बाळासाहेबांची शिवसेना
Appearance

बाळासाहेबांची शिवसेना हा २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला भारतीय राजकीय पक्ष होता. त्याला निवडणूक आयोगाने प्रमुख शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर वेगळे असे ढाल-तलवार हे नवे चिन्ह मिळाले होते.
- तो आता शिवसेनेच्या दोन स्वतंत्र गटांपैकी एक होता, दुसरा पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा कार्यरत आहे.[१][२][३]
२०२२ च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा परिणाम म्हणून ही दुफळी निर्माण झाली होती.
- १८ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशाने हा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्यात आला.
तथापि या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आहे.
नेते
[संपादन]| क्र. | नाव | छायाचित्र | पदनाम |
|---|---|---|---|
| १ | एकनाथ शिंदे | महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री प्रमुख नेते | |
| २ | उदय सामंत | महाराष्ट्राचे उद्योगमंत्री | |
| ३ | प्रतापराव जाधव | केंद्रीय मंत्री |
संदर्भ
[संपादन]- ↑ "Team Eknath Shinde Now 'Balasahebanchi Shiv Sena', 'Mashaal' Poll Symbol for Uddhav Camp". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-10-10 रोजी पाहिले.
- ↑ "Thackeray-led Sena gets 'mashaal' as election symbol; Shinde camp asked to give fresh list". zeenews.india.com. 2022-10-10 रोजी पाहिले.
- ↑ "शिंदे-उद्धव गुटों को नए नाम अलॉट, निशान एक को: एकनाथ को गदा देने से EC का इनकार; ठाकरे को मशाल सिंबल मिला". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2022-10-10. 2022-10-10 रोजी पाहिले.