सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101/जुनी चर्चा १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


धन्यवाद राहुल[संपादन]

मराठी विकी बद्दलची कालची शिकवणी खूपच छान वाटली. आपल्या मराठी भाषेसाठी काहीतरी योगदान करू शकू अशा सुवर्ण संधीशी अवगत करून दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. -हरिष सातपुते

सहभाग[संपादन]

धन्यवाद राहूल मी अनुभववाद ही नोंद लिहित आहे, कृपया ती पाहावी, सुचना सांगाव्यात ही विनंती. श्रीनिवास


नमस्कार राहुल, तुम्ही सुचविल्यानुसार मी तमिल्क्युबवर काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण ते काम ऑनलाइन करावे लागते. ऑफ़लाईन कामासाठी बहारा सॉफ़्ट्वेअर फ़ारच चांगले पडते. मी दिनविशेषसाठी जरुर काम करेन. कळवावे, ही विनंती.

rahul namskar mee sadasya ahech, pan adyapi kaam jamat nahee. mala madatichi garaj aahe. krupaya mala cell no dvyava mee call karen maza no 9226563052


नमस्कार , राहूल आपण आत्त्तपर्यंत केलेली संपादने स्तुत्य आहेत. खासकरून भाषांतरात आपण भरीव योगदान करू शकाल असे वाटते; आवश्यक नाही पण सहज जमलेतर आपल्या सवडी प्रमाणे थोडा थोडा वेळ ज्ञानकोश लेखाच्या उर्वरीत भाषांतरास वेळ देणे जमल्यास पहावे हि विनंती.
आपण अमरावती लेखात भर घातली आहे त्याचे स्वागतच आहे , आपण मुंबई,पुणे,नागपूर,औरंगाबाद,नाशिक इत्यादी शहरा संदर्भातील लेख पाहिल्यास अमरावती लेखास अधीक उत्तम दिशा मिळण्यास मदत होईल.
२०१० इंडियन प्रीमियर लीग लेखातील माहिती चौकटीत आपण बदल केलेत,,पण ते तांत्रीक कारणामुळे आपल्याला दृष्टोत्पत्तीस पडले नसण्याची शक्यता आहे.विकिपीडियात माहिती चौकटी या साचा प्रकारांमध्ये मोडतात.त्यातही साचाच्या आत साचा अशी त्यांची रचना असते. त्यांची रचना अवघड नसलीतरी माहिती होण्यास कदाचित थोडा अवकाश लागेल,मी येत्या काळात काही संबधीत सहाय्य पानांचे दुवे आपणास उपलब्ध करेनच, या संदर्भाने काही सहाय्य लागल्यास सदस्य संकल्प द्रवीड यांच्याशी सुद्धा आपण संपर्क करू शकाल माहितगार ००:०५, १९ जानेवारी २०११ (UTC)

लेखन तपासून बघावे[संपादन]

नमस्कार!

आपण बनवलेल्या गेल्या काही लेखांची नावे सदोष होती; ती दुरुस्त केली आहेत. कृपया लेख जतन करायच्या आधी लिहिलेला सर्व मजकूर एकदा नजरेखालून घालून तपासावा; जेणेकरून शुद्धलेखनातील चुका अथवा टायपो टळतील.

धन्यवाद!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४९, २७ जानेवारी २०११ (UTC)

चावडीवरील सूचना/अपेक्षा[संपादन]

राहूल,चावडीवरील आपल्या सुचना/अपेक्षा रास्तच आहेत.काम पुरेसे नसले तरी काही पानांची सुरवात करण्याचे प्रयत्न केले त्या बद्दल अभिप्राय आणि जमले तर सक्रीय सहभागाचे स्वागत असेल विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू , विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/सुलभीकरण, विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न,विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी , मिडियाविकी चर्चा:Edittools

माहितगार ०६:०३, २८ जानेवारी २०११ (UTC)

स्रोत मजकूर आणि विकिपीडिया[संपादन]

नमस्कार!

आपण संत ज्ञानेश्वरांचे अभंग व त्यांतील अभंगांचे लेख बनवल्याचे पाहिले. ज्ञानेश्वरांचे किंव अन्य संतांचे साहित्य शंभरांहून (किंवा त्यांहून) अधिक वर्षांपूर्वीचे सर्व देशांतील प्रताधिकार कायद्यांच्या नियमांनुसार सार्वजनिक अधिक्षेत्रात (पब्लिक डोमेनात) मोडते. परंतु विकिपीडियावर असे पब्लिक डोमेन साहित्य/ अख्खेच्या अख्खे ऐतिहासिक कागदपत्रे/ ग्रंथ चढवणे अपेक्षित नसून, त्यांबद्दल विश्वकोशीय (समीक्षणात्मक किंवा रसग्रहणात्मकदेखील नव्हे) माहिती लिहिणे अपेक्षित आहे. विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे#विकिपीडिया म्हणजे चित्रे, माध्यम संचिका, दुवे अथवा स्रोत मजकुराच्या साठवणुकीचे संकेतस्थळ नव्हे येथील धोरणानुसार खरेतर हे अभंग किंवा संतसाहित्य मराठी विकिस्रोत प्रकल्पात मांडावे व त्याचे दुवे ज्ञानेश्वर लेखाच्या शेवटी नोंदवावेत.

चित्रपटांतील गाण्यांबद्दलतर मुद्दा अजूनच संवेदनशील असतो; कारण त्यांतील बहुसंख्य गाण्यांवरचे प्रताधिकार अजूनही लागू असू शकतात; त्यामुळे तशी गाणी प्रताधिकारमुक्ततेच्या हमीशिवाय विकिस्रोतावरदेखील घेता येत नाहीत.

या मुद्द्यांनुसार योग्य ते बदल करावेत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:५४, २९ जानेवारी २०११ (UTC)

स्पुट की स्फुट?[संपादन]

नमस्कार! माझ्या माहितीनुसार 'स्फुट' असा शब्द आहे (संदर्भ : मराठी शब्दलेखनकोश ; लेखक: प्रा. यास्मिन शेख ; प्रकाशक: मनोविकास प्रकाशन ;). वामन शिवराम आपटेकृत संस्कृत शब्दकोशातील नोंदीनुसार स्फुट् - स्फुटति (अर्थ: फुटणे, एखाद्या गोष्टीची फोड करणे ;) हा षष्ठगण परस्मैपदी धातू] 'स्फुट' या कर्मणि धातुसाधित विशेषणाचा मूळ धातू आहे. मराठीतही हे क.भू.धा.वि. संस्कृतातून तसेच आले आहे. 'स्पुट' असा शब्द माझ्या माहितीनुसार अस्तित्वात नाही.

लेखाचे नाव चूक तर होतेच, शिवाय लेखात स्फुटकाव्याविषयी साहित्यिक दृष्टिकोनातून वर्णनात्मक व विश्वकोशीय दखलपात्रतेचे काही लिहिले नव्हते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२४, ३१ जानेवारी २०११ (UTC)

चर्चा:रूप पाहतां लोचनीं विकिपीडिया[संपादन]

कृपया चर्चा:रूप पाहतां लोचनीं हि चर्चा पहावी

वर्गीकरणाची पद्धत[संपादन]

नमस्कार राहुल !

तुम्हांला विकिपीडियावर सक्रिय पाहून आनंद वाटला. तुम्ही वर्ग:काल्पनिक व्यक्ती‎‎ या वर्गात काही नावे लिहिल्याचे दिसले. परंतु वर्गीकरणात या पद्धतीने वर्गाच्या पानावर लेखांची नावे लिहिणे अपेक्षित नसून लेखांमध्ये योग्य ते वर्ग नोंदवणे, ही योग्य पद्धत असते. उदाहरणार्थ चिंटू या लेखात सर्वांत खाली [[वर्ग:काल्पनिक व्यक्ती‎‎]] असे लिहिलेले आढळेल. त्यामुळे तो लेख वर्ग:काल्पनिक व्यक्ती‎‎ वर्गात समाविष्ट होतो. आता तुम्हांला चिमणराव असा लेख लिहून तो या वर्गात समाविष्ट करायचा असेल, तर त्या लेखाच्या शेवटी वर दिल्याप्रमाणे सिंटॅक्स वापरून वर्ग नोंदवता येईल.

काही मदत लागली, तर जरूर कळवा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:२१, २६ एप्रिल २०११ (UTC)

विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे#वर्ग:काल्पनिक व्यक्ती
माहितगार ०८:१०, २६ एप्रिल २०११ (UTC)

वर्गीकरणासाठी मदत[संपादन]

नमस्कार राहुल, वर्गीकरण कसे करायचे या संदर्भात मी आधी अन्य काही सदस्यांना उपयोगी पडेल, अशी टिप्पणी कोणाच्यातरी सदस्यपानावर लिहिली होती. ती शोधून तुमच्या चर्चापानावर ैकडे चिकटवेन.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:१४, १६ जून २०११ (UTC)

नमस्कार राहुल ! जुन्या-पान्या चर्चापानांवर लिहिलेल्या माहितीचे संकलन करून सहाय्य:वर्ग या नावाने सहाय्य-पान बनवले आहे. तुम्हांला हवी असलेली वर्गीकरणाविषयीची माहिती तेथे मिळेल. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०७, २४ जून २०११ (UTC)संदर्भीकरण[संपादन]

नमस्कार,

तुम्ही संदर्भीकरणासाठीच्या मदतलेखात करीत असलेले बदल पाहून आनंद झाला. हा लेख मराठीत आल्यावर नवीन लेखकांना मदत होईल.

