विकाराबाद जिल्हा
विकाराबाद जिल्हा వికారాబాద్ జిల్లా (तेलुगु) | |
तेलंगणा राज्यातील जिल्हा | |
तेलंगणा मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | तेलंगणा |
मुख्यालय | विकाराबाद |
मंडळ | १८ |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ३,३८६ चौरस किमी (१,३०७ चौ. मैल) |
भाषा | |
- अधिकृत भाषा | तेलुगु |
लोकसंख्या | |
-एकूण | ९,२७,१४० (२०११) |
-लोकसंख्या घनता | २७४ प्रति चौरस किमी (७१० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | १३.४८% |
-साक्षरता दर | ५७.९१% |
-लिंग गुणोत्तर | १०००/१००१ ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | चेवेल्ला आणि महबूबनगर |
-विधानसभा मतदारसंघ | १.विकाराबाद, २.तांडूर, ३.परिगी, ४.कोंडगल |
वाहन नोंदणी | TS-34[१] |
संकेतस्थळ |
विकाराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. विकाराबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
पूर्वीच्या रंगारेड्डी आणि महबूबनगर जिल्ह्यांपासून विकाराबाद जिल्हा तयार झाला आणि १८ मंडळांसह २ महसूल विभागांमध्ये विभागला गेला.[२]
प्रमुख शहर
[संपादन]- विकाराबाद
- तांडूर
भूगोल
[संपादन]विकाराबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३,३८६ चौरस किलोमीटर (८४५ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा संगारेड्डी, महबूबनगर, नारायणपेट, रंगारेड्डी जिल्ह्यांसह आणि कर्नाटक राज्याच्या सीमेसह आहेत.
पर्यटन
[संपादन]अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर
श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर नावाचे एक हिंदू मंदिर तेलंगणा, भारतातील विकाराबाद जिल्ह्यातील अनंतगिरी टेकड्यांवरील सुंदर डोंगराळ प्रदेशात आहे. अनंतगिरी डोंगरावरील हे मंदिर भगवान विष्णूच्या पूजेसाठी समर्पित आहे.
अनंतगिरी डोंगर
अनंतगिरी हिल्स, तेलंगणातील सर्वात आकर्षक थंड हवेच्या ठिकाणापैकी एक, हे विकाराबाद जिल्ह्याचे अभिमान मानले जाते. हैदराबाद शहरातून वाहणाऱ्या मुसी नदीचा उगम डोंगररांग आहे.
लोकसंख्या
[संपादन]२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या विकाराबाद जिल्ह्याची लोकसंख्या ९,२७,१४० आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १००१ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ५७.९१% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १३.४८% लोक शहरी भागात राहतात.
विकाराबाद जिल्ह्या मध्ये १८ मंडळे आहेत: विकाराबाद आणि तांडूर हे दोन महसुल विभाग आहेत.
अनुक्रम | विकाराबाद महसूल विभाग | अनुक्रम | तांडूर महसूल विभाग |
---|---|---|---|
१ | विकाराबाद | १२ | पेद्देमुल |
२ | मोमिनपेट | १३ | तांडूर |
३ | मरपल्ली | १४ | बशीराबाद |
४ | बंटवारम | १५ | यालाल |
५ | धरूर | १६ | बोम्मरासपेट |
६ | नवाबपेट | १७ | दौलताबाद |
७ | पूडूर | १८ | कोडंगल |
८ | परिगी | ||
९ | दोमा | ||
१० | कुल्कचर्ला | ||
११ | कोटिपल्ली |
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]
संदर्भ
[संपादन]- ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
- ^ Sravan (2018-02-11). "Telangana New Districts Names 2018 Pdf TS 31 Districts List". Timesalert.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-01 रोजी पाहिले.