"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ३९: | ओळ ३९: | ||
* औषधी दृष्टीने देखील आम्रफल उपयोगी आहे. |
* औषधी दृष्टीने देखील आम्रफल उपयोगी आहे. |
||
* आंबा हेच असे एक फळ आहे जे आयुर्वेदामते दुधाबरोबर खाता येते. |
* आंबा हेच असे एक फळ आहे जे आयुर्वेदामते दुधाबरोबर खाता येते. |
||
* कारवारी लोक पिकलेल्या आंब्याची भाजी करतात. तिला साटे म्हणतात. |
|||
* कैरीच्या (कच्च्या आंब्याच्या) फोडी उन्हात वाळवून आमटी करताना वापरतात. |
|||
* कैरीची आंंबट-तिखट चटणी होते. |
|||
* राजापुरी कैऱ्यांपासून मुरांबा बनतो. |
|||
==आंब्याच्या जाती== |
==आंब्याच्या जाती== |
१८:३९, ७ जून २०१९ ची आवृत्ती
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
आंबा | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
झाडाला लागलेल्या कैऱ्या
| ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
|
आंबा हे एक फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.[१]
दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.सातारा येथे सुद्धा आंब्याचे खूप मोठे उत्पादन होते.
जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची सिंधू ही जात विकसित केली आहे.
आंब्याचे झाड
आंब्याचे झाड (Mangifera Indica) हे साधारणपणे ३५ ते ४० मीटर उंच असते. त्याचा घेर साधारणपणे १० मीटर एवढा असतो. आंब्याची पाने सदाबहार असून पाने डहाळीला एकाआड एक येतात. आंब्याचे पान १५ ते ३५ सेंटीमीटर लांब तर ६ ते १६ सेंटीमीटर रुंद असते. कोवळी असताना पानांचा रंग हा काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद लाल होतो. पाने जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो. आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलीमीटर एवढी असते. आंब्याच्या फुलांना मोहोर असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील "अश्मगर्भी फळ" ह्या प्रकारातील असते. ह्या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कडक कवच असते आणि ह्या कवचाच्या आत फळाचे बी असते. ह्या कवचाला आंब्याची कोय असे म्हणतात. आंब्याच्या जातीप्रमाणे त्याच्या फळांच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटीमीटर लांब तर व्यास ७ ते १२ सेंटीमीटर असतो. आंब्याचे फळाचे वजन २.५ किलोग्रॅम पर्यंत असू शकते. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो. पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो. ज्या बाजूस ऊन लागेल तिथे लाल छटा जास्त दिसते तर सावलीच्या बाजूस बहुतकरून जास्त पिवळी छटा असल्याचे आढळते. फळाच्या मध्यभागी चपट्या आकाराची आणि लांबट बी (कोय) असते. आंब्यांच्या जातीप्रमाणे कोयीचा पृष्ठभाग हा धागेदार अथवा सपाट असतो. कोयीचे कवच १ ते २ मिलीमीटर जाड असून त्याच्या आत अतिशय पातळ असे आवरण असते ज्यात ४ ते ७ सेंटीमीटर लांबी, ३ ते ४ सेंटीमीटर रुंदी आणि १ सेंटीमीटर जाडीचे एकच बी असते. कच्च्या कैरी चवीला आंबट असते. कैरी पिकल्यावर गोड लागते. आंबा भारतात सर्व ठिकाणी आढळून येते.
आंब्याची आढी
कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यास 'आंब्याचा माच लावणे' किंवा आंब्याची आढी लावणे असे म्हणतात. यासाठी एखाद्या खोलीत वाळलेले तणस वा भाताचे वाळलेले गवत (पिंजर) पसरून त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैऱ्या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे आच्छादन करतात.अशा प्रकारे साधारणतः १०-१५ दिवसात, झाकला गेल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.
हा १०-१५ दिवसाचा अवधी कमी करण्यासाठी रसायने टाकून आंबा, केळी, चिकू इत्यादी फळे पिकविण्याचे एक तंत्र आहे. त्याने ३-४ दिवसात आंबा पिकतो. कॅल्शियम कारबाईड इत्यादी रसायनांचा वापर यासाठी करण्यात येतो. या पद्धतीत रसायनांचा काही अंश फळात जातो. ते मानवी आरोग्यास घातक ठरू शकते. आंबा पिकवण्याच्या दुसऱ्या पद्धतीत आंब्याची कैरी तोडून ती १ ते २ दिवस कैरी पानांत किवा धान्यात दाबून ठेवणे..
इतर
- हा पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
- आंबा संशोधन केंद्र भारतामध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आणि महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे आहे.
- कच्च्या आंब्याचे लोणचे करतात.
- पिकलेल्या आंब्याचा आमरस करतात किंवा फोडी करून खातात. .
- औषधी दृष्टीने देखील आम्रफल उपयोगी आहे.
- आंबा हेच असे एक फळ आहे जे आयुर्वेदामते दुधाबरोबर खाता येते.
- कारवारी लोक पिकलेल्या आंब्याची भाजी करतात. तिला साटे म्हणतात.
- कैरीच्या (कच्च्या आंब्याच्या) फोडी उन्हात वाळवून आमटी करताना वापरतात.
- कैरीची आंंबट-तिखट चटणी होते.
- राजापुरी कैऱ्यांपासून मुरांबा बनतो.
आंब्याच्या जाती
- आम्रपाली आंबा :
- केसर
- तोतापुरी (तोतापरी)
- उत्तर प्रदेशामध्ये दशेरी (दशहरी)
- दक्षिणेत नीलम
- नूरजहाँ : मध्य प्रदेशातल्या अलिराजपूरच्या कट्ठीवाडा मध्येच मिळतो. : एका आंब्याचे वजन एक ते पाच किलो
- पायरी
- बादाम
- आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली
- मलगोवा
- मल्लिका
- मानकुराद आंबा (गोवा)
- राजापुरी
- रायवळ
- लंगडा
- साखरगोटी
- सुंदरजा आंबा : हा गोड वासाचा आंबा मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यात होतो. ह्याच्या सालीवर पिवळे-पिवळे ठिपके असतात.
- हाथीझूल आंबा :
- हापूस : ही महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जात. जिल्ह्यतल्या देवगड तालुक्यात होणारा हा आंबा सर्वश्रेष्ठ समजला जातो.
हे सुद्धा पहा
संदर्भ
फळांचा राजा