गेरेरो (संपूर्ण नाव: गेरेरोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Guerrero)हे मेक्सिको देशाच्या दक्षिण भागातील एक राज्य आहे. गेरेरोच्या दक्षिणेस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. शिल्पांसिंगो ही गेरेरोची राजधानी तर आकापुल्को हे सर्वात मोठे शहर आहे.
१८४९ साली स्थापन झालेल्या गेरेरो राज्याला मेक्सिकोचा स्वातंत्र्यसेनानी व दुसरा राष्ट्राध्यक्ष व्हिसेंते गेरेरो ह्याचे नाव दिले गेले आहे. पर्यटन हा गेरेरोमधील सर्वात मोठा व्यवसाय असून आकापुल्को हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
आजच्या घडीला येथील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांमुळे गेरेरो हे मेक्सिकोमधील सर्वात धोकादायक राज्य मानले जाते.
मेक्सिकोच्या दक्षिण भागात ६३,६२१ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १४व्या तर लोकसंख्येने बाराव्या क्रमांकाचे मोठे आहे.
चित्र दालन [संपादन]
|
|
|
आकापुल्कोमधील समुद्रकिनारा
|
|
बाह्य दुवे [संपादन]