Jump to content

सती (प्रथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एक १८ व्या शतकातील चित्र् सती दर्शवितांना

सती (प्रथा) (इंग्रजी: Sati (practice) or suttee) ही एक अप्रचलित अग्नी दहन प्रथा आहे. काही प्राचीन भारतीय हिंदू समाजात ही एक प्रथा प्रचलित होती[].

भारतातील प्राचीन हिंदू समाजाची स्वाभिमानास्पद प्रथा होती. या प्रथेमध्ये विधवा पत्नी मृत्यू झालेल्या पतिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ती पत्नी स्वखुशीने पतीच्या अत्यंतिक प्रीतीमुळे प्रेतासमवेत आत्मदहन करत असे. किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वतः त्या जळत्या चितेवर उडी मारून आत्मदाह करत असे.[] ही प्रथा अशी कि प्रेमळ पतीच्या मागे दुःख करून जीव देण्या पेक्षा आपल्या पती बरोबर सती गेल्यास सहगमन फळ मिळते अशी मान्यता होती. तसेच त्या वेळी समाजात सुवासिनी स्त्रीला च सन्मान होता. पण जर एखादी स्त्री गरोदर असेल वा तीच बाळ लहान असेल वा तिला मुलं-मुलगी असेल तर अश्या स्त्रियांना सती जाण्याचा अधिकार नव्हता वा अश्याना सती जाण्याची परवानगी नव्हती.

इतिहास

[संपादन]

ह्या प्रथेचा ऊल्लेख ३ रा शतक ख्रिस्त पूर्वी मध्ये झाला आहे. पण पुरावा ५ व्या व नव्वया शतकांपासुनच आहे. हिंदू व सीख अमीर उमरावी घराण्यांमध्ये ही व्यवस्था जास्त होती. दक्षिण आशियातील काही ठिकाणी सुद्धा ही प्रथा चालायची.राणी पद्मिनी ऊर्फ महाराणी पद्मावती ही चित्तोडगढ राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी होती, अल्लाउद्दीन खिलजीने धोक्याने राजा रतनसिंह यांना मारल्या नंतर राणी पद्मिनी आणि इतर सोळाशे महिलांसह 'जौहर' (हा क्रांतिकारी आणि अन्यायाविरुद्ध आणि स्वतः पवित्र्य राखण्या साठी अग्निकुंडात उडी घेणे ) करून भस्मसात झाली[][] छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पत्नी पुतळाबाईंनी आपल्या महाराजांच्या देह ठेवल्या नंतर त्यांच्या प्रतिच्या् अत्यंतिक प्रेमामुळे स्वखुशीने सती गेल्या .[]


ब्रिटिश कालीन भारतात ही प्रथा पहिल्यांदा चालायची. बंगाल भागात ह्या प्रथे दर्म्यान एक सरकारी अधिकारी उपस्थीत राहायचा. १८१५ ते १८१८ च्या मध्ये, बंगालात सतींची संख्या ३७८ वरून ८३९ वर गेली. सती विरुद्ध ख्रिश्चन मिशनरी, जसे विल्यम केरी, व समाजसेवक, जसे राजाराम मोहन रॉय, ह्यांनी सतत आंदोलने केल्या नंतर, सरकारने १८२९ साली सती प्रथेवर बंदी आणली. त्यानंतर ईतर राज्यांमध्ये सुद्धा त्यासारखेच कायदे राबविण्यात आले. १८६१ मध्ये पूर्ण भारतावर क्वीन विक्टोरिया द्वारे सतीवर बंदी आणण्यात आली होती. नेपाळात १९२० साली सती वर बंदी आली. १९८८ च्या भारतीय सती प्रतिबंधक कायद्याने सतीबद्दलच्या सहायावर, ऊत्तेजनावर व सतीचा गौरव करण्याला गुन्हेगारी स्वरूप दिले.

व्युत्पत्तिशास्त्र

[संपादन]
सतीची पौराणिक कथा
[संपादन]

सती [] हा शब्द सती देवीपासून (दक्षायानी देखील म्हणले जाते) उत्पत्ती केली आहे. पिता राजा दक्ष प्रजापती यांनी सती देवी पती असलेल्या शिव यांचा अपमान केल्याने, सहन करू न शकल्यामुळे या कारणामुळे दक्ष प्रजापती यांची पुत्री सतीने यज्ञाकुंडाच्या अग्नीमध्ये उडी घेऊन देवी सतीने तिचे जीवन संपवले.[][]

संदर्भ यादी

[संपादन]
  1. ^ a b "सती प्रथा". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-16.
  2. ^ a b "सती प्रथा - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2020-01-19 रोजी पाहिले.
  3. ^ "पद्मिनी". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-12-22.
  4. ^ Jaswant Lal Mehta (2005-01-01). Advanced study in the history of modern India 1707-1813. p. 47. ISBN 9781932705546.
  5. ^ "सती (हिंदू देवी)". विकिपीडिया. 2018-03-18.
  6. ^ "Sati (practice)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-14.

बाह्य दुवा

[संपादन]