Jump to content

चेस्टर ए. आर्थर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेस्टर अ‍ॅलन आर्थर

सही चेस्टर ए. आर्थरयांची सही

चेस्टर अ‍ॅलन आर्थर (इंग्लिश: Chester Alan Arthur), (ऑक्टोबर ५, इ.स. १८२९ - नोव्हेंबर १८, इ.स. १८८६) हा अमेरिकेचा २१वा राष्ट्राध्यक्ष होता. आर्थराच्या आधीचा अध्यक्ष जेम्स गारफील्ड याची हत्या झाल्यानंतर १९ सप्टेंबर, इ.स. १८८१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेला आर्थर ४ मार्च, इ.स. १८८५पर्यंत अध्यक्षपदावर होता. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत मुलकी सेवा सुधारण्याविषयीचा पेंडल्टन सिव्हिल सर्व्हिस रिफॉर्म अ‍ॅक्ट हा कायदा संमत होऊन लागू झाला. पेशाने वकील असलेला आर्थर अध्यक्ष बनण्याअगोदर जेम्स गारफील्ड याच्या अध्यक्षीय राजवटीत उपराष्ट्राध्यक्षपदाची धुरा वाहत होता.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2009-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी १, २००६ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "चेस्टर ए. आर्थर: अ रिसोर्स गाइड (चेस्टर ए. आर्थर: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)