लता मंगेशकर पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१. राष्ट्रीय लता मंगेशकर नावाचा हा पुरस्कार मध्यप्रदेश सरकारतर्फे इ.स. १९८४-८५पासून दिला जातो. सुगम संगीताच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या कोणत्याही भाषेच्या गायकास, वादकास किंवा संगीतकारास आळीपाळीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असे आहे. हा वार्षिक पुरस्कार ४ डिसेंबर रोजी किंवा त्याच्या आसपासच्या दिवशी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी इंदूरमध्ये दिला जातो.

आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :

नौशाद (१९८४-८५), किशोर कुमार, जयदेव, मन्ना डे, ख़य्याम, आशा भोसले (१९९०-९०), लक्ष्मीकांत-प्यारेलाल, के.जे. येसुदास, राहुल देव बर्मन , संध्या मुखर्जी, अनिल विश्वास, तलत महमूद, कल्याणजी आनंदजी, जगजीतसिंह, इलिया राजा, एस.पी. बालसुब्रमण्यम् (१९९९-२०००), भूपेन हजारिका, महेंद्र कपूर, रवींद्र जैन, सुरेश वाडकर, ए.आर.रहमान, कविता कृष्णमूर्ति, हृदयनाथ मंगेशकर, नितिन मुकेश, रवि, अनुराधा पौडवाल (२००९-१०)


२. संगीत आणि गायन क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या व्यक्तीस महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार’ दिला जातो. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-

माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं. जितेंद्र अभिषेकी, हृदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, रवींद्र जैन, प्यारेलाल शर्मा, मन्ना डे, स्नेहल भाटकर, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शाह, अशोक पत्की, कृष्णा कल्ले वगैरे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.