Jump to content

विकिपीडिया:चावडी/सोशल मीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १९:५६, २० एप्रिल २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







मराठी विकिपीडिया सोशल मीडिया

मराठी विकिपीडियाचा सोशल मीडियासाठी आपले मत इथे द्यावे...

प्रस्ताव

मराठी विकिपीडियाचे दिशात एक पाहुल पुढे लोकांना विकिपीडियापासून अधिक लाभ घ्यावा म्हणून मराठी विकिपीडियाचे अधिकृत सोशल मीडिया करीता मी phabricator वर प्रस्ताव टाकला आहे. नवीन मुखपुष्ठात याचे आगमन करण्यास असा द्याय आहे. याचे रचना, मत आणि अन्य प्रस्ताव खाली नोंदवे

Phabricator प्रस्ताव https://phabricator.wikimedia.org/T163415

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:५६, २० एप्रिल २०१७ (IST)[reply]

माहितगारांचा मत

डिअर टायवीन,
आपल्या तारुण्यसुलभ उत्साहा बद्दल आदर आहे. तरीपण मराठी विकिपीडिया एक खूप सावकाश निर्णय घेणारी कम्यूनिटी आहे. सोशल मिडीया बद्दल अद्याप कसलाही निर्णय झालेला नाही आणि प्रचालक किंवा ब्यूरोक्रॅटनी कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही.
प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीवर मराठी विकिपीडिया लेखाचे दुवे सोशल मिडीयावर देण्यास मुक्त आहेच. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक बाजूंच्या संवेदनशीलता विरूद्ध बाजूस विकिपीडियचे स्वरूप इत्यादी बाबींचे बारकावे बघता मराठी विकिपीडियावरील लेख सोशल मिडीयावर डायरेक्ट कनेक्ट करणे मागच्या वेळी नाकारले होते. याही वेळी मी डायरेक्ट सोशल मिडीया कनेक्टीव्हीटीच्या बाजूने नाही.
मराठी विकिपीडियाच्या प्रसारार्थ राज्य मराठी विकास संस्था आणि CIS A2k चे फिल्डवर्क चालू असताना सोशलमिडीयाच्या माध्यमातून/कारणान्वये मराठी विकिपीडियाबद्दल गंभीर राजकीय सामाजिक किंवा सांस्कृतिक वाद उपस्थित होणे फिल्डवर काम करणाऱ्यांसाठी त्रास दायक ठरू शकते. किमान असे कोणतेही काम मराठी विकिपीडियाचा अनुभव नसलेल्या इंपल्सीव्ह व्यक्तिंच्या हाती असू नये.
इन एनी केस सोशल मिडीयाची ॲडमिनिस्ट्रेटरशीप ही एखाद्या जाणत्या अनुभवी मराठी विकिपीडियन ने करावयास हवी, आपण म्हणजे टायवेन गोंसाल्वीस यासाठी सुयोग्य उमेदवार ठरता असे वाटत नाही; कारण माझ्या व्यक्तिगत मतानुसार आपला स्वभाव इंपल्सीव्ह आहे आणि सामाजिक सांस्कृतीक आणि राजकीय बारकाव्यांबद्दल आपण पुरेसे अद्याप परिपक्व नाही आहात, काही सामाजिक सांस्कृतिक अथवा राजकीय वाद झाल्यास आपण सामोरे जाण्यास कितपत सक्षम आहात या बद्दल मला व्यक्तिश: शंका वाटते; त्या शिवाय विकिपीडियावर लिहिण्याचा अनुभव काही महिने किंवा वर्षांभरापेक्षा अधिक नाही त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या अधिकृत सोशल मिडीयाची जबाबदारी आपण घेऊ नये आणि इतरांनी आपणास देऊ नये असे माझे व्यक्तिगत आणि स्पष्ट मत आहे.
आपण व्यक्तिगत पातळीवर सोशल मिडीयावर जे चांगले काम करु इच्छिता त्यासाठी आमच्या सदिच्छा सदैव आपल्या पाठीशी आहेत.
मराठी विकिपीडियावरून डायरेक्ट कनेक्टीव्हीटी देण्याचे माझे मन नाही तरीपण आपण अभय नातूंशी स्वतंत्र चर्चा करू शकता.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२२, २० एप्रिल २०१७ (IST)[reply]

अभय नातू यांचे मत

१. मराठी विकिपीडियास अधिकृत सोशल मीडिया खाते असणे लाभदायक आहे. याचे फायदे अनेक आहेत. सविस्तर विवरण करणे आवश्यक नाही पण लागल्यास येथील अनेक सदस्य ते देऊ शकतील.

१.१ अधिकृत मुद्दाम तिरके लिहिले आहे. कोणतीही संस्था (विकिमीडिया फाउंडेशन, भारतातील चॅप्टर, इ.) किंवा सरकार (महाराष्ट्र शासन, भाषा संचालनालय), इ. अशा खात्यास अधिकृत करणार नाहीत. त्यांनी तसे करूही नये असे माझे मत.

२. असे खाते मराठी विकिपीडिया समाजाचे असावे. एका व्यक्तीचे असू नये.

२.२ असे करण्यासाठी अनेक उपाय आहेत, सोशल मीडिया कंपनीशी संपर्क साधून अशा खात्याचा पासवर्ड दुहेरी करता येतो. एकापेक्षा अधिक व्यक्तींना हा कंट्रोल द्या. इतर प्रकल्पांनी हे कसे राबवले आहे याचाही अभ्यास करावा.

३. अशा खात्यातून काय प्रकाशित व्हावे याचे संकेत लिखित पाहिजेत. हे संकेत कटाक्षाने पाळले जावे (उदा. राजकीय टीका/टिप्पणी करू नये, जातीयवादी मजकूर लिहू नये, दिवसातून अधिकतम १ (किंवा २, किंवा ५...एक विवक्षित संख्या) वेळा मजकूर प्रकाशित व्हावा, इ.)

४. हे खाते २-३ पेक्षा अधिक व्यक्तींनी चालवू नये (मजकूर घालण्यासाठी) म्हणजे गोंधळ निर्माण होत नाही.

आशा आहे इतरही सदस्य यावर त्यांचेी मते देतील. यासाठी हा मुद्दा चावडीवर न्यावा.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १९:२०, २० एप्रिल २०१७ (IST)[reply]