सुषमा स्वराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुषमा स्वराज
सुषमा स्वराज


विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील सलमान खुर्शीद

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१३ मे २००९
मागील रामपाल सिंह
मतदारसंघ विदिशा

लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या
कार्यकाळ
२१ डिसेंबर २००९ – २६ मे २०१४
मागील लालकृष्ण अडवाणी
पुढील ठरायचे आहे

कार्यकाळ
१३ ऑक्टोबर १९९८ – ३ डिसेंबर १९९८
मागील साहिब सिंह वर्मा
पुढील शीला दीक्षित

जन्म १४ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-14) (वय: ६६)
नवी दिल्ली
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

सुषमा स्वराज (जन्म: १४ फेब्रुवारी १९५२) ह्या एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेच्या सदस्याभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. २००० - २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. इ.स. १९९८ मध्ये अल्पकाळासाठी त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्या डिसेंबर इ.स. २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विदिशा मतदारसंघामधून विजय मिळवला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना परराष्ट्र मंत्रालयाचे खाते मिळाले असून त्या भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री आहेत.