सीरिया
सीरिया الجمهورية العربية السورية सीरियाचे अरब प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: हुमाद अद्-दियात | |||||
सीरियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
दमास्कस | ||||
अधिकृत भाषा | अरबी | ||||
सरकार | अध्यक्षीय एक-पक्ष प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | बशर अल-अस्साद | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १७ एप्रिल १९४६ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १८५,१८० किमी२ (८८वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.०६ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | २,२१,९८,११०[१] (५१वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ११८.३/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ९९.५४४ अब्ज[२] अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ४,८८७ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७४२ (मध्यम) (१०७ वा) (२००७) | ||||
राष्ट्रीय चलन | सीरियन पाऊंड | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | + २:०० (यूटीसी) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | SY | ||||
आंतरजाल प्रत्यय | .sy | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ९६३ | ||||
सीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैर्ऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
इतिहास
[संपादन]माजी संरक्षणमंत्री ’मुस्ताफा तलास’ माजी अध्यक्ष हाफिज अल अस्साद (बशार अल अस्साद ह्या सध्याच्या अध्यक्षांचे वडील) यांच्याशी त्यांचे भावासारखे संबंध होते. सीरिया आणि इजिप्त ही राष्ट्रे इ.स. १९५८ ते इ.स. १९६१ च्या दरम्यान अब्दुल गमाल नासर यांच्या प्रेरणेतून 'संयुक्त अरब प्रजासत्ताक' या नावाने एक झाली होती. त्यावेळी हाफिज अल अस्साद आणि मुस्ताफा तलास हे दोघेही लष्करात होते, आणि त्यांनी सत्ताधारी बाथ पक्षातर्फे कैरो येथून या प्रजासत्ताकाबाबतची आपली जबाबदारी उचलली होती. पण हा प्रयोग फसल्यावर ही दोन राष्ट्रे पुन्हा वेगळी झाली, आणि ते दोघे परत सीरियाला परतले. त्यांनी एकत्र काम करून इ. स. १९६३ साली बाथ पक्षाला सत्तेवर आणण्याची मोठी कामगिरी बजावली. इ. स. १९६० च्या दशकात त्यांनी नेहमीच घडणाऱ्या 'राज्यक्रांत्या, ऊठसूठ नेतृत्वपालट आणि प्रति-राज्यक्रांती'च्या आवर्तनांना यशस्वीपणे तोंड देत सत्ता अबाधितपणे 'बाथ' पक्षाकडेच राखली.
तलास यांच्या खंबीर पाठिंब्याच्या बळावर हाफीज यांनी रक्तपात होऊ न देता यशस्वी राज्यक्रांती घडविली आणि तलास यांना इ. स. १९७० साली संरक्षणमंत्र्याचे पद देऊ केले. तलास कुटुंबीयांच्या व्यापक लष्करी आणि व्यावसायिक संबंधांच्या साहाय्याने सुन्नी-अलावी यांच्यामधील सत्तेच्या सर्वोच्च पातळीवरील एकोपा अनेक दशके टिकला. इ. स. २००० साली हाफीज अल अस्साद मृत्यू पावल्यानंतर तलास यांच्या पितृसदृश छायेखाली, त्यावेळी राजकारणात अगदीच नवखे असलेले बशार अल अस्साद नव्याने मिळालेल्या सत्तेवर आपली पकड दृढ करू शकले.
जुलै २०१२ मध्ये ब्रिगेडियर तलास यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशीर अल् अस्साद यांची साथ सोडली आणि ते बंडखोरांना जाऊन मिळाले. अस्साद यांच्या अल्पसंख्यांक ’अल्वाईट’ राजवटीला याच कुटुंबामुळे सुन्नी मुसलमानांकडून खंदा पाठिंबा मिळत आलेला होता.
भूगोल
[संपादन]सीरियाचे भूगोलातील स्थान मध्यपूर्वेत आहे. या देशाची सीमा कुठेही इराणशी जोडलेली नसली, तरी इराकमधून हे दोन्ही देश एकमेकांना जोडलेले आहेत.
सीरियाच्या चतुःसीमा
[संपादन]तुर्कस्तान असून पश्चिमेला लेबॅनॉन आणि भूमध्यसागर आहे. दक्षिणेला जॉर्डन व इराक असून, पूर्वेलाही इराक आहे.
सीरियाचे प्रशासकीय विभाग
[संपादन]सीरिया देश प्रशासनाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे विभाजित करण्यात आलेला आहे.
- १४ प्रशासकीय विभाग (मुहाफजल)
- ६४ जिल्हे (मिन्तार्क)
- २७५ उपजिल्हे (न्हीया)
सीरियामधील महानगरे
[संपादन]दमिश्क - अलेप्पो - लताकिया - होम्स - हमा
सीरियामधील मोठी शहरे
[संपादन]अल-हसाख - दीर अज़-ज़ोर - अर-रक्का - इदलिब - डारा - अस-सुवयदा - तरतूस.
छोटी शहरे
[संपादन]अल कमीशली - नवा - अर-रास्तान - मयसफ़ - सफ़िता - जाब्लेह - अथ-थवारा - दुमा - बनियास - अन-नब्क- कुसैर - मालौला - ज़बादानी - बोसरा - जरामाना - अत-ताल - सलामिये- सैदान्या - अल-बाब - जिस्र अल-शुग़ुर
समाजव्यवस्था
[संपादन]धर्म
[संपादन]सीरियाची लोकसंख्या सव्वादोन कोटी आहे व त्यात ७४ टक्के जनता सुन्नी मुस्लिम (जास्त करून अरब वंशाचे सुन्नी पण त्यात कुर्द, सिर्काशियन आणि तुर्कमानी लोकही येतात) असून १२ टक्के अरब वंशाचे अलावाईत आणि शिया या आहेत. उरलेल्यांत १० टक्के ख्रिस्ती आहेत (त्यात अरब, असीरियन आणि आर्मेनियन वंशाचे लोक येतात) आणि ३ टक्के ड्रूझ (यांनाही शियापंथीय मानले जाते) आहेत. म्हणजेच ८७ टक्के सीरियन लोक मुस्लिम असून जास्त करून अरब वंशाचे आहेत.
सीरियावरील पुस्तके
[संपादन]- सीरिया - सगळे विरुद्ध सगळे (लेखक - निळू दामले)
संदर्भ
[संपादन]- ^ "Central Intelligence Agency. July 2010 est". 2017-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-10-04 रोजी पाहिले.
- ^ "Syria". 2010-04-21 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- सीरियाचे परराष्ट्रमंत्रालय Archived 2019-10-16 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील सीरिया पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |