Jump to content

सुषमा स्वराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुशमा स्वराज या पानावरून पुनर्निर्देशित)
सुषमा स्वराज

कार्यकाळ
२६ मे २०१४ – ३० मे २०१९
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील सलमान खुर्शीद
पुढील सुब्रह्मण्यम जयशंकर

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१३ मे २००९ – २६ मे २०१४
मागील रामपाल सिंह
मतदारसंघ विदिशा

लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या
कार्यकाळ
२१ डिसेंबर २००९ – २६ मे २०१४
मागील लालकृष्ण अडवाणी
पुढील ठरायचे आहे

कार्यकाळ
१३ ऑक्टोबर १९९८ – ३ डिसेंबर १९९८
मागील साहिब सिंह वर्मा
पुढील शीला दीक्षित

जन्म १४ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-14) (वय: ७२)
नवी दिल्ली
मृत्यू ६ ऑगस्ट २०१९
नवी दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती स्वराज कौशल (१९७५)
अपत्ये बासुरी
गुरुकुल पंजाब विद्यापीठ
व्यवसाय वकील
धंदा राजकारणी
धर्म हिंदू

सुषमा स्वराज कौशल (जन्म : अंबाला, १४ फेब्रुवारी १९५२; - नवी दिल्ली, ६ ऑगस्ट २०१९) ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील व भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या होत्या. त्या २६ मे २०१४ पासून ते २०१९पर्यंत भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या; इंदिरा गांधीनंतर हे पद घेणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. त्या संसदेच्या सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या. १९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या.  त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. २००० - २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. त्या डिसेंबर इ.स. २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या.

२०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून ४,००,००० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने जिंकून आल्या होत्या. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र मंत्री बनल्या. अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वॉल स्ट्रीट जर्नलने स्वराज यांना भारताच्या 'आवडत्या राजकारणी' म्हणून निवडले.


AIIMS, नवी दिल्ली येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 6 ऑगस्ट 2019 रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने स्वराज यांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये त्यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील मरणोत्तर पद्मविभूषण, हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.[][]

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

[संपादन]

सुषमा स्वराज किंवा चिंकू स्वराज (पूर्वाश्रमीच्या शर्मा) यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियाणातील अंबाला कॅन्टोन्मेंट येथे हरदेव शर्मा आणि श्रीमती लक्ष्मी देवी यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख सदस्य होते. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातील लाहोरच्या धरमपूर भागातून भारतात स्थायिक झाले आहेत. स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले असून त्यांनी संस्कृत व राज्यशास्त्र हे विषय घेऊन पदवी प्राप्त केली. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला.

कारकीर्द

[संपादन]

१९७३ मध्ये, स्वराज यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

पुरस्कार

[संपादन]

इ.स. २०२०चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[]

मृत्यू

[संपादन]

६ ऑगस्ट २०१९ रोजी सुषमा स्वराज यांना संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले, तेथेच त्यांचा मृत्यू झाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Govt" (PDF).
  2. ^ "Sushma Swaraj | Arun Jaitley: Arun Jaitley, Sushma Swaraj, George Fernandes given Padma Vibhushan posthumously. Here's full list of Padma award recipients".
  3. ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. 2021-11-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "सुषमा स्वराज यांचे निधन - Former External Affairs Minister Sushma Swaraj Passes Away". Maharashtra Times. 2019-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.