Jump to content

विधवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या स्त्रीचा नवरा मरण पावला आहे तिला विधवा म्हणतात. ज्या पुरुषाची पत्नी मरण पावली आहे त्याला विधुर म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक धर्मांचा समावेश झालेला दिसतो. या धर्मांमध्ये अनेक संस्कार दिसतात, जसे की जयंती, विवाह, अंतिम संस्कार इत्यादी. विवाह संस्कार हे सर्व धर्मांद्वारे सन्माननीय पवित्र संस्कार आहेत. पत्नीच्या आधी पती मरण पावला की पत्नीला विधवा नावाचे नवीन नाते मिळते.

संस्कृती[संपादन]

भारतात, विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता आहे. तरीही पुराणमतवादी समाजांत विधवांना कमनशिबी समजले जाते. अनेकदा विधवेचे नातेवाईक तिला आधार देत नाहीत.

हेसुद्धा पहा[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

बाह्य दुवे[संपादन]