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमान एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानाईट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे बंधनकारक आहे. केल्विन व सेल्सियस हे एकाच प्रमाणात वाढणारे एकक आहे.
१ अंश सेल्सियस तापमानात वाढ = १ केल्विन तापमानात वाढ
परंतु ० केल्विन = -२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन
अश्या प्रकारे अंश सेल्सियचे चे केल्विन मध्ये रुपांतर करण्यासाठी खालील सुत्राचा वापर करतात.
केल्विन = अंश सेल्सियस + २७३