एक सूचना करावीशी वाटते की भाषांतर करताना शब्दशः भाषांतर न करता अभिप्रेत असलेला अर्थ मराठीतून लिहावा (उदा. A quick how-to चे भाषांतर एक त्वरित कसे करावे पेक्षा कसे करावे (थोडक्यात) हे अधिक बरोबर वाटते.)

अभय नातू १४:१५, २७ एप्रिल २०११ (UTC)

--नमस्कार अभय, (जी म्हणणार नाही .... पण एकेरी संबोधने मराठी मनाला आणि मानाला थोडे बोचते)

भाषांतर झाल्यानंतर पूर्वावलोकन करत असतांना मला पण सदर भाषांतर पटले नाही आणि म्हणून मी ते बदलले, अगदी आपल्या सूचनेच्या काही सेकंद अगोदर, पण तरी आपल्या मराठी विपी वर असलेल्या बारीक नजरेची दाद द्यावी लागेल.

धन्यवाद ..!

राहुल देशमुख १४:४०, २७ एप्रिल २०११ (UTC)

निर्मितीचमू[संपादन]

निर्मितीचमू हा शब्द प्रॉडक्शन टीम साठी ठीक वाटतो, पण दूरचित्रवाणीमालिकेच्या संदर्भात किती चपखल आहे याबद्दल मला शंका आहे.

अभय नातू ००:१९, १ मे २०११ (UTC)

आशयघनता, दर्जा[संपादन]

नमस्कार राहुल,

तुमचा विचार वाचून आनंद झाला. अशा सर्वसमावेशक धोरणांनीच विकिपीडियाचा विकास अधिकाधिक होईलच. तुमच्याच प्रमाणे मी गेली अनेक वर्षे स्वतःवर नियम घातलेले आहेत.

आशयघनतेला उद्दिष्ट असे नाही. हा आकडा असलेले लेख, पाने व संपादने यांवर आधारित आहे. तरीही मी दरमहिन्याला आशयघनता एक पूर्ण आकड्यानी वाढावी ही इच्छा/उद्दीष्ट मनात बाळगून आहे (एप्रिलमध्ये २२ होती, मेमध्ये २३ व्हावी). हे जरी निरर्थक उद्दीष्ट असले तरी त्याने मला नवीन लेख करण्यापेक्षा संपादने करण्यासाठीचे बंधन पडते. तसेच जेव्हा हे उद्दीष्ट पार पडते तेव्हा मी लेख वाढवण्याच्या मागे लागतो. अर्थात, वेळ पडली तर अधूनमधून लेख तयार करतोच.

एखाद्या सदस्याची आशयघनता काढता येते का याचा मी शोध घेतला पण काही सापडले नाही. अगदी पाहिजेच असल्यास मासिक डेटाडंपमधून ही माहिती विंचरता येईल, पण त्यास अनेक तास किंवा दिवसांचे प्रॉसेसिंग करावे लागेल.

माझे स्वतःची काही उद्दीष्टे/नियम मी घालून घेतली आहेत. ती तुम्ही किंवा इतर कोणीही पाळावी हा आग्रह बिलकूल नाही.

 • ११.११.११ तारखे पर्यंत येथे १,११,१११ लेख तयार व्हावे -- हे कधीच बाराच्या भावात गेले आहे. :-)
 • ११.१२.१३ तारखे पर्यंत येथे १,११,२१३ लेख तयार व्हावे, आशयघनताचा बोर्‍या न वाजता -- रोजचे ८३-८४ लेख करणे अवास्तव असल्याकारणाने हेही केरात जाणार असे दिसते.
 • २५.०२.१२ तारखे पर्यंत (पुढचा जागतिक मराठी दिन) ४०,००० लेख, १,००,००० एकूण पाने आणि १०,००,००० संपादने व्हावी. यात चढत्या क्रमाने महत्व द्यावे याबद्दल सध्या माझा (स्वतःशीच) झगडा चालू आहे.

असो. इतर काही माहिती हवी असल्यास कळवालच.

अभय नातू २३:२४, ९ मे २०११ (UTC)

विकिव्हर्सिटी[संपादन]

राहुल,

मराठी विकिव्हर्सिटी प्रकल्पावर कोणी काम करीत असल्याचे ऐकीवात नाही.

अभय नातू १२:४३, १४ जून २०११ (UTC)

विस्तार साचे[संपादन]

नमस्कार राहुल,

फार पूर्वी मराठी विकिपीडियावरही लेखांचे सांगाडे बनवायची रीत अवलंबली जात होती. पण तीन-चार वर्षांमध्ये त्या सांगाड्यांवर मूठभर मांस चढलेले लेख प्रचंड अल्पसंख्य आहेत. आपल्याकडे एखादा लेख घेऊन तो सामग्र्याने लिहू शकणारे दर्जेदार कोशलेखक कमी आहेत; बर्‍याच लोकांची संपादनपद्धती दोन-तीन, दोन-तीन वाक्ये लेखात भरून पुढे जायची आहे. अश्या परिस्थितीत कोणताही लेख किमान एका क्रिटिकल वस्तुमानापर्यंत वाढल्याशिवाय त्यात उपविभाग/ परिच्छेद पाडण्यात काही विशेष फायदा होत नाही (केवळ अनावश्यक बाइट-आकारमान वाढवण्याखेरीज). त्यामुळे लेख सुरू करताना त्यात पहिल्यांदा जेवढी माहिती लिहिता येतील, तेवढी लिहून, त्यानंतर एखाद-दुसरे बाह्य दुवे व इंग्लिश विकिपीडिया/अन्य विकिपीडियाचा आंतरविकी दुवे देऊन साचा:विस्तार साचा लावून ठेवण्याची रीत पाळली जात आहे. विस्तार साच्यामुळे त्यांचे आपोआप वर्ग:विस्तार विनंती या वर्गात वर्गीकरण होते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१६, १४ जून २०११ (UTC)

माहितीचौकट साचा[संपादन]

नमस्कार राहुल !

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका साच्यात थोडे बदल करून त्याच्या वापराविषयीचे दस्तऐवजीकरण तिथे नोंदवले आहे. तसेच, आम्ही सारे खवय्ये या पानावर तो साचा वापरूनही पाहिला आहे. तूर्तास ठीक वाटत आहे. जमल्यास, तुमच्या सदस्य नामविश्वात उपपाने बनवून त्यावर हा साचा डकवून, त्यात वेगवेगळ्या पॅरामीटरांविषयी माहिती लिहून अजून काही चाचण्या करून पाहा. म्हणजे मग हा साचा सार्वत्रिक वापरास योग्य ठरेल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०७, १९ जून २०११ (UTC)

kR=कृ

वि. नरसीकर (चर्चा) १५:२५, १९ जून २०११ (UTC)चावडी/ध्येय आणि धोरणे[संपादन]

राहुल,

आत्तापर्यंतची चर्चा थोडीशी विस्कळीत आणि अनेक कल्पनांचा ठाव घेणारी झाली आहे. या पानावर काम करण्यापूर्वी चावडीवर त्याबद्दलची संकीर्ण माहिती लिहिल्यास सगळ्यांना नक्की काय चालले आहे याची माहिती मिळेल आणि अधिकाधिक मदतही मिळेल.

१. हे पान का पाहिजे. आत्ता असलेली पाने (चावडी, चावडी/प्रगती, विविध कौलपाने, इ) का पुरेशी नाहीत.

२. या पानावर कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल.

३. या पानावर कोणत्या विषयांवर चर्चा करू नये.

३. यात कोण भाग घेऊ शकेल.

४. या पानाच उद्दिष्ट काय.

हे एक-दोन परिच्छेदात लिहावे.

अभय नातू ०१:४६, ३० जून २०११ (UTC)

एकपात्री प्रयोग[संपादन]

राहुल,

येथील अनेक प्रयोग एकपात्रीच असतात. पैकी काहींना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो तर बरेच जातात बाराच्या भावात. तुम्ही माहिती लिहा, सदस्यांचा प्रतिसाद काय आहे हे बघू आणि मग पुढील पावले उचलू.

चर्चेला बांधणी देण्यासाठी अधूनमधून असे precis रूपात विषयाची पुनर्मांडणी आवश्यक आहे असे मला वाटते.

