शिर्डी
| ?शिर्डी महाराष्ट्र • भारत |
|
| — शहर — | |
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
• ५०४ m (१,६५४ ft) |
| जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
| लोकसंख्या | (२००१) |
| अलकाताई शेजवळ | नगराध्यक्षा |
| चंद्रकांत खोसे | मुख्याधिकारी |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४,२३,१०९ • +९१ २४२३ • एमएच-१६ |
गुणक: शिर्डी
उच्चार (सहाय्य·माहिती) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.
अनुक्रमणिका |
इतिहास[संपादन]
शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.
साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर[संपादन]
साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, इ.स. १९१८ रोजी साईबाबानी समाधी घेतली.
साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.
दळणवळण[संपादन]
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी. आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.
बाह्य दुवे[संपादन]
- साईबाबा संस्थानाचे संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |