च्यापास (संपूर्ण नाव: च्यापासचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Chiapas)हे मेक्सिको देशाचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे. च्यापासच्या पूर्वेस ग्वातेमाला, दक्षिणेस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. तुत्स्ला गुत्येरेस ही च्यापासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या च्यापासमध्ये माया संस्कृतीमधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. येथे अनेक वंशाचे स्थानिक अदिवासी स्थित आहेत.
मेक्सिकोच्या दक्षिण भागात ७३,२८९ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १०व्या तर लोकसंख्येने सातव्या क्रमांकाचे मोठे आहे.
पर्यटनस्थळे [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]