अभय नातू ०५:१८, ३० जून २०११ (UTC)

ध्येय धोरणे हा बहूसंख्य मनुष्यजातीकरता तसा नेहमीच गंभीर वाटणारा विषय असल्यामुळे प्रतिसाद सावकाश येतील हे गृहीत धरून चालावे.स्ट्रॅटेजी विकिवरही थोडा वेळ देऊन तेथील चर्चांचा आदमास घेतल्यास मराठी विकिपीडियावर त्यातील काही चर्चेस घेण्याजोगे विषय आहेत का ते पहाता येईल.
दुसरे चावड्यांकरता सुचालन साचा मथळ्या पाशी घेतल्यास लोक संबधीत चावडीवर जाणे अधिक स्विकारतील.नवीन चावडीचे नाव त्याचे जुने विदागार इतर चावड्यांसोबत शोध यंत्रातून शोधता येतील असे पहावे. सध्याच्या उजवीकडील सुचालन साचात विदागार विभाग दाखवा लपवा साचात लपवता आले तर बरे पडेल.पुढाकार घेणे हि नेहमीच चांगली गोष्ट आहे शुभेच्छा

संकीर्ण चर्चा[संपादन]

राहुल,

संकीर्ण चर्चा वाचली. ती चावडीवर किंवा त्याच्या उपपानावर घालावी. उपपानावर घातल्यास चावडीवर दुवा द्यावा व चर्चेसाठी आमंत्रण द्यावे. यासाठी गरज भासल्यास येथे कार्यरत मंडळींना व्यक्तिगत निरोपही पाठवावा.

अभय नातू १९:१५, ४ जुलै २०११ (UTC)

मस्त[संपादन]

तुम्ही मस्त काम करत आहात! पद्धती आवडली.

चावडी चावडीच रहावी[संपादन]

माझे मत एवढेच आहे की चावडी ही चावडीच रहावी. तिच्यावर कुणाही सदस्याला किंवा अ-सदस्याला काहीही लिहायची परवानगी हवी. तिथे लिहिण्यासाठी कुठलेही नियम किंबा बंधने असता कामा नयेत. नियम बनवणारे आणि निर्णय घेणारे व्यासपीठ वेगळे हवे. चावडीवरच्या एखाद्या चर्चेतून जर खरोखरच काही नियम बनण्याची शक्यता जाणवली तर तेवढी चर्चा ‘त्या’ व्यासपीठावर नकलवावी. सध्याच्या चावडीला ध्येय आणि धोरणे यांच्या मुसक्या बांधू नयेत....J १७:५५, ८ जुलै २०११ (UTC)

भाषांतर सहाय्य[संपादन]

इंग्रजी विकिपीडियाच्या चावडीचा en:Template:Villagepump चा काही भाग तात्पूरता विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/संकीर्ण पानावर नकलवला आहे अनुवाद आणि सुयोग्य दुवे देण्यात घडेल तसे सहाय्य करावे.(अनुवाद पूर्ण झाल्यानंतर साचा:सुचालन चावडी येथे स्थानांतरीत करूयात )माहितगार १८:०६, ९ जुलै २०११ (UTC)

Idea lab[संपादन]

कल्पनाशाळा, कल्पनेचा मळा वगैरे....J ०५:५५, १० जुलै २०११ (UTC)

सामान्यकरण करावे का?[संपादन]

>>>नमस्कार माहितीगार मी विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/संकीर्ण पानाच्या भाषांतराचे आणि दुव्याचे किमान पातळी पर्यंतचे काम पूर्ण केले आहे. जर हा साचा साचा:सुचालन चावडी येथे स्थानांतरीत करायचा असेल तर त्याचे आपल्या गरजे प्रमाणे सामान्यकरण करावे का? हणजे नको असलेले विभागांच्या जागी हवे असलेले विभाग घालणे जसेकी चावडी/प्रगती इत्यादी. आणि नसलेले विभाग आयडिया ल्याब वैगरेचे काय करायचे ? संकीर्णला मुख्य चावडीने बदलवता येईल. ह्या साच्याचा स्थापने नंतर चावडीचे दर्शनी स्वरूप बदलेल (पुन्हा जे वैगरे मंडळी नव्याने चर्चा सुरु करतील ...? ) आपण आपली योजना सांगावी म्हणजे त्या अनुषंगाने मी कामे उरकती घेतो.

राहुल देशमुख २१:४७, ९ जुलै २०११ (UTC)

होय मलाही तुम्ही म्हणता आहात तसेच नको असलेले विभाग काढून मराठी विकिपीडियातील सध्याचे अस्तीत्वात असलेले विभाग जोडणेच अभिप्रेत आहे. (फारतर इंग्रजी विकितील सध्या आपल्याकडे नसलेले विभाग <!-- ने -> ने हाईड करून ठेवावेत,चावडीवरील चर्चांचे स्वरूपात होणारे बदल अभ्यासून चार-एक महिन्यानी नवे गरजेनुसार विभाग सुरू करावेत असे माझे व्यक्तिगत मत आहे ) सध्याच्या मध्यवर्ती चावडीचा दुवा संकीर्णच्या जागी द्यावा असे वाटते (भविष्यात बहूधा इंग्रजी विकिप्रमाणे मुख्य चावडीपान केवळ दुसर्‍या उपचावड्यांकडे नेणारे असेल असे करावे लागेल पण आणि तसे करणे गरजेचे अशा करता आहे कि त्या शिवाय चर्चा संबधीत चावडीत न होता विस्कळीत होत रहातील,पण असा बदल मराठी विकिपीडियन्सच्या पचनी पडण्यास काही अवधी आहे असे वाटते) , त्या शिवाय विकिपीडिया:मदतकेंद्र, विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन हे जोडावेत त्या शिवाय साचा:सुचालन चावडी त "हवे असलेले लेख, विविध विषयांवर आपला कौल द्या,,विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन‎ असे तीन दुवे आणि काही सुचना आहेत ते दुवे उपलब्ध ठेवत नवा भाषांतरीत मजकुराचा समावेश करून घ्यावा.आणि साचा:सुचालन चावडी दिसण्यास आणि वापरण्यास सुलभ होईल असे सुयोग्य वाटणारे बदल करावेत.
अर्थात वरील सुचनांचे स्वरूप ढोबळ आहे, असेच केले पाहिजे असे मुळीच नाही विकिपीडिया मुक्त जागा आहे मुक्त स्वातंत्र्याने काम करा आम्ही आपल्या पाठीशी आहोत. चर्चांकडे लक्ष द्या जिथे सहमती असेल त्याची अमल बजावणी करा पण काही चर्चा वर्षानू वर्षे चालत रहातात त्या करता तुम्ही म्हणाला त्या प्रमाणे नवी पहाट होण्याचे थांबवण्यात हशील नाही.विकिपीडिया:सफर आणि विकिपीडिया:निर्वाह या दोन पानांच्या नांवाच्या बदलावर गेल्या सहा वर्षात अजून तरी काही सहमती झालेली नाही.असो सध्यातरी एवढेच शुभेच्छा माहितगार ०७:३०, १० जुलै २०११ (UTC)

>>>अधिक महत्वाच्या विभागांना जागा देऊन कमी महत्वाचे विषय पानाच्या तळाशी मांडता येतील.

मला वाटते आता आधी बिनधास्त मजकुर साचा सुचालन मध्ये स्थानांतरीत करून घ्यावा दोन फायदे होतील चावड्यांवर प्रत्यक्षात कसे दिसते ते पहाता येईल आणि सुचना आपोआप येतील. माझे व्यक्तीगत मत मुख्य मॅट्रीक्स मध्ये ४-६ एकाच लाईन मधील दुवे ठेवावेत कमी महत्वाचे सध्या प्रमाणे दाखवा-लपवा साचात राहू द्यावे ज्यामुळे पानाची जागा मथळ्यात कमी अडकेल. शिवाय अभय,संकल्प आणि इतर सदस्यांचेही मत विचारात घ्यावे.बाकी काम छान चालू आहे आणि तुम्ही तयार करत असलेली चित्रे सुद्धा आवडली.माहितगार २१:४९, १० जुलै २०११ (UTC)

पूर्वीची पदके?[संपादन]

यापूर्वी मला दोन पदके मिळाली होती त्यांचे काय झाले? ती सदस्यपानावर दिसत नाही आहेत. हा आत्ता दिलेला बार्न स्टार मला काही वर्षांअगोदरच मिळालेला होता.---J ०५:१२, ११ जुलै २०११ (UTC)


आभार[संपादन]

पदकांचे पुनर्वसन केल्याबद्दल मनापासून आभार. पण ही तीनही पदके दिसायला एकसारखीच कशी? २९ जुलै २००७ मध्ये मिळालेले जे पदक आहे ते वेगळे होते असे अंधुक आठवते आहे.

चटकचांदणी म्हणजे सुंदर, मोहक नखरेल स्त्री. हे नाव बार्नस्टारला शोभणार नाही. त्यापेक्षा चांगल्या योगदानाबद्दल मराठा साम्राज्यात होती तशी (तीन) चांदाची सरदारकी बहाल करावी....J ०६:४०, ११ जुलै २०११ (UTC)


पूर्वीची पदके[संपादन]

पूर्वीची पदके वेगवेगळी दिसायची. आपल्या एक जुन्या विद्वान सदस्या Priya v p यांचे एक पदक मला नक्की आठवते आहे. त्यात एक गोलगोल फिरणारी रंगीत चांदणी होती. त्यांच्या सदस्यपानावर जाऊन पाहिले(आपणही पहावे), तिथेही तिन्ही पदके सारखीच दिसताहेत. केव्हातरी काहीतरी गडबड झाली आहे. असे काही असेल तर अभय नातू सांगू शकतील....J ०७:३२, ११ जुलै २०११ (UTC)

गुगल म्यापस[संपादन]

नमस्कार! कृपया गुगल मॅप्स हे पान बघावे. मला वाटते हा लेख duplicate झाला आहे.या लेखातील माहिती त्या लेखात टाकुन पानकाढा साचा लावावा म्हणजे हा लेख वगळता येईल.

कोणताही लेख सुरू करण्यापूर्वी शेजारच्या शोधखिडकीत ते नाव टाकुन शोध घेतला असता असे duplication होत नाही.याचा वापर जरूर करावा असा माझा सल्ला आहे.

आपल्या लिखाणाबद्दल हार्दिक शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:३०, ११ जुलै २०११ (UTC)

हे तर चालायचेच.आम्हीही कधितरी नविनच होतो.अनेक चुका होत होत्या. जाणकार/माहितगार लोकांनी पुष्कळ मदत केली.माझ्यामुळे त्यांना सुरूवातीस फारच त्रास झाला.अनेक ठेचा लागत वाटचाल केली. उद्देश फक्त एकच होता, मराठीचे संवर्धन. येथील सर्व फारच चांगल्या मनाचे आहेत. फक्त हाक द्या. उपलब्ध असणारे कोणीतरी येतातच धाउन.मला अनुभव आहे त्याचा.

दुसरे असे कि, लेख जतन करण्यापूर्वी एकदा त्याची झलक बघत जा.त्याने अनेक त्रुटी आपसुकच दुर होतात.मध्यंतरी वेळ नसल्यामुळे मी एक मुकदर्शीच होतो.आताशा थोडा वेळ मिळत आहे. पुन्हा शुभेच्छा.आपले कामातील सातत्य कायम राहो ही सदिच्छा.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:२६, ११ जुलै २०११ (UTC)--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:११, १९ जुलै २०११ (UTC)

[संपादन]

म्हणजे थोडक्यात मी सदर चित्रे तेथून डाउनलोड करून मराठी विपीवर उपलोड करावी आणि त्यावर 'उचित वापर' समर्थन-टॅग लावून तात्पुरती वापरवी का ? या पूर्वी चित्र चर्चा:Google Docs logo.png साठी पण हाच प्रयोग मी केला होता पण त्यावर आपण त्यावेळेस वेळेस असे का महणून विचारले होते. राहुल देशमुख १५:५५, १९ जुलै २०११ (UTC)

माझे असे मत आहे कि तुम्ही हि चित्रे डाउनलोड करून मराठी विपीवर अपलोड करण्या ऐवजी कॉमन्स वर चढवली तर इतर सर्व भाषात वापरता येतील.....मंदार कुलकर्णी १६:१४, १९ जुलै २०११ (UTC)
माझ्या आठवणीप्रमाणे मी गूगल डोक्स लोगोवर केवळ {{प्रताधिकारित}} हा साचा लावला होता. असे करणे आवश्यक आहे, कारण गूगल किंवा कुणा एखाद्या कंपनीने त्यांचा लोगो विकिपीडियावर वापरण्यास मनाई करनारी कायदेशीर नोटीस काढल्यास, ही चित्रे उडवणे सोपे व्हावे.
मंदार, कुठल्याही प्रकारची प्रताधिकारित चित्रे कॉमन्सावर चढवता येत नाहीत; कारण तुम्हांला चित्रे चढवताना त्या चित्रांचे प्रताधिकारमुक्ततेविषयीचे प्रतिज्ञापत्र सादर करून योग्य त्या परवान्यांतर्गत चित्र प्रताधिकारमुक्त म्हणून जाहीर करावे लागते. कंपन्यांच्या लोगोंवर किंवा अन्य प्रताधिकारित चित्रांवर आपल्याकडे कायद्यान्वये प्रताधिकार नसल्यास, तसे करणे बेकायदेशीर आणि म्हणून शिक्षापात्र ठरते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:५२, २० जुलै २०११ (UTC)

सदरहू चित्रे कॉमन्सावरून काढून टाकणे हे उत्तम. तसेच विकिप्रकल्पांवर स्वतः काढलेली चित्रे प्रताधिकारमुक्त करून वापरावीत; अन्यथा इतरांनी प्रताधिकारमुक्त म्हणून घोषित केलेली चित्रे वापरावीत. कुणाचीही प्रताधिकारित चित्रे / मजकूर/ बौद्धिक संपदा त्यांच्या भाजीभाकरीचे साधन असल्यामुळे विकिमीडिया प्रतिष्ठानाचे सर्व विकिप्रकल्पांवर लागू असलेले हे धोरण न्याय्य आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५१, २१ जुलै २०११ (UTC)

मेसेंजर आणि मेसेजर[संपादन]

इंग्रजीत मेसेज हे जसे नाम आहे तसे क्रियापदही आहे. त्या क्रियापदापासून Messager बनते, अर्थ, निरोप पाठवणारा. आणखी एक नाम होते ते Messenger, अर्थ - निरोप घेऊन जाणारा, निरोप्या, हरकारा, जासूद, दूत वगैरे. गूगलवर जी-टॉक आहे, त्यावर बोलता येते, लेखी गप्पा(चॅट) मारता येतात, आणि दुसरी व्यक्ती हजर नसेल लिखित किवा तोंडी त्रोटक निरोप(व्हॉइस मेल) ठेवता येतो. म्हणून जीटॉक हा Messenger आहे, Messager नाही.

ई-मेलने जो आपण पाठवतो तो त्रोटक नसून पुरेसा मोठा संदेश किंवा निरोप असतो. ते पत्र नसते, कारण त्यात मायना(ती. राजमान्य राजेश्री अमुकतमुक यांना बालके फलाण्याफलाण्याचा शिरसाष्टांग प्रणिपात), किंवा अशाच काही औपचारिक गोष्टींना थारा नसतो. त्याला फारतर चिठ्ठी-चपाटी म्हणता येईल. त्यामुळे ई-मेलला ई-पत्र(विपत्र) म्हणण्यापेक्षा विरोप म्हणणे अधिक योग्य आहे.

आपण मराठी विकीवर जे लिहितो ते इंग्रजी विपीतल्या मजकुराचे भाषांतरच का असावे? मी आजवर जेवढे लेख लिहिले त्यांतला एकही भाषांतरित नव्हता. उलट मी दिलेली माहिती काही जणांनी इंग्रजी विकीवर ठेवली आहे. इंग्रजी विकी तरी भरंवशाचा आहे का? विकीवरचे मराठी भाषाविषक लेख किंवा दीनानाथ मंगेशकरांवरचा लेख यांसारखे काही लेख सत्त्याचा अपलाप करून केवळ बदनामीसाठी लिहिले आहेत. इंग्रजी विकीवर जेजे आहे ते त्रिकालाबाधित सत्य आहे असे कुणीही समजू नये. म्हणून निव्वळ भाषांतर न करता स्वतंत्र लेख लिहिणे अधिक चांगले.

Online, interactive, sharing, यांचे भाषांतर एकाच इंग्रजी शब्दात झाले पाहिजे हा आग्रह सोडला तर पर्यायी शब्द-रचना सुचू शकतात. मराठीतल्या कित्येक शब्दांवे इंग्रजी रूपांतर करायला एकाहून अधिक शब्द वापरावे लागतात. खोक, ठेच, टेंगूळ भाचेजावई, साडू यांचे इंग्रजी भाषांतर एका शब्दात करता येईल? ऑनलाइन= (आंतर)जालावर असता(असता)नाच; संकेतस्थळावर जाऊन/राहून(अर्ज भरणे वगैरे); (विजेचा, पाण्याचा)प्रवाह चालू असताना; यंत्रावरची कामाची साखळी सुरू असताना वगैरे वगैरे. शेअरिंग=दोघांनी(किंवा अनेकांनी/सर्वांनी) मिळून, सहभागाने(सहकार्याने आणि सहभागाने यांच्या अर्थच्छटा थोड्या वेगळ्या आहेत.). webbased = जालावर असलेला, जालस्थित, जालप्रविष्ट, जालाधारित वगैरे....J ०७:१७, २० जुलै २०११ (UTC)

विरोप आणि विपत्र[संपादन]

>>तेव्हा पत्र ह्या शब्दाच्या प्रयोजनाचा विचार जरूर व्हावा.<< म्हणूनच मराठीत ई-मेलसाठी विपत्र आणि विरोप असे दोन स्वतंत्र शब्द आहेत. जेथे जो योग्य, तेथे तो वापरावा. एका इंग्रजी शब्दा्च्या सर्व अर्थच्छटा दाखवण्यासाठी एकच मराठी शब्द, आणि एका मराठी शब्दाच्या छटा दाखवण्यासाठी एकच इंग्रजी शब्द हे अनेकदा शक्य नसते.


>>जर मराठीला आपणास ज्ञान भाषा करायची असेल तर अशे शब्द बनवायला आणि वापरायला सुरुवात कशी करायची?<< सुरुवात झालीच आहे, शब्द जरूर बनवावेत. पण ते असे असावेत की मूळ इंग्रजी शब्द माहीत नसताना केवळ मराठी शब्द वाचून त्याच्या अर्थाचा अंदाज करणे बहुशः शक्य व्हावे. इंग्रजीत मात्र एका मराठी शब्दाकरिता एकच इंग्रजी शब्द निर्माण करण्याचा फारसा प्रयत्न झालेला दिसत नाही.....J १३:२२, २१ जुलै २०११ (UTC)

>>इंग्रजीत मात्र एका मराठी शब्दाकरिता एकच इंग्रजी शब्द निर्माण करण्याचा फारसा प्रयत्न झालेला दिसत नाही.....  :) !

८ लाख संपादने[संपादन]

नमस्कार ! माझ्या माहितीप्रमाणे तरी सदस्यांमधील दैनंदिन संपादनविक्रमाची आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही. एखाद्या सदस्याच्या एकंदरीत संपादनांची संख्या मात्र उपलब्ध होऊ शकते.

बाकी, अभिनेत्यांच्या माहितीत थोडीशी भर घातल्याबद्दल धन्यवाद ! आशा आहे, की आपण प्रताधिकारित संचिका सदर लेखांमध्ये वापरायचे शक्यतो टाळले असेल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:०६, २५ जुलै २०११ (UTC)

विकिपीडिया:स्वॉट[संपादन]

विकिपीडिया:स्वॉट नावाचे बरेच मागे एक पान बनवले होते त्यात सवडीनुसार डोकावून पहावे.माहितगार ०९:३७, २६ जुलै २०११ (UTC)

मिडियाविकी नामविश्व[संपादन]

तूर्तास मिडियाविकी:Edittools चा स्रोत धूळपाटी साचात साठवून घेतल्यास तो नेमका कसा दिसतो ते बहुधा बघता येईल असे वाटते (वापरून पहाता येणार नाही). तुम्हाला हवा तस स्रोत बनवुन दिला तर मी तो मिडियाविकी:Edittools मध्ये कॉपी पेस्ट करेन. मिडियाविकी:Edittools मध्ये बदल करून पहाण्यात काही अडचण नाही.एखादी गोष्ट झाली नाहीतरा संपादन उलटवणे फारसे त्रासाचे नाही. अडचण आहे ती मिडियाविकी:Common.js मधील बदलांची तेही बदल मला करून पहाता येऊ शकतील पण ती मिडियाविकी:Common.js मध्ये चूक होऊन चालत नाही मराठी विकिपीडियाची मुख्य इंजीनाचेचे चाक मागे पुढे झालेतर सार्‍या विकिपीडियन समुदायाला त्रासाचे ,मिडियाविकी:Common.js शिवाय शक्यतो सहमती घेऊन बदल करण्याचा संकेत पाळलेला बरे म्हणून थांबलो आहे, शिवाय मागे मैहीहूडॉन मिडियाविकी:Common.js अपडेट करण्याचे काम करतो म्हणाले होते पण त्यांना कदाचित पुरेशी सवड झाली नसावी.
बाकी मिडियाविकी नामविश्वात डायरेक्ट अ‍ॅक्सेस केवळ प्रचालकांपूरता मर्यादीत आहे.
Common.js तुम्हाला व्यक्तीगत पातळीवर विशेष:पसंती येथे जाऊन व्हेक्टर त्वचेचे js पान बनवून टेस्ट करून पहाता येऊ शकते

"एडिट टूल "[संपादन]

माहितिगार नमस्कार, पुन्हा थोड्याच दिवसाच्या शांति नंतर मी पुन्हा तुम्हाला त्रास देण्यास तत्परतेने हजर आहो. मला "एडिट टूल " चा एय्क्सेस मिळू शकेल काय ? आणि टेस्ट करण्याची काय पद्धति वापरायची? कळवावे - राहुल देशमुख १३:३८, २६ जुलै २०११ (UTC)

 • >>>>तूर्तास मिडियाविकी:Edittools चा स्रोत धूळपाटी साचात साठवून घेतल्यास तो नेमका कसा दिसतो ते बहुधा बघता येईल असे वाटते (वापरून पहाता येणार नाही).

सध्या मी हेच टूल कस्टमाइझ करून वापरतो आहे त्यामुळे दिसण्याचा प्रश्न सुटला. मी मराठी विपिव्रर वापरायचा स्त्रोत तयार करून माझ्या सर्वरवर टेस्ट करून आपणास देऊ शकतो. त्यासाठी आपण पहिले आपल्या गरजा ठरून घेऊ म्हणजे कामास सोपे जाईल असे वाटते.

 • ड्रॉप डाउन लिस्ट मधे कोणते गट असावेत ?

'सद्या खालील गट दाटी वाटीने एकत्र बसून ' आपण कारभार करतो आहे. या व्यतिरिक्तही काही अतिरिक्त गरजा असतीलच तर त्यापण सांगा म्हणजे स्त्रोत तयार करून टेस्ट करून पाहता येईल आणि मग आपणास तो विपी सर्वरवर स्थानांतरीत करण्यास देता येईल.

 1. देवनागरी: अक्षरे + अंक ( माझ्या मते येथे आणखी काही कळा देता येतील + काही नेहमी वापराची चिन्हे )
 2. विशेष: (ह्याचे नामांतर करावे का ? येथे साधारणतः ट्यागस दिसतात आहे )
 3. चिह्ने: (ठीक आहेत}
 4. ग्रीक अक्षरे: (ठीक आहेत)
 5. IPA: (ह्याची गरज आहे का ?)
 6. नेहमी लागणारे साचे: (हे वाढवावेत का ? विषयवार अधिक गट पण करता येतील जसे चौकटी, बिकट साचे आदी )

++++

 1. वर्गाचा गट द्यावा का ?
 2. फलक गट द्यावा का ?

आपल्या काही अजूनही कल्पना असतीलच तेव्हा कळवावे. शक्य झाल्यास आता सम्पादनाचा हि चेहरा बदलवून टाकूया. राहुल देशमुख १५:१३, २६ जुलै २०११ (UTC)

खरेतर माझ्याकडे मिडियाविकी चर्चा:Edittools#नविन प्रस्तावित बदल येथे मागे झालेल्या चर्चे व्यतरीक्त काही नवे मुद्दे आहेत असे नाही.शिवाय एकदा मुख्य सुविधा उपलब्ध झाल्या नंतर गटांचे आणि वर्ग किंवा साचांचे जोडणे वगळणे फारसे अवघड रहाणार नाही.साचे उपलब्धता मिडियाविकी चर्चा:Edittools#नविन प्रस्तावित बदल येथे नमूद केल्या प्रमाणे नामविश्वानुसार तसेच विषयवार गट देऊन करावी असे वाटते.
IPA सहीत सर्वच अक्षर चिन्हे आपल्याला संपादन खिडकीच्यावर विशेषवर्ण मध्ये उपलब्ध करून देता येतात त्यामुळे पुनरावृत्ती टाळावी इतरांनी ती सुविधा पुर्वी संपादन खिडकीच्या वरच्या भागात उपलब्ध नसल्यामुळे मिडियाविकी Edittools मध्ये दिली होती तिची तशी आता Edittools मध्ये आवश्यकता नाही.
उलट अधिकाधीक साचे वर्गीकरणे आणि बदलाचा आढावा साठी लागणार्‍या वाक्य समूहांचा समावेश करावा.
अधिक उपलब्ध झालेली जागा संपादन विषयक लागू शकणारी इतर मदत उपलब्ध करून देण्याकरिता भविष्यात वापरता येईल
विशेष मधील टॅग्सचे नामांतर करावे त्यातील पुनरावृत्ती सुद्धा टाळाव्यात
तुमच्या मुळे नवी कॅटेगरी सुचली हे खरे विकिपीडिया:जादुई शब्द लेख वाचून घ्यावा आणि येथील यादीतील नेहमी लागू शकणारे मराठी जादुई शब्द आंतर्भूत करावेत.

‌‌‍‌‌

फलक म्हणजे तुम्हाला कळफलक अभिप्रेत आहे किंवा कसे ? कळफलक अभिप्रेत असेल तर तोही संपादन खिडकीच्या वर दिसणे गरजेचे असेल खाली असलेल्या कळ फलकाचा किती उपयोग होईल या बद्दल साशंकता वाटते
होय नहमी लागणार्‍या फलक/सूचना साचांचा समावेश करून हवा आहेच. स्मरणपत्र साचाची कल्पना चांगली आहे मी तुम्ही त्याचा केलेला वापर पाहीला आहे.(त्या साचाचे अनौपचारीक नाव "धसास" असे ठेवण्यासही हरकत नाही :)

आणखी चिन्हे[संपादन]

>>देवनागरी: अक्षरे + अंक ( माझ्या मते येथे आणखी काही कळा देता येतील + काही नेहमी वापराची चिन्हे )<< मराठी श, ल आणि ख हल्ली मिळत नाहीत, त्यांची सोय करायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या एका परिपत्रकाद्वारे हिंदी श-ल ची मान्यता काढून घेतली आहे. ‘र’ न जोडलेला श्र देखील हवा, तो नसल्याने शृंगार हा शब्द टंकित करता येत नाही. पाऊण य, अर्धा ट, अर्धा ड आणि त्याखाली जोडलेली ट. ठ. ड, व, स ज ही अक्षरे हवीत. आज आपल्याला ट्विटर हा शब्द लिहिता येत नाही. अक्षरावरती काढायचा चंद्र तुर्की टोपीवर असतो तसा तिरपा झाला आहे, तो सरळ करावा. ऋकार आहे तसा रफारसुद्धा हवा. ऋकारही तिरपा आहे त्याला उभा(vertical) करावा. हे तिरपे ऋकार (ृ)देवनागरीसाठी नव्हते, ते उगीच युनिकोडने मराठीत घातले. एक द्वितियांश वगैरे आकडे मराठीत हवेत. IPA खुणा पाहिजेत. त्या कुठेही असल्या तरी सहज सापडायला हव्यात. गुणिले भागिलेच्या खुणा, वर्ग-वर्गमूळ, इंटिग्रेशनचे चिन्ह ह्याही खुणा पाहिजेत. ...J १७:५४, २६ जुलै २०११ (UTC)

 • नमस्कार जे,
युनिकोड च्या चौकटीत राहून जे काही करता येईल ते सर्व शक्य आहे पण ज्या गोष्टींना युनिकोडच सपोर्ट करत नसेल तेथे मर्यादा आहेत. पण आपण सर्व प्रकारची गरज सांगा आपण शक्य तितक्या गोष्टी उपलब्ध करण्याचा पर्यंत करू कारण जर गरजच कळल्या नाही तर उपाय कशे सापडणार. राहुल देशमुख १८:३७, २६ जुलै २०११ (UTC)
जेंच्या या चर्चा विखुरलेल्या ठिकाणी झाल्या आहेत त्या एकाच ठिकाणी होऊन त्याचा एक व्यवस्थीत मसुदा मिळावयास हवा माहितगार ०५:२४, २७ जुलै २०११ (UTC)
 • मग काहीच शक्य नाही

युनिकोडवर पूर्वी अ‍ॅ, र्‍य आणि र्‍ह ही मराठी अक्षरे नव्हती. पुढे फारच आरडाओरडा झाल्याने त्यांना या अक्षरांची सोय करावी लागली. तरीसुद्धा बहुतेक देवनागरी फ़ॉन्टांत ही अक्षरे नसल्याने ती टंकता येतीलच अशी खात्री नाही. युनिकोडने मराठीत कधीही न लागणारे र्‍हस्व एकार-ओकार-ऐकारांच्या मात्रा दिल्या आहेत. या फक्त दाक्षिणात्य भाषांना लागतात. नुक्ता असलेली य़, ऱ आणि न ही अक्षरे दिली आहेत. यांतली पहिली दोन नेपाळीसाठी आणि शेवटचे फक्त तमिळसाठी लागते. त्र आणि श्र ही हिंदी मुळाक्षरे आहेत, त्यांची सोय युनिकोडने केली आहे. नुक्ता असलेली क़, ख़, ग़, ड़, ढ़, युनिकोड देते, पण मराठीत लागणारी च़, झ़ यांची सोय नाही. अक्षरावर काढायची चंद्रकोर ही मल्याळीत अतिर्‍हस्व उ काढण्याकरिता लागते, ती दिली आहे, पण मल्याळीत असते तशी तिरपी. थोडक्यात काय, तर युनिकोड मराठीसाठी नाही, त्यापेक्षा आन्सी बरे होते. आन्सीत मराठीतली सर्व अक्षरे छापता येतात. उदा० रफार असलेली अ, आ. उ, ए, ऐ आणि ऋ. अशी अक्षरे हविर्‌अन्न, कुर्‌आन, पुनर्‌उच्चार, पुनर्‌ऐक्य आणि नैर्‌ऋत्य हे शब्द टंकण्यासाठी लागतात. पाऊण य नाही, त्यामुळे ट्य, ड्य, छ्य ही अक्षरे टंकायची सोय ठेवलेली नाही. विकीवर आन्सीची सोय ठेवली तर ही अक्षरे टाइप करता येतील. मराठी छापखानावाले आणि पुस्तक प्रकाशक आन्सी का वापरतात याचा विचार करावा. ..J १९:०३, २६ जुलै २०११ (UTC)

वीजनिर्मिती[संपादन]

आपले म्हणणे वाचले. यावर सार्वमत घ्यावयास हवे असे वाटते.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:०६, २७ जुलै २०११ (UTC)

धन्यवाद[संपादन]

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:३६, २७ जुलै २०११ (UTC)

स्क्रोलॅबिलिटी[संपादन]

तुम्ही संपादने करण्याचे स्वागतच आहे.तथापी एक महत्वाची गोष्ट अशीकी चावडी विभागानुसार स्वतंत्र उपसूचनांचा संच हा खाली येणारच त्यामुळे स्क्रोलॅबिलिटी कमी होणारच आहे.केवळ दुव्यां॰या बाबतीत जागा वचवता येते ती वाचवून घ्यावी, स्क्रोलॅबिलिटीशी शक्यतो कॉम्प्रमाईज करू नये असे वाटते.शिवाय आजकाल गॅजेटस डिव्हाईसेसमुळे स्क्रीन लहान होत आहेत अशा वेळी हि एक प्रॉब्लेमॅटीक गोष्ट आहे शिवाय मी जर नियमीत उपयोगकर्ता असेन तर वाचलेल्याच गोष्टी पुन्हपुन्हा नजरे समोर येणे आणि स्क्रोल करत बसणे नकोसे होणारे असते.म्हणून टाळावे असे माझे मत आहे शिवाय आपण त्याची काळजी घेतली नाहीत आज ना उद्या इतर कुणी तरी येऊन स्क्रोलॅबिळीटी करीता बदल करतीलच त्या पेक्षा आपणच काळजी घेतलेली बरी असे वाटते माहितगार ०७:१५, २८ जुलै २०११ (UTC)
चावडी पान कोणत्याचर्चेकरिता वापरावे कसे वापरावे /वापरू नये अशा प्रकारच्या जवळ पास एक परिच्छेदभर सुचना प्रचालकांना निवेदन,मदतकेंद्र आणि ध्येय धोरणेला आहेतच, अलिकडे तुम्ही चावडी/तांत्रीक वर मोबाईल फोनचे दुष्परिणाम सारखा संबध नसलेला संदेश वाचला असेल म्हणजे त्याही चावडीवर नवागतांकरिता विशेष सुचना जोडणे क्रमप्राप्त आहे.या सुचना चवाडीगणिक वेगवेगळ्या असल्यामुळे मी उपसंच असे म्हटले.
अजून एक मुद्दा असाही उजवीकडील मार्गक्रमण दुव्यांमध्ये नवीन चावड्यांचे विदागार बनवून त्यंचे दुवा विभाग सुद्धा जोडावयाचे बाकी आहेत,काही तांत्रीक आणि ध्येय धोरणेकरिता इतरत्रच्या संबधीत चर्चा दुव्यांचे विभागही जोडावयास हवेत. कौल पानांचाही एक विभाग जोडावा असा मानस आहे.योग्य पानात योग्य दुवे दिसावेत याकरिता कदाचित तेथे स्विच किंवा इतर प्रगत साचे सुविधा वापरावी लागण्याची शक्यत आहे म्हणूनही मी सध्याच्या स्वरूपाचा स्विकार केला.
तुमचा चावडी पान दिसण्यास कसे असावे या दृष्टीने जो मुद्दा आहे त्या करिता विकिपीडिया चावडी या पानाचा भविष्यातील स्वरूप दालन सदृश्य बनवता येईल.एकदा सुचालन साचाचे काम झाल्या नंतर ते काम हातात घेता येईल.तो पर्यंत वेगळ्या धूळपाटी पानावर ते काम तुम्ही चालू करून ठेवण्यास हरकत नाही. अभय आणि मंदार यांनी मुख्य चावडीवर बनवलेला निवडक चर्चा विभागास कुठे आणि कसा न्याय द्यावा ह्यावर मी तरी अजून विचार केला नाही आहे,पण कदाचित पानास दालन सदृश्य स्वरूप दिलेतर अधिक चर्चां पानांकडे वाचकांचे लक्ष वेधले जाईल आणि वाचकांचा वाटाड्या समाज मुख्पॄष्ठ या श्रेणीत अजून एक वाचकाभिमूख पान उपलब्ध असेल असे वाटते.

काही मुद्दे[संपादन]

माहितीगार नमस्कार ,

 • काही मुद्दे :
 1. जर चावड्या वेग वेगळ्या आहेत तर विदागार एकत्र का ? ज्या त्या चावडीचे जिथल्या तिथे द्यावे का ?
तुमचा मुद्दा योग्य आहे,प्रगत साचांमध्ये साचा एकच ठेऊन पान बदलले तसे केवळ संबधीत दुवेच दिसतील अशी व्यवस्था करता येते आणि तशी ढोबळ कल्पना माझ्या मनात आहे.
 1. जर एकत्रच देण्याचे असेल तर केवळ विदागार नावाचा दुवा देऊन वेगळ्या पानावर सर्वांचे विदगारांचे सुचालन देता येतील
काही कारणाने स्क्रोलॅबिलिटी देणे शक्यच नसेल तर हा एक चांगला पर्याय आहे.
 1. स्क्रोलॅबिलिटी साठी आपणास पोंपअप मेनू सारखे खोके अपेक्षित आहेत का ?
पोंपअप मेनू म्हणजे समजले नाही असेच असावे तसेच असावे असा काही आग्रह नाही सूर्य उगवल्याशी मतलब. पानाच्या अनुक्रमाणिकेच्या वर साधारणतः जास्तीत जास्त दोन ते तीन परिच्छेद या पेक्षा जागा जास्त घेतल्यास खाली स्क्रोल करत जावे लागते असा सहसा अनुभव असतो ते स्क्रोल करणे कटकटीचे असते.माझा प्रयत्न साधारणतः दुव्यांची पट्टी अनुक्रमाणिकेच्या उजवीकडे पडावी म्हणजे जागा वाचते आणि स्क्रोलॅबिलिटीचा प्रश्नही येत नाही असा चालू होता.

जीयुआय जितका सुट सुटीत आणि ठस ठासित तितका चांगला नेहमी प्रमाणेच मी म्हणेन कि सर्व गरजा (भविष्यातल्या सुद्धा ) पूर्ण पणे पहिले मांडाव्यात - चर्चा करून त्यास अंतिम स्वरूप द्यावे - मग डिझाईन - मग मोडूलस आणि मगच डेव्हलपमेंट आणि इम्पलीमेंटेशन इंट्रीग्रेषन असा थोडा योजना बद्ध कार्यक्रम बनवावा असे वाटते. काम फार जास्त नाही पण प्लानिग योग्य केले तर एक दीर्घ काळ चालणारी एकस्टेनडेबल सुविधा उभी करता येईल.

असे करण्यास मुळीच हरकत नाही, किंबहूना तसे करणे चांगले पण यात प्रक्रीया लांबची आहे चावडी पाने मजकुराने भरली जात आहेत आणि आपल्या सुचालन चावडीतील मागील बदला नंतर विदागाराचे दुवे कुठे आहेत हे नेमके माहीत नसल्यामुळे चावड्यांचे अर्काईव्हींग खोळंबले आहे त्यामुळे मी केलेले बदल तात्पुरते स्विकारून घ्यावे जेणेकरून विदागाराचे दुवे इतर सदस्यांना उपलब्ध राहतील हे पाहता येईल आणि पुढच्या सुधारीत आवृत्तीस सुरवात करावी असे वाटते.
चर्चांचे प्रमाण वाढल्यानंतर चावड्यांचे विदा साठवणे बॉट्सकरवी करावे लागेल आणि यात बॉट्सना कोणत्या प्रकारची व्यवस्था बॉटसुलभ असेल ते पुढील सुधारीत आवृत्तीत लक्षात घेणे गरजेचे आहे असे वाटते चर्चा पानांचे व्यवस्थापन अधिक सुटसुटीत व्हावे म्हणून स्ट्रॅटेजी विकिवर काही विशीष्ट एक्सटेंशन कार्यरत दिसते त्याची विकि सॉफ्टवेअर मध्ये सार्वत्रीक अंमल बजावणी करण्याचे काही बेत नाहीत ना याची माहिती अशा प्रकल्पाकरीता प्रदीर्घ वेळ देण्या पूर्वी करावयास हवी.


 राहुल देशमुख १३:३९, २८ जुलै २०११ (UTC)

ग्राफिक संकल्पकाचा बार्नस्टार[संपादन]

नमस्कार राहुल ! मराठी विकिपीडियावर मराठीतून ग्राफिक संकल्पनात बजावलेले मोलाचे योगदान गौरवण्यासाठी खालील बार्नस्टार तुम्हांला देण्यात येत आहे. हा बार्नस्टार गौरव (अर्थात, त्यातील साचा), तुम्ही तुमच्या सदस्यपानावर लावू शकता. :)

Design Barnstar Hires.png ग्राफिक संकल्पकाचा बार्नस्टार
Rahuldeshmukh101, मराठी विकिपीडियावर केलेल्या ग्राफिक संकल्पनविषयक (अर्थात ग्राफिक डिझाइनविषयक) महत्त्वपूर्ण योगदानाची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने तुम्हांला हा गौरव प्रदान करण्यात येत आहे.


--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:१३, ३० जुलै २०११ (UTC)

राहूल, संकल्प चित्रकला विषयातले दर्दी आहेत त्यांच्याकदून ग्राफिक संकल्पकाचा बार्नस्टार मिळाल्याबद्दल अभिनंदन,चित्र चर्चा:Chavdi-duva.png येथे माझा पुढचा प्रतिसाद नोंदवला आहे. सोबत एक विनंती आहे मराठी विकिपीडियाची ओळख करून देणार हे ऑनलाईन गूगल पॉवर पॉईंट तुम्ही पाहीला आहेत का कल्पना नाही , यात ग्रफीक्स कमतरता असल्याच माझ्या इतर विकि मित्र मंडळींनी निदर्शनास आणल होत. ग्राफीक्स या विषयात तुम्हाला रूची आणि गती आहे तेव्हा सवडी नुसार त्या पॉवर पाँईट ला काही ग्राफीक्स आणि जमल्यास काही साऊंड सपोर्ट देता आला तर करून पहावे हि विनंती माहितगार ०७:२२, ३० जुलै २०११ (UTC)

संपादने[संपादन]

संकल्प नमस्कार,

मराठी विपी ने ८ लाख संपादनांचा टप्पा गाठल्या बद्दल अभिनंदन.

 • गंमत म्हणून काही माहिती -
२४ जूलैला मी पण विपी वर एक प्रयोग करून पहिला. एकाच दिवसात जास्तीत जास्त संपादने करण्याच्या दृष्टीने. रविवार २४ जुलै २०११ ला, मी २० तासात १०११ पेक्षा जास्त वास्तविक गरजेवर आधारित संपादने पूर्ण केलीत. मराठी/हिंदी चित्रपट अभिनेते/अभिनेत्री माहिती चौकट/वर्ग/चित्रे आदी. गोष्ठी बनवण्याचे/व्यवस्थित करण्याचे बहुतेक काम पूर्ण झाले. या आधी एकाच दिवसात एकच सदस्याने केलेल्या सर्वाअधिक संपादनाची आकडेवारी माहित असल्यास सांगावी. राहुल देशमुख १२:५९, २५ जुलै २०११ (UTC)
राहुल,
तुम्ही करत असलेल्या कष्टाबद्दल तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. मराठी विकिपीडियाला आपणा सारख्यांची (झपाट्याने काम करणारे) खूप गरज आहे ज्यामुळेच आपण सध्या या टप्यावर आलो आहोत. मला येथे एक सुचवावेसे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे आपण केलेल्या संपादनांपैकी काही संपादने ही "सांगकाम्याच्या" मदतीने करता येऊ शकतात का ते पाहावे. संकल्प कडे ती जादू आहे ज्याद्वारे तो चुटकी सरशी काही कामे करू शकतो.
संकल्प, तुझे काय मत आहे यावर?..... मंदार कुलकर्णी १६:५६, ३० जुलै २०११ (UTC)

नमस्कार[संपादन]

आपण साचा बनविपर्यंत दिनविशेष वर काम करणे थांबवु काय अथवा सुरू ठेवु? कृपया कळावावे ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०६:४७, ३१ जुलै २०११ (UTC)

दिनविशेष[संपादन]

मला काहीच घाई नाही. इतर पर्यायी कामे आहेत. तिकडे वळता येईल.मनात आलेला चांगला विचार प्र्त्यक्षात अमलात आणावा हीच भावना होती.याबाबत माहिती सुमारे ३०० दिवस असतील असा अंदाज आहे. खुपच नेमका आकडा हवा असेल तसे सांगतो.

 1. साचा किवा तत्सम कल्पना योग्य वाटते का >>>विशेष तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे मी याबद्दल सांगु शकत नाही.
 2. दिनविशेष मध्ये तुम्हाला काय द्यावे असे अपेक्षित आहे (अभय चे निर्देश धरून )>>>बस नेमके तेव्हढेच.महाराष्ट्रातील /महात्मे/ आध्यात्मिक व्यक्ति यांच्या पुण्यतिथ्या /जयंत्या
 3. सर्व साधारण माहिती किती असणार आहे (३६० दिवस/ १२ महिने / ??)>>>सुमारे ३०० दिवस. नेमका आकडा हवा असल्यास नंतर सांगतो.
 4. जर आपणास थांबवले तर आपण किती दिवस वाट पाहू शकाल
 • (वेळेच्या नियोजनाच्या दृष्टीने )>>>आपण 'गो' म्हणेपर्यंत कितीही वेळ.अगदी माझ्या किंवा जगाच्या अंतापर्यंत (जे आधी घडेल ते)[हे खास 'सरकारी'

उत्तर आहे.]

 1. आपण पण साचे बनवता का? साच्या बरोबर आपली जवळीकता !>>>नाही.एक बनविला होता.(प्रयत्न केला होता) त्यात अनेकांची मदत घ्यावी लागली.अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान आहे.ऍनालिटीकल ज्ञान आहे.बाकी 'पिकप' बरा आहे. लवकर समजु शकतो.पुन्हा प्रयत्न करु शकतो.
 2. ह्या कमी अजून कोणी सोबत आहे का?>>>एकला चलो रे!
 3. आणि वेळो वेळी त्रास द्यायला आपण उपलब्ध असाल का !!!!नोकरी व प्रपंच सांभाळुन लॉग होतो. पुर्णत्वाने उपलब्ध नाही.सप्ताहाचे ४-५ दिवस किमान अर्धा तासतरी, सवड मिळेल तेंव्हा.नाईलाज आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:४०, ३१ जुलै २०११ (UTC) वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:४०, ३१ जुलै २०११ (UTC)

एक्स्टेन्शन[संपादन]

माहितीगार नमस्कार,

तपासले असता अशे निदर्शनास येते कि आपल्या कडे charinsert हे एक्स्टेन्शन जे कि अएडीट टूल साठी वापरतात हे वापरात आहे. आपणा समोर दोन मर्ग आहेत

 1. असलेल्या स्तोताम्ध्ये सुधारणा करणे
 2. नवीन स्त्रोत वापरणे

दोघांच्याही पद्धतींचा अभ्यास केला असता दुसरा पर्याय उत्तम वाटतो. आपणास काय वाटते ते सुचवावे. राहुल देशमुख १०:१७, २७ जुलै २०११ (UTC)

अर्थात दुसरा पर्याय उत्तम माहितगार ०८:५७, ३१ जुलै २०११ (UTC)

डेटा गृपिंग[संपादन]

माहितिगार नमस्कार,

मी दिनविशेष चा डेटा जवळ जवळ ३०० दिवस , १२ महिने एकाच यंत्रणे द्वारे महिन्या वारी, अथवा दिवस वारी, अथवा महिना आणि दिवसवरी दिसेल अशा आशयाचे उपाय बनवावे असा विचार करतो आहे.

डेटा गृपिंग आणि सॉर्टिग करण्या साठी काही पद्धत विकिपिडीयावर माहित आहे का (मिडियाविकी चे जसे DPL जे विकिपीडिया सपोर्ट करत नाही सारखे.) छोट्या डेटाला तर पार्सर ने नियंत्रित करता येतो पण मोठा कसा हाताळायचा? काही कल्पना असल्यास सांगावे. राहुल देशमुख ०९:५२, ३१ जुलै २०११ (UTC)


मला वाटते दोन्ही बाबतीत अभय नातू कदाचित अधिक माहिती देऊ शकतील.दिनविशेष बद्दल सर्वाधिक काम नातूंनी केले आहे.अर्थात दिनविशेष मध्ये कुणी हात घातो म्हणाले तरी मी कचरतो कारण प्रथम दर्शनी वाटते त्यापेक्षा ते अती जास्त वेळ खाऊ आणि गुंतागुंतीचे प्रकरण आहे.त्याच वेळात इतर महत्वाची बरीच कामे होऊ सकतीअ असे वाटते माहितगार १०:४०, ३१ जुलै २०११ (UTC)
नमस्कार राहुल ! तुमच्या वर्णनानुसार, मला वाटते तुम्ही बहुधा काही प्रमाणात अर्ध-स्वयंचलित बनवता येईल, अशी आमाआका व्यवस्था राबवण्याविषयी प्रयत्न करू पाहत आहात - जेणेकरून दैनंदिन आमाआका पानांचे लेख बनवून ठेवता येतील, व ते आपोआप दरदिवशी बदलले जातील. तसे असल्यास साचा:उदयोन्मुख लेख सदर येथील {{#ifexist: विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/{{#time:j F Y}} या कोडात असलेली अट पाहा. त्या धर्तीवर दर दिवसाची पाने बनवल्यास हे काम अर्ध-स्वयंचलित पद्धतीने करता येऊ शकेल. मी मागे हे काम विकिपीडिया कॉमन्सावरील साचे पाहून केले होते; त्यामुळे आतादेखील तिथल्या साच्यांचे संदर्भ वापरता यावेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३२, ३१ जुलै २०११ (UTC)
 • दिनविशेष मध्ये दिलेल्या प्रत्येक नोंदीचे भविष्यात लेख बनवण्याचा विचार असुशाकेल का ?\ आहे का ? >>>सध्या नाही. परंतु कालांतराने(किती काल नक्की नाही.)होय.
 • हि माहिती वेग वेगळ्या प्रकारे ग्रुप करावी लागेल का? जसे पोर्णिमा, द्वितीय, (यात सर्व १२ हि आल्या ) ह्याचे दिनविशेष>>>होय.दर महिन्याचे(मराठी महिने)प्रतिपदा ते पौर्णिमा (शुद्ध पक्ष) आणि प्रतिपदा ते अमावस्या(कृष्ण पक्ष)=अश्या ३० दिवसांचा एक गृप याप्रमाणे.यातही पक्षाप्रमाणे २ सब गृप होतील.
 • हि माहिती महिन्या प्रमाणे पण ग्रुप करवी अशी गरज पडेल का ? जसे श्रावण - ह्या महिन्यातील सर्वे दिनविशेष>>>नाही. जरुरी नाही. पण केले तर उत्तम.कोणास आवश्यकता असल्यास ती माहिती मिळु शकेल.(दूरदेशीच्या वाचकांना)
 • हि माहिती कोणत्या नामविश्वात साठवावी असे आपणास वाटते ( वैकल्पिक )>>>????
 • आपल्याला मला कुठून निरोप दिला असे तर वाटत नाही ना !!!>>>>प्रत्येक बॉल टोलवू शकत नाही.पण पिचवर राहील व प्लेड करील.भलेही धाव न निघो.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:५७, ३१ जुलै २०११ (UTC)

<<<मी दिनविशेष चा डेटा जवळ जवळ ३०० दिवस , १२ महिने एकाच यंत्रणे द्वारे महिन्या वारी, अथवा दिवस वारी, अथवा महिना आणि दिवसवरी दिसेल अशा आशयाचे उपाय बनवावे असा विचार करतो आहे. >>> ता.क.- यात मला अडचण अशी वाटते कि प्रत्येक तिथी ठराविक वेळेत बदलत नाही.तसेच याचा इंग्रजी तारखांशी काहीच संबंध नाही.यात दर महिन्यात /दर वर्षात Flexibility असते.श्रावण महिन्यात नवमी रात्री २०.४६ ला बदलु शकते.तर दुसर्‍या वर्षीच्या श्रावणात सकाळी १०.५१ .ते track करणे व त्यावर control ठेवणे मला वाटते कठीण काम आहे.शिवाय क्षय मास अधिक मास याचे त्यात synchronisation करणे तर दुस्तरच वाटते.त्यामुळे त्यास इंग्रजी महिन्यांप्रमाणे automated करुन display करणे हे सर्वथा विकित तरी अशक्य वाटते. अर्थात, मला याचा आवाका माहित नसल्यामुळे असेल कदाचित.हे तयार करण्यास एखादे softwareच लागेल.त्याचा output मग display शी लिंक करावा लागेल.असो. काय अडचण आहे हे मी कळविले. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:१२, ३१ जुलै २०११ (UTC)


राहुल, आता माझी निघायची वेळ झाल्यामुळे आता पळतो; उद्या तुमच्या सूचनेसंदर्भात अधिक लिहितो. कलोअ. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४५, १ ऑगस्ट २०११ (UTC